पंतप्रधान कार्यालय

लंडनमध्ये ‘‘भारत की बात, सबके साथ’’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसून जोशी यांच्याशी साधलेला संवाद

Posted On: 19 APR 2018 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2018

 

प्रसून जोशी - नमस्कार मोदी जी.

पंतप्रधान - नमस्ते. आपल्याला आणि सर्व देशवासियांना माझा नमस्कार.

प्रसून जोशी - मोदीजी, आपले अनेक कार्यक्रम आहेत आणि त्यामध्ये आपण खूपच व्यस्त आहात, हे आम्हां सगळ्यांनाच माहीत आहे. आणि असे असतानाही आम्ही आपला थोडा वेळ ‘चोरून’ घेतला आहे. म्हणून सर्वात प्रथम, आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. काही दिवसांपूर्वीच मी भारताविषयी लिहिलं होतं.

‘‘धरती के अंतस:  में जो गहरा उतरेगा, उसी के नयनों में जीवन का राग दिखेगा

धरती के अंतस:  में जो गहरा उतरेगा, उसी के नयनों में जीवन का राग दिखेगा

जिन पैरों में मिट्टी होगी,  धूल सजेगी,  उन्‍हीं के संग- संग इक दिन सारा विश्‍व चलेगा।‘‘

‘रेल्वे स्थानका’वरून आपल्या प्रवासाला प्रारंभ होतो आणि आज ‘रॉयल पॅलेस’मध्ये आपण विशेष अतिथी बनून आले आहात. या सगळ्या प्रवासाकडे मोदीजी, आपण कसे पाहता?

पंतप्रधान - प्रसून जी, सर्वात प्रथम तर मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. इतक्या प्रचंड संख्येने आलेल्या लोकांचे  दर्शन करण्याचे भाग्य आज मला मिळाले आहे. आणि आपण या चर्चेचा प्रारंभच धरणीमातेच्या धुळीकणापासून केली आहे. आपण तर कविराज आहात. ‘रेल्वे’पासून ते ‘रॉयल पॅलेस‘पर्यंत यमक जुळवून काव्य करणे आपल्या दृष्टीने खूपच सोपे काम आहे. परंतु आयुष्याचा मार्ग खूप कठिण, अवघड, खडतर असतो. रेल्वे स्थानकाची गोष्ट करायची झाली तर, ती माझी, स्वतःची व्यक्तिगत जीवनाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातल्या संघर्षमय काळातले ती एक स्वर्णिम पान आहे. त्या काळाने मला जगायला शिकवलं. संघर्ष करायला शिकवलं. आणि इतकंच नाही तर जगणं हे केवळ आपल्यासाठी नाही, तर इतरांसाठीही असू शकतं. ही गोष्ट मी रूळांवरून धावत असलेल्या रेल्वेकडून आणि तिच्या आवाजाकडून लहानपणी शिकलो, समजलो, ती गोष्ट माझी आहे. परंतु हा ‘राॅयल पॅलेस‘, हा काही नरेंद्र मोदींचा नाही. ही गोष्ट माझी नाही....

प्रसून जी - आणि जी आपल्या मनात भावना.....

पंतप्रधान - हा ‘रॉयल पॅलेस‘ आहे तो, सव्वाशे कोटी हिंदुस्तानींच्या संकल्पाचा परिणाम आहे. रेल रूळांच्या आवाजातून शिकणारा मोदी, हा नरेंद्र मोदी आहे. ‘रॉयल पॅलेस‘मध्ये आलेला हा सव्वाशे कोटी हिंदुस्तानींचा एक सेवक आहे, तो नरेंद्र मोदी हा नाही. आणि हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. भारताच्या घटनेचे सामर्थ्‍य  आहे. लोकशाहीमध्ये जर जनता-जनार्दन म्हणजे ईश्वराचे स्वरूप आहे. जनतेने निर्णय घेतला तर एक चहावालासुद्धा त्यांचा प्रतिनिधी बनून ‘रॉयल पॅलेस’ मध्ये हस्तांदोलन करू शकतो. हे सामथ्र्य लोकशाहीचे आहे.

प्रसून जी - ही जी व्यक्ती आणि नरेंद्र मोदी आहेत, जे पंतप्रधान आहेत, या देशाचे प्रतिनिधित्व करतात, तिथे दोघेही एकरूप होतात. अशा स्थानी आपण आहात, किंवा आपण जो प्रवास केला आहे, तो आता एकरस झाला आहे, सगळं एकत्र झालं आहे. आणि आता एकच व्यक्ती राहिली आहे का?

पंतप्रधान - असं आहे की, मी तिथं वेगळा असतंच नाही. आणि मी आदिशंकर यांच्या अव्दैताचा सिद्धांत जाणतो, जगतो. काही काळापूर्वी मी त्यांच्यांशी जोडलेला होतो. त्यामुळे मी जाणून आहे की, जिथं माणसाचं ‘मी’ पण उरत नाही, तिथं फक्त ‘तू आणि तूच’ असतो. जिथे व्दैत नाही तिथं व्दंव्दही नाही- व्दंव्द रहात नसते. आणि म्हणूनच इथे व्दैत नाही. मी माझ्यातल्या त्या नरेंद्र मोदीला वेगळं बरोबर घेवून जात असेल तर कदाचित मी देशावर अन्याय करेन. मी ज्यावेळी स्वतःला विसरून काम करतो, तेव्हाच देशाला न्याय देवू शकणार आहे. आपल्यातल्या ‘स्व’ला विसरून काम करावे लागते. स्वतः ‘खपावं‘ लागतं. असं आपण ‘स्व‘विसरून काम केले तरच ते रोपटे चांगले जोमदार वाढते. कोणतेही बीज ज्यावेळी मातीत मिसळते, तपते, खपते, त्याचवेळी त्यातून प्रचंड वृक्ष तयार होतो. आपण जे काही म्हणता आहात, त्याकडे मी थोडं वेगळ्या पद्धतीने पाहतो.

प्रसून जी - परंतु ज्यावेळी देशाची गोष्ट असते, त्यावेळी आपण त्याकडे खूप ‘फोकस‘ करून पाहता आणि आज सर्व लोक परिवर्तनाची चर्चा करीत आहेत. कोणतेही परिवर्तन प्रथम विचारांमध्ये येत असतो आणि मग त्यानुसार कृतीमध्ये उतरत असतो. यानंतर एक प्रक्रियेतून परिवर्तन घडत असते. ही गोष्ट आपल्यापेक्षा सर्वात चांगल्या पद्धतीने कोणाला ठावूक असणार? परंतु परिवर्तन होत असताना, आपल्याबरोबर आणखी एक गोष्टही घेवून येत असतो , मोदीजी- आणि ती म्हणजे, अधीरता, आतुरता, मनाची उलघाल. मला नेमकं काय म्हणायचे आहे, हे दाखवणारी एक ध्वनिचित्रफीत आपण पाहू या.

मोदीजी, आत्ताच आपण सर्वांनी पाहिले आणि ‘व्टिटर‘वर प्रशांत दीक्षितजी आहेत. त्यांनी एक प्रश्नही विचारला आहे की, कामे खूप होत आहेत. रस्ते बनवले जात आहेत, लोहमार्ग टाकले जात आहेत, अतिशय वेगाने घरकूल निर्माणाचे कार्य होत आहे. ते असं म्हणतात की, आधी आम्हाला जर दोन पावलं चालण्याची सवय होती,तर आता मोदीजींच्यामुळे आम्ही कितीतरी पट जास्त चालत आहोत. तरीही आणखी इतकी अधीरता, आतुरता का आहे... लोकांक्षा अपेक्षांकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता?

पंतप्रधान - या गोष्टीकडे मी थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतो. ज्या क्षणसी तुमच्या मनामध्ये तृप्ततेचे भाव निर्माण होतात - आता खूप झालं. जे आहे, त्यामध्येच आपण सुखा समाधानामध्ये राहू, पूरे झालं. असा विचार केला तर जीवनामध्ये त्याच्यापुढे प्रगती केली जात नाही. प्रत्येक वयामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक अवस्थेपमध्ये काही ना काही तरी नवीन करण्याची, नवीन मिळवण्याची उर्मी आपल्या आयुष्याला गती देणारी असते. नाहीतर मला वाटतं, की आयुष्य एका जागी थांबलं आहे. आणि जर कोणी अधीरता, आतुरता ही वाईट गोष्ट आहे, असे समजत असेल तर मला वाटतं, ती व्यक्ती वृद्ध झाली आहे. माझ्या दृष्टीने अशी अधीरता असणे हे तरूणाईचे परिचय देणारे आहे. आपण पाहिलं असेल, अनुभवलं असेल, ज्याच्या घरामध्ये सायकल आहे, त्याच्या मनात स्कूटर घेण्याची इच्छा असते. स्कूटर असेल तर त्याच्या मनात चारचाकी गाडी घरी आली तर चांगले होईल, अशी इच्छा बाळगून असतो. आणि जर अशी मनात आस, इच्छा नसेल तर उद्या समजा त्याची सायकलच गेली तर तो विचार करेल, अरे, गेली तर गेली सायकल. चला आता बसने जावूया. याला काही जीवन म्हणत नाहीत.

आणि मला आनंद होतो की, आज सव्वाशे कोटी देशवासियांच्या मनामध्ये एक उमंग, उत्साह, आशा, अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आधीच्या एका कालखंडामध्ये  सगळे निराशेच्या जणू खोल गर्तेमध्ये बुडाले होते. इतकंच नाही तर, अशी परिस्थिती आहे, मग आता काय करणार, द्या सोडून. ही परिस्थिती तर काही बदलणार नाही. असंच सुरू राहणार, काही बदल घडणार नाही. असा  विचार केला जात होता. आणि मला आता आनंद वाटतो की, आम्ही एक वातावरण तयार केले. लोकांनाच आता आमच्यापेक्षा जास्त अपेक्षा वाटत आहेत.

आपल्यापैकी जे लोक खूप आधी भारतातून बाहेर पडले आहेत, त्यांना तर कदाचित माहितीही नसेल की, 15-20 वर्षांपूर्वी ज्यावेळी देशात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत होती, त्यावेळी गावातले लोक सरकारी कार्यालयामध्ये जावून एक निवेदन सादर करीत होते. यंदाच्या वर्षी गावामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे तर आमच्या गावा माती, चर खोदण्याची कामे जरूर सुरू करण्यात यावीत. गावामध्ये रस्त्यावर माती घालण्याचे काम आम्ही करू इच्छितो, या कामामुळे आमच्या गावात रस्ता तयार होईल, तरी दुष्काळी काम सुरू करावे. अशी मागणी गावकरी करीत होते. त्याकाळात कामासाठी, रस्त्यासाठी दुष्काळ पडण्याची अधीरतेने गावकरी करत होते. दुष्काळामुळे गावात खोदकाम सुरू होईल, रस्ते बनतील, काम मिळेल, असा विचार लोक करीत होते.

आज माझा अनुभव आहे की, मी ज्यावेळी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी ज्या गावांमध्ये एकेरी मार्ग आहे, ते म्हणायचे, अरे मुख्यमंत्रीजी जर दुपदरी मार्ग बनवा की, आता दुपदरी मार्ग झालाच पाहिजे. दुपदरी मार्ग बनवून झाल्यानंतर म्हणायचे साहेब, पेवर रस्ता असलाच पाहिजे. पेवर मार्ग बनवला पाहिजे.

काही गोष्टी माझ्या अगदी बरोबर आठवणीत राहतात. गुजरातच्या अगदी एका टोकाला असलेल्या उच्छल निझर या तहसीलमधले काही वाहनचालक लोक एकदा मला भेटायला आले होते. ते म्हणत होते की, आमच्या गावामध्ये पेवर मार्ग बनवला पाहिजे. मी म्हणालो, अरे बंधुंनो, तुमच्या भागामध्ये मी कितीतरी काळ स्कूटरवरून फिरलो आहे. मी बसनेही येत होतो. अनेक वर्षे मी या जंगलांमध्ये काम केलं आहे. आणि सर्वात महत्वाचं तुमच्या गावामध्ये चांगला रस्ता तर आहेच.

यावर त्या लोकांचे म्हणणे होते की, साहेब आम्ही आता केळ्याची शेती करतो. आणि आमची केळी निर्यात होतात. या रस्त्यावरून आमचा केळे भरलेला ट्रक जातो, त्यावेळी आमची केळी दबून जातात. आमचे 20 टक्के नुकसान होते. त्यामुळे आम्हाला पेवर मार्ग हवा आहे. पेवरमुळे आमच्या केळींचे नुकसान होणार नाही. माझ्या देशातल्या प्रवासासाठी अशा प्रकारची अधीरता निर्माण होणे, ही माझ्यासाठी प्रगतीचे एक नवीन बीजारोपण आहे, असे मी मानतो. आणि म्हणूनच अधीरता, आतुरता वाटणं, निर्माण होणं ही काही वाईट गोष्ट आहे, असं मी अजिबात मानत नाही.

दुसरे उदाहरण देतो. हे तर आपल्या कुटुंबामध्येही दिसू शकते. जर एखाद्याला तीन मुलगे असतील, तर त्या तीनही अपत्यांवर आई-वडील प्रेम, माया करीत असतात. परंतु जर काही काम असेल, तर बरेचदा एकालाच सांगितलं जातं. अरे बेटा, जर हे करून दे बरं. जो काम करतो, त्यालाच सारखं काम सांगितलंही जाणार ना? जर आज संपूर्ण देश माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवत असेल, तर त्यामागे कारण आहे की, त्यांना मी काम करेन असा विश्वास आहे. आज नाही तर उद्या तरी मी त्यांचे काम करेन. या माणसाच्या एकदा का डोक्यात हा विषय घुसवला की, कधीतरी त्याच्याकडून ते काम होणारच, केल्याशिवाय मी शांत बसणारच नाही, असा विश्वास लोकांना आहे.

असं असेल तर मी मला वाटतं की, ही गोष्ट तर जास्तच चांगली आहे. देश इतक्या वेगाने काम, प्रगती करू शकेल, असा कधी देशानंही विचार केला नसेल. आपल्याला दरवर्षी किंवा ठराविक काळाने पगारवाढ मिळते, हीच आपली ‘प्रगती’ असं आधी मानलं जात होतं. आणि विशेष म्हणजे त्या अल्पशा वेतनवाढीमध्ये आनंद मानला जात होता. जावू दे, जे झालं ते झालं! असा विचार केला जात होता. परंतु आता असं नाही. आधी एका दिवसामध्ये रस्त्याचे जितके काम होत होते, त्यापेक्षा तिप्पट काम, आता तेच कामगार, तेच अधिकारी करीत आहेत. लोहमार्ग टाकण्याचे काम असो किंवा लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम असो, सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचे काम असो अथवा शौचालय बनवण्याचे, असे काहीही काम असो, या प्रत्येक कामांचा वेग आता वाढला आहे. आणि म्हणूनच स्वाभाविक आहे, देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत कारण त्यांचा आता सरकारवर विश्वास आहे.

प्रसून जी - अगदी बरोबर आहे, तुमचं. म्हणजे आता असं वाटतंय की, आधी रस्ता त्यांच्यापर्यंत जात, पोहोचत होता आणि ज्यावेळी त्यांच्यापर्यंत रस्ता पोहोचला आहे, त्यांना आता दुनियेपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. म्हणजेच या अनेक आशा, अपेक्षा  आहेत. त्या जागृत करण्याचे काम आपण केल्याची चर्चा आपण आत्ता केली. आणि या अधीरतेलाही आपण अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. त्याची सकारात्मक बाजू आहे, ती आपण मांडली. अधीरता हे प्रकारे प्रगतीचे, पुढे जाण्याचे द्योतक आहे, हेही आपण आम्हाला समजावून सांगितले आहे.

