संरक्षण मंत्रालय

हलके लढाऊ विमान तेजसने साध्य केला महत्वाचा टप्पा

Posted On: 28 APR 2018 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2018

 

‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानाने डर्बी ह्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत आणखी एक महत्वाचा टप्पा साध्य केला आहे. विग कमांडर सिद्धार्थ सिंग उडवत असलेल्या तेजस विमानातून गोवा समुद्र किनाऱ्याजवळ हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. डर्बी या बीव्हीआर श्रेणीतील क्षेपणास्त्राच्या समावेशामुळे तेजस विमानाने वापरासाठीच्या अंतिम परवानगीबाबतच मोठा टप्पा साध्य केला आहे. ‘तेजस’ हे हलके लढाऊ विमान डीआरडीओने विकसित केले आहे.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ तसेच इतर विभागांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

B.Gokhale/J.Patankar/D.Rane

 



(Release ID: 1530672) Visitor Counter : 120


Read this release in: English