रेल्वे मंत्रालय
देशात वाहनांची ने-आण करण्यासाठी वाहन उद्योगाची रेल्वेला वाढती पसंती
Posted On:
27 APR 2018 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2018
वाहतुकीसाठी कमी खर्च, जलद सेवा, विश्वासार्हता आणि सुरक्षितता या पैलुंमुळे भारतीय रेल्वेला वाहतुकीचे साधन म्हणून अग्रक्रमाने पसंती दिली जाते.
2017-18 मध्ये देशात 29 दशलक्ष वाहनांची निर्मिती करण्यात आली. याआधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्राने 14.78 टक्के वाढ नोंदवली. यापेक्षा जास्त गतीने देशाच्या वाहन उद्योगात वाढ होणे अपेक्षित असून देशाच्या कानाकोपऱ्यात ही वाहने वाहून नेण्याची झालेली गरज लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने अनेक पावले उचलली. परिणामी 2017-18 या वर्षात रेल्वेतून वाहनांच्या वाहतुकीत 16 टक्के वाढ नोंदवली गेली तर या वाहतुकीतून मिळणाऱ्या महसूलात 18 टक्के वृद्धी झाली. 2016-17 या वर्षाच्या तुलनेत ही वाढ नोंदवली गेली.
रेल्वे आणि वाहन उद्योग या दोन्ही क्षेत्रांना लाभदायक ठरणारी धोरणं विकसित करण्यासाठी वाहन उद्योगासमवेत रेल्वे काम करत आहे. यासंदर्भात संबंधितांच्या बैठकीनंतर त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे लक्षात घेऊन वाहन वाहतुकीसंदर्भातले एएफटीओ धोरण काहीसे शिथील करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन वाहन उद्योगाकडून वाहनांची ने-आण करण्यासाठी रेल्वे हे अग्रक्रमाची पसंती असलेले वाहतुकीचे साधन ठरेल.
B.Gokhale /N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1530618)