मोदीजी, लोकांमध्ये असलेली अधीरता ही एका बाजूला आहे. परंतु  आपणही कधी असेच अधीर होता का? ज्या सरकारी व्यवस्थेबरोबर आपण काम करता, त्यांच्याबाबतीत तुम्ही अधीर, उत्सुक होता का? कामकाज करण्याची एक विशिष्ट सरकारी पद्धत असते, त्यामुळे तुम्ही कधी निराश होता का? कोणतेही काम मोदीजींच्या हिशेबाप्रमाणे होत नाही, अपेक्षित वेगाने कामे होत नाहीत? आपल्या मनात तर अतिवेगाने कोणत्याही योजना येतात आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, असे तुम्हाला वाटत असते, असा आपला बुलेट टेªनचा वेग, आणि त्यांची काम करण्याची पद्धत, नेमकं काय घडतं अशावेळी?

पंतप्रधान - आपल्यामध्ये असलेल्या कवीच्या आतमध्ये एक पत्रकारही लपलेला आहे, हे मला माहीतच नव्हतं. मला असं वाटतं की, माझ्या मनामध्ये असलेली अधीरता, उत्सुकता ज्या दिवशी संपुष्टात येईल, त्यादिवशी मी या देशाच्या दृष्टीने  निरूपयोगी ठरणार आहे. म्हणूनच माझ्या आतमध्ये असलेली ही अधीरता कायम अशीच रहावी, अशी माझी इच्छा आहे. कारण सगळ्या बाबतीत असलेली उत्सुकता, अधीरताच माझी ऊर्जा आहे. तीच मला ताकद, शक्ती देतात. मला धावपळ करायला भाग पाडतात. मी रोज रात्री झोपण्यासाठी ज्यावेळी पाठ टेकतो, त्यावेळी दुस-या दिवशीचे स्वप्न उशाशी घेवून झोपतो आणि सकाळी उठतो, तोच त्या स्वप्नपूर्तीच्या कामाला लागतो.

आणि आपण निराशेविषयी प्रश्न केलात, त्याविषयी सांगतो. मला वाटतं की, ज्यावेळी आपल्याला स्वतःसाठी काही घ्यायचे, काही कमवायचे, काही विशेष बनायचे असेल तर त्याचा संबंध आशा आणि निराशेबरोबर जोडला जातो. परंतु ज्यावेळी आपण ‘ सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय‘ असा संकल्प करून कार्य करायला लागता, त्यावेळी मला वाटत की, कधीही निराश होण्याचे कारणच निर्माण होणार नाही.

काही लोकांना कधी वाटतं की, चला, जावू दे काहीही चांगलं होणार नाही, द्या सोडून. सरकार बेकार आहे. हे सगळे नियम बेकार आहेत. कायदा काही कामाचा नाही. नोकरशाही अगदीच बेकार आहे. काम करण्याची पद्धत अयोग्य, बेकार आहे. आपल्याला असे बोलणा-या लोकांचा एक समूहच भेटेल. हे लोक सातत्याने असेच सगळं काही बेकार आहे, असं म्हणत असतात. मी मात्र यापेक्षा वेगळ्या, दुस-या प्रकारचा माणूस आहे. जर एक ग्लास अर्धा भरला असेल तर त्याकडे पाहून एखादा व्यक्ती तो ग्लास अर्धा रिकामा आहे, असं म्हणू शकतो. तर अर्धा ग्लास भरलेला आहे, असंही म्हणणारा दुसरा      माणूस असू शकतो. म्हणजे एकाच्या दृष्टीने ग्लास अर्धा भरलेला, तर दुस-याच्या नजरेने ग्लास अर्धा रिकामा आहे.   मला जर कोणी विचारले तर मी म्हणेन, ग्लास अर्धा पाण्याने भरला आहे, आणि अर्धा हवेने भरला आहे.

आणि म्हणूनच आता आपणच पहा. तेच सरकार, तेच कायदे, तीच नोकरशाही, काम करण्याची पद्धतही तीच आहे. कोणताही बदल झालेला नसतानाही चार वर्षांची हिशेब मांडायचा झाला तर फरक नक्कीच जाणवण्यासारखा आहे. इतर कोणत्याही सरकारच्या कामावर टीका करण्यासाठी मी या व्यासपीठाचा उपयोग करणार नाही आणि असं मी करणंही योग्य ठरणार नाही. परंतु काही गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक असते. गेल्या दहा वर्षांमध्ये ज्याप्रकारे काम होत होते, ते पाहिल्यानंतरच अलिकडच्या चार वर्षात कसे काम झाले आहे, हे समजणार, लक्षात येणार आहे. अशा तुलनात्मक अभ्यासातूनच आपल्या लक्षात येईल की, त्यावेळी निर्णय प्रक्रिया कशी होती, आजची निर्णय प्रक्रिया कशी आहे. त्यावेळी केली जाणारी कृती,कार्य कसे होते आणि आजची कृती कशी आहे. आपल्याला या दोन्हीमध्ये अगदी ‘जमीन - आसमान‘ याप्रमाणे फरक दिसून येईल. याचाच अर्थ असा आहे की, जी व्यवस्था अस्तित्वात आहे, तिच्याच माध्यमातून काम करताना जर आपल्याकडे स्पष्ट नीती असेल, आपला हेतू स्वच्छ असेल, काम करण्याचा ठाम निर्धार असेल आणि ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय‘ कार्य करण्याचा निश्चय असेल तर, याच व्यवस्थेमध्ये राहून आपण अपेक्षित, इच्छित परिणाम साध्य करू शकता.

