ऊर्जा मंत्रालय

काही गावांच्या विद्युतीकरण स्थितीविषयी स्पष्टीकरण

Posted On: 01 MAY 2018 7:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 मे 2018

 

दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या गावांच्या विद्युतीकरणाचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वी गाठण्यात आले आहे.  विद्युतीकरण न झालेल्या गावांपैकी बहुतांश गावं दुर्गम, डोंगराळ, दाट जंगल क्षेत्रात, नक्षल प्रभावित भागात असल्याने विद्युतीकरणासाठी दुर्लक्षित राहिली होती.

सरकारने 100 टक्के खेड्यांच्या विद्युतीकरणाचा दावा केला असताना अद्यापही काही गावं विजेविना असल्याचा अहवाल काही प्रसारमाध्यमांनी दिला आहे. ज्या गावांना जनगणना कोडनुसार ओळख निश्चित करण्यात आली आहे आणि याबाबत राज्यांनी 1 एप्रिल 2015 पर्यंत माहिती दिली आहे अशा विद्युतीकरण न झालेल्या उर्वरित गावांच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य ‘दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत’ ठेवण्यात आले होते. असे सरकारने अधोरेखित केले आहे. या सर्व गावात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित राज्यांनी दिली आहे. वस्ती, धानी, माजरा, टोला यासारख्या उपग्रामात काही घरात अद्याप वीज पोहोचली नसल्याची शक्यता आहे आणि काही प्रसारमाध्यमं याच वस्त्यांसंदर्भात माहिती देत असावी.

ग्रामीण आणि शहरी भाागातल्या उर्वरित घरांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी आणि सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना-सौभाग्य’ सुरू केली आहे. या सर्व उर्वरित घरांचा सौभाग्य योजनेअंतर्गत समावेश केला जाईल. त्यामध्ये जनगणना गावांशी संबंधित वस्ती, धानी, माजरा, टोलामधल्या घरांबरोबरच शहरी वस्तीतल्या घरांचा समावेश आहे.

प्रसारमाध्यमातल्या उल्लेख केलेल्या वृत्तामध्ये बरीचशी गावं, जनगणनेत ओळख देण्यात आलेली गावं नसून त्या वस्त्या, धानी, माजरा किंवा टोला आहेत.

 

R.Tidke/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1530888) Visitor Counter : 131


Read this release in: English