मंत्रिमंडळ

नजफगड, नवी दिल्ली येथील 100 खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या बांधकाम आणि कार्यान्वयनाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 02 MAY 2018 5:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र (आरएचटीसी), नजफगड, नवी दिल्ली येथे सुमारे 100खाटांची सुविधा असलेल्या सर्वसाधारण रुग्णालयाच्या बांधकाम आणि कार्यान्वयनाला मंजुरी दिली आहे.यासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

73 गावांमधील 13.65 लाखांची स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुविधांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांत या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यात येणार आहे.

रुग्णालयामध्ये  औषधे , प्रसूतिशास्त्र व गायनोकॉलॉजी, बालरोगशास्त्र आणि शस्त्रक्रिया अशा चार प्रमुख वैद्यकीय सेवांचा समावेश असेल ज्यात रक्तपेढी, निदान सेवा आणि जनरल मेडिसिन, शल्यचिकित्सा, दंतवैद्यकीय, ईएनटी, ऑप्थॅमॉलॉजी, ऑडीओमेट्री आणि बालरोगासाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) यांचा समावेश आहे. या रुग्णालयात  50 पेक्षा जास्त डॉक्टर आणि 40 परिचारिका, इतर कर्मचारी तसेच  50 संबंधित आणि आरोग्यसेवा कर्मचारी रुग्णांची काळजी घेतील.

स्थानिक नागरिक आणि विशेषतः महिला व मुलांसह दुर्बल घटकातील लोकांना हे रुग्णालय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देईल. या रुग्णालयात बाल व माता सेवा, आघात आणि मूल प्राथमिक निदान, उपचारात्मक, प्रतिबंधात्मक आणि गुणकारी सेवा पुरविल्या जातील.

मे 2020 पर्यंत सर्व विभाग आणि आवश्यक मनुष्यबळासह हे रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

 

N.Sapre/S.Mhatre /P.Kor



(Release ID: 1531011) Visitor Counter : 72


Read this release in: English