हा विचार माझ्या मनात अगदी कायमचा घर करून बसला आहे. आपली जी जी इच्छा आहे, ती ती पूर्ण झालीच पाहिजे, किेंवा होणारच आहे, असं तर कधीच होणार नाही. हे तर नक्कीच आहे. परंतु मी त्यामुळे कधीच निराश, नाराज होत नाही. कारण, मी ते काम का झालं नाही, त्याच्यामागच्या कारणांचा शोध घेत असतो. कारणांचा विचार करत असतो. आणि भविष्यात ते काम करण्याचा मार्ग कसा मोकळा होवू शकेल, याचा छडा लावतो.  यावेळी हे काम करताना आपण या मार्गाचा अवलंब केला होता.  आता तेच काम वेगळ्या, नव्या पद्धतीने केले पाहिजे, असा विचार मी करतो आणि त्याची अंमलबजावणीही करतो.

प्रसून जी - मोदीजी, या टप्प्यावर आपल्याकडे एक प्रश्न आला आहे, त्याचे उत्तर आपण द्यावे, असं माझी इच्छा आहे. हा प्रश्न काय आहे हे, आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार     आहोत. प्रियंका वर्मा या दिल्लीमध्ये वास्तव्य करतात, त्यांनी आपल्यासाठी एक प्रश्न विचारला आहे. पाहू या -

प्रियंका - मोदीजी, मी प्रियंका, दिल्लीची आहे. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की, आम्ही सरकार का निवडतो? तर आम्ही निवडलेल्या सरकारने आमच्यासाठी काम करावे. परंतु  ज्यावेळेपासून आपले सरकार आले आहे, त्यावेळेपासून तर सगळी कार्यपद्धतीच पूर्णपणे बदलली गेली आहे. आपण तर सरकारच्या बरोबरीने आमच्यासारख्या लोकांनाही कामाला लावले आहे. अर्थात ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे की, असे आधी का होत नव्हते? धन्यवाद.

प्रसून जी- हा प्रश्न विचारला आहे तो असा आहे की, आपण काम करताना सरकारच्या बरोबरीने लोकांनाही जोडत आहात. यामध्ये मग स्वयंपाकाच्या गॅससाठी दिले जाणारे अनुदान असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत असेल, जनतेचाही त्यामध्ये सहभाग असावा, असे आपल्याला वाटते. आपण जनतेकडून खूप अपेक्षा ठेवता. तर ही काम करण्याची आपली पद्धत अशी वेगळी कशी का आहे?

पंतप्रधान - प्रियंकाजींनी खूप चांगला प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर मी देतो. यासाठी आपण 1857 पासून ते 1947 पर्यंतचा काळ विचारामध्ये घेवू. त्याआधीच्या काळाचाही विचार करू शकतो. परंतु मी 1857 विषयी आत्ता बोलतो. 1857 मध्ये ज्यावेळी पहिला स्वतंत्रता संग्राम झाला, ते हे वर्ष. या काळातले कोणत्याही वर्षाचा विचार करा. शतकभरातले कोणतेही वर्ष विचारात घ्या. हिंदुस्तानातल्या कोणत्याही कानाकोप-यात जा. प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी तरी या देशासाठी हौतात्म्य पत्करलेले असल्याचे दिसून येईल. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावून काही ना काही केलेली अनेक महान लोक आहेत. कोणा एखाद्या नवयुवकाने आपले आयुष्य तुरूंगवासामध्ये काढले आहे. मला याचा अर्थ हा सांगायचा आहे की, स्वातंत्र्याचा संघर्ष कोणत्याही काळात, देशाच्या कोणत्याही भागामध्ये थांबला नाही. सतत संघर्ष सुरूच होता. लोक येत होते, लढत होते, हौतात्म्याचे मूल्य चुकते करत होते आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाची मशाल धगधगती राहत होती.

परंतु महात्मा गांधींनी काय केलं? महात्मा गांधीजींनी या संपूर्ण भावनेला एक नवीन रूप बहाल केले. त्यांनी या लढ्यामध्ये सर्वसामान्यांना जोडले. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला ते म्हणायचे, बाबा रे, तुला देशाला स्वतंत्र करायचे आहे ना? मग असं कर- तू हा झाडू हातात घे आणि स्वच्छतेचं काम कर. देशाला स्वातंत्र्य मिळेल. तुला स्वांतत्र हवे ना, मग तू शिक्षक म्हणून काम कर. अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना शिकव, देशाला स्वातंत्र्य मिळेल. तुम्ही प्रौढ शिक्षणाचे काम करू शकता ना, मग तेच करा. तुम्ही खादीचे काम करू शकता का, मग करा. तुम्ही नवयुवकांना एकत्रित करून प्रभातफेरी काढू शकता का, चालेल. काढा प्रभातफेरी.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला जनआंदोलनामध्ये परावर्तीत केले. जनसामान्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम दिले. तुम्ही चरखा घेवून बसा, सूतकतई करा, देशाला स्वातंत्र्य मिळेल. आणि लोकांनाही विश्वास वाटत होता की, स्वातंत्र्य असेही सगळे केल्यानंतर मिळू शकते.

मला असं वाटतं की, प्राणांची बाजी लावणारे या देशात काही कमी नव्हते. देशासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून जीवावर उदार होणा-या लोकांची संख्या कमी नव्हती. असे लोक येत होते, हौतात्म्य पत्करत होते. आणि मग पुन्हा आणखी कोणी नवीन येत होता. हुतात्मा होत होता.

गांधीजींनी एकाच वेळी हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये कोटी -कोटी लोकांना उभं केलं त्यामुळे स्वातंत्र्य मिळणे सुकर, सोपे झाले. विकासाचेही असेच आहे. एखाद्या अभियानाचे, मोहिमेचे जनआंदोलन बनले पाहिजे, असे मला वाटते.सरकार देशाला बदलून टाकेल, सरकारच विकास करेल, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात असे वातावरण तयार झाले की, आता देश स्वतंत्र झाला आहे, यापुढे जे काही करायचे असेल ते सरकार करेल, असा विचार सर्वजण करू लागले. अगदी गावामध्ये एखादा खड्डा आहे, किंवा गावात एखादा खड्डा पडला तरी लोक एकत्रित येतात, निवेदन तयार करतात, भाड्याने एखादी जीप घेतात आणि तहसील कार्यालयामध्ये जावून निवेदन देतात. गावकरी वर्गाची इच्छा असती तर  जीप भाड्याने घेण्याच्या खर्चात तर तो खड्डाही भरून काढता आला असता. परंतु एकच भावना, जे काही करायचे असेल ते आता सरकारलाच करू दे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये असेच वातावरण तयार झाले. ही सगळी कामे कोण करणार तर, सरकार करणार. यामुळे नेमकं झालं काय तर, सरकार आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाली. दोघांमध्ये अंतर पडत गेले. आपण पाहिलं असेलच, बसमधून प्रवास तर अनेकजण करतात. आपणही कधी हा अनुभव घेतला असेल. बसमध्ये एखादेवेळी प्रवासी एकटा असतो. आजूबाजूला कोणी इतर प्रवासी नसतो. त्यालाही करायला काही काम नसते. प्रवासाचा वेळ घालवायचा कसा आणि रस्ता संपत नसतो. अशावेळी तो काय करतो, आपलं बोट बसच्स सीटमध्ये घालतो, छिद्र पाडतो, वेळ घालवण्यासाठी कुरडत राहतो, त्या छिद्राचे मोठी चीर होते, हा फाडत राहतो. अर्थात हे सगळं का घडतं? तर त्याला माहीत असते, ही बस काही आपली कोणाची नाही. तर सरकारची आहे. मग बसचे सीट फाडले तर माझं कुठं नुकसान होणार आहे? असा विचार तो करतो. जनतेच्या मनामध्ये हे सरकार माझे आहे, हा देश माझा आहे, ही भावनाच लुप्त होत गेली आहे.

मला असं वाटतं की, देशामध्ये ही भावना आता जागृतच नाही तर प्रबळ झाली पाहिजे. दुसरे म्हणजे, लोकशाही. हे म्हणजे काही करारपत्र, करारनामा नाही. मी आज ठप्पा मारला, मत दिले, आता या माणसाला पाच वर्षे काम करू दे. पाच वर्षांनंतर विचारलं जाईल की, काय काम केलंस बाबा,  नाही तर दुसरी व्यक्ती आणण्यात येईल. हा काही कामगार करार नाही. हे तर भागीदारी, सहभागीतेचे काम आहे. आणि म्हणूनच मला सहभागीता असलेली लोकशाही महत्वाची वाटते. त्यावर जोर देण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. आणि आपण सगळ्यांनीच अनुभवले असेल की, ज्यावेळी कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळी सरकारपेक्षा समाजाची शक्ती चांगल्याप्रकारे एकवटली जाते आणि आम्ही त्या अतिशय कठीण प्रसंगामध्ये, निर्माण झालेल्या समस्येला उत्तर शोधतो. ते कसे काय? कारण ही एकत्रित झालेली ताकद ही जनता - जनार्दनाची ताकद असते. तिच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. लोकशाहीमध्ये जनतेवर जितका जास्त विश्वास ठेवला जाईल, जनतेला जास्तीत जास्त सहभागी करून घेतले जाईल, तितके चांगले आणि लवकर परिणाम दिसून येतात.

सरकार सत्तेवर आल्यानंतर मी शौचालये बनवण्याची मोहीम सुरू केली. आपण कल्पना करू शकाल, इतक्या मोठ्या संख्येने सरकार शौचालये बनवू शकले असते का? सरकार आधी पाच हजार शौचालये बनवत असेल तर आता दहा हजार बनवू शकेल. आणि वर असं सांगितले जाईल की,‘‘ अरे, या आधीचे सरकार तर पाच हजारच बनवत होते, मोदी सरकार तर दुप्पट, दहा हजार शौचालये बनवत आहे’’. मला सांगा दहा हजारांनी काम पूर्ण होणार आहे का? जनतेने निश्चय केला आणि काम पूर्ण झाले.

आणि आता जनतेची ताकद किती असते पहा, भारतामध्ये ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटामध्ये सवलत मिळते. आमचे सरकार आल्यानंतर मी म्हणालो, की आपल्याला जो आरक्षणाचा अर्ज भरावा लागतो, त्यामध्ये असे स्पष्ट लिहा की, मी वयाने ज्येष्ठ नागरिक आहे, परंतु मला जी सवलत मिळते, ती मी घेवू इच्छित नाही. हे किती साधे होते. पंतप्रधान म्हणून काही मी हे आवाहन अजिबात केले नव्हते. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की, हिंदुस्तानची विशेषता काही वेगळीच आहे. हिंदुस्तानमधील सर्व सामान्य माणसाच्रूा मनामध्ये देशभक्ती खूप आहे. त्याचे दर्शन अशा वेळी होते. अलिकडेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तर आत्तापर्यंत 40 लाख ज्येष्ठ नागरिकांनी, अगदी जे लोक वातानुकुलित वर्गामधून प्रवास करतात, त्यांनी आपल्याला अशा प्रकारची सवलत दिली नाही तरी चालेल. असे लिहून दिले आहे. आणि आम्ही पूर्ण पैसे देवून तिकीट खरेदी करून प्रवास करू, असे स्पष्ट केले आहे.

आता हीच गोष्ट मी कायदा, नियम म्हणून केली. म्हणजे आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीमध्ये रेल्वे तिकीट मिळणार नाही, त्यांना दिला जाणारा लाभ बंद करण्याचा नियम केला असता, तर काय झालं असतं? मोर्चे काढण्यात आले असते, बंद घडवून आणला असता, पुतळे जाळले असते आणि मग? मग काय लोकप्रियतेच्या क्रमवारीमध्ये मोदींचे स्थान एकदम खाली गेले असते. अशी क्रमवारी लावत असलेल्यांची दुकानदारी चांगली चालली असती. परंतु झालं काय हे आपण पाहिलंच असेल. 40 लाख लोकांनी आपल्याला सवलतीची आवश्यकता नसल्याचं लिहून दिलं आहे.

एके दिवशी मी लालकिल्ल्यावरून आवाहन केलं की, ज्या लोकांना शक्य असेल, परवडणार असेल, त्यांनी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान का घ्यायचे? आपल्या देशामध्ये गॅस सिलेंडरच्या संख्येच्या आधारावर निवडणूक लढवली जात होती. कोणी म्हणायचे तुम्ही मला पंतप्रधान बनवा, आत्ता तुम्हाला 9 गॅस सिलेंडर मिळतात ना, मग मी पंतप्रधान झालो तर तुम्हाला 12 सिलेंडर देईन. मी मात्र, 2014 मध्ये लालकिल्ल्यावरून अगदी उलट आवाहन जनतेला केले. जर तुम्हाला अनुदानाची गरज नाही आहे ना, मग सोडून द्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, हिंदुस्तानामधल्या जवळपास सव्वा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांनी गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून दिले आहे. आपल्या देशामध्ये प्रामाणिक लोकांची संख्या काही कमी नाही. देशासाठी मरण्यासाठी सिद्ध असणारे असंख्य आहेत. तसेच देशासाठी काही ना काही करणारांची संख्याही कमी नाही.

आम्हा लोकांचे कार्य आहे, ते म्हणजे देशाचे सामथ्र्य कशात आहे ते समजून घेणे, त्यांना जोडणे, आणि माझा प्रयत्न असतो, की आम्ही म्हणजे सरकारनेच देश चालवला पाहिजे. हा जो एकप्रकारचा अहंकार निर्माण झाला आहे ना, तो अहंकारच सरकारने सोडून दिला पाहिजे. जनता -जनार्दन हीच खरी शक्ती आहे. त्यांना बरोबर घेवून पुढे चालले पाहिजे. असे केले तर आपल्याला जसा हवा आहे, तसाच परिणाम ही जनताच आणून देणार आहे. आणि म्हणूनच मी जनतेला बरोबर घेवून, त्यांच्याशी मिळून, मिसळून, त्यांचे विचार नेमके काय आहेत, हे जाणून घेवून काम करतो आणि पुढे जातो आहे.

प्रसून जी - अरे व्वा! मोदीजी, जुन्या दोन ओळींचे स्मरण झाले आहे. सरकार आणि जनता यांच्यामध्ये जे अंतर पडले होते, त्याविषयी या ओळी आहेत-

कि हम नीची नजर करके देखत हैं चरण तुमरे,

तुम जाइके बैठे हो इक ऊंची अटरिया मां।

पंतप्रधान - मी तर जनता -जनार्दनाला एकच प्रार्थना करतो की, आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा, कमीत कमी मला ती सवय लागणार नाही.

प्रसून जी - मोदीजी, अगदी बरोबर आहे. आता यानंतर आपण प्रेक्षकांमधून प्रश्न घेणार आहे. आपण, हां- हां जरूर आपण काही बोलावं.

प्रेक्षकांमधून एक प्रश्न विचारण्याची विनंती आली होती. श्री. मयूरेश ओझानी जी एक प्रश्न विचारू इच्छित आहेत. मयूरेश ओझानी जी आपला प्रश्न विचारावं. कृपया या बाजूला येवून प्रश्न विचारावा.

प्रश्नकर्ता - नमस्ते जी, मोदी जी. ज्यावेळी आपण सर्जिकल स्ट्राईक करण्याचा अतिमहत्वपूर्ण, ऐतिहासिक निर्णय आणि अतिशय धाडसी पावूल उचलण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आपल्या मनात नेमक्या कोणत्या भावनांनी गर्दी केली होती?

प्रसून जी - सर्जिकल स्ट्राईकविषयी आपण प्रश्न केला आहे.

पंतप्रधान - मी आपला आभारी आहे. आपण आपल्या भावना बोलून व्यक्त करू शकत नव्हता,  परंतु आपण जी कृती केली त्यावरून मला बरेच काही समजले. त्याचबरोबर आपल्या सहकारीनेही तुमच्या मनातली भावना माझ्यापर्यंत पोहोचवली.  एक तर हे दृश्यच खूप हृदयाला, मनाला भिडणारे आहे. माझ्या मनालाच जणू त्याने स्पर्श केला आहे. भगवान रामचंद्रजी आणि लक्ष्मण यांचा एक संवाद आहे. लंका सोडताना असलेल्या या संवादामध्ये आपल्याला  काही सिद्धांताचे दर्शन होते. परंतु ज्यावेळी जर कोणी दहशतवाद्यांना निर्यात करण्याचा उद्योग बनवत असेल आणि माझ्या देशाच्या निरपराध नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत असेल, युद्ध लढण्याची ताकद नसतानाही जर कोणी पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर या मोदीला, त्याच भाषेमध्ये कसे उत्तर द्यायचे असते, हे चांगलेच माहीत आहे.

आमच्या जवान रात्रीच्यावेळी तंबूमध्ये झोपले असताना, काही पळपुट्यांनी येवून त्यांना मृत्यूशी सामना घडवला. हे बरोबर आहे का? असं घडल्यानंतर आपल्यापैकी कोणीतरी गप्प बसू शकणार आहे का? त्यांना जशास तसे, चोख प्रत्युत्तर देण्याची गरज होती की नाही? आणि म्हणूनच आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले. आणि मला माझ्या लष्करावर अतिशय गर्व आहे. माझ्या जवानांचा मला गर्व वाटतो. जी काही योजना बनवली होती, तिची अगदी शंभर टक्के, अगदी एक तसूभरही चूक न करता त्यांनी यशस्वीपणे अंमलबजावणी केली. आणि इतकेच नाही तर सूर्योदय होण्यापूर्वीच सगळेजण परतलेही होते. आणि आमच्या मनाचा मोठेपणाही तुम्हाला समजला पाहिजे. जे अधिकारी या संपूर्ण योजनेमध्ये सहभागी झाले होते, त्यांना मी सांगितले की, आता आपण जे काही केले आहे, ते संपूर्ण हिंदुस्तानला समजण्याआधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तिथं पोहोचण्यापूर्वीच, पाकिस्तानच्या लष्कराला फोन करून सांगा की, आज रात्री आम्ही हे कृत्य केले आहे, तुमच्या सैनिकांचे मृतदेह तिथे पडली असतील, जर का तुमच्याकडे वेळ असेल तर जावून घेवून या.

आम्ही सकाळी 11 वाजता त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करीत होतो. तर फोनवर येण्यासाठी, बोलण्यासाठी ते घाबरत होते. बोलायला येत नव्हते. एकीकडे मी सर्व पत्रकारांना बोलावून ठेवलं होतं. आमच्या लष्कराचे अधिकारी उभे होते. पत्रकारांना आश्चर्य वाटत होतं. नेमकं काय घडलं आहे, कोणालाच समजत नव्हतं. कोणीही बोलत नव्हतं, काही सांगत नव्हतं.

मी म्हणालो, पत्रकार बसले आहेत, तर आणखी थोडावेळ त्यांना तसंच थांबवून ठेवावं. ते थोडेसे नाराज होतील. परंतु आधी पाकिस्तानला ही गोष्ट सांगावी. आम्ही जी गोष्ट केली आहे, ती थेट सांगावी, काहीही लपवण्याची गरज नाही. 12 वाजता ते फोनवर आले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांना आम्ही सांगितले की, काल रात्री आम्ही अशा प्रकारे हल्ला केला आहे. आणि यानंतरच आम्ही हिंदुस्तानच्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना आणि संपूर्ण दुनियेला माहिती दिली. भारत आणि भारताच्या लष्कराला हे करण्याचा अधिकार होता. आम्हाला न्याय मिळवण्याचा अधिकार होता, तो आम्ही मिळवला आणि हल्ला केला. आम्ही केलेला सर्जिकल स्ट्राईक म्हणजे भारताच्या शूरवीर जवानांचा पराक्रम होताच, यामध्ये कोणतीच शंका नाही. परंतु दहशतावादाचा निर्यात करत असलेल्यांना समजले पाहिजे की, आता हिंदुस्तान बदलला आहे.

प्रसून जी - मोदीजी, आपण पराक्रमाची चर्चा केली, लष्कराच्या कामगिरीची गोष्ट केली. लष्कराने इतका मोठा त्याग केला असूनही या क्षेत्रामध्ये आपण राजकारणाचा प्रवेश होत असल्याचे दिसून येते. लष्कराने दाखवलेल्या अफाट शौर्याबद्दलही लोक प्रश्नचिन्ह दाखवण्यास तयार असतात. या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता?

पंतप्रधान - असं आहे पहा, या व्यासपीठाचा उपयोग मी राजकीय प्रतिस्पर्धकांवर टीका करण्यासाठी करू इच्छित नाही, असं पुन्हा एकदा नमूद करतो. आणि मी इतकंच म्हणतो की, ईश्वराने सर्वांना सद्बुद्धी द्यावी.

प्रसून जी - मोदीजी, आत्तापर्यंत आपण परिवर्तनाची चर्चा केली. अधीरतेची, उत्सुकतेची चर्चा केली. असं म्हणतात की, जिथे रवि पोहोचत नाही, तिथं कवि पोहोचतात. कवी असल्यामुळे मी हे म्हणतोय, असं नाही. परंतु विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचली तरच खरी प्रगती झाली आहे, असं म्हणता येणार आहे. आपल्या बोलण्यामध्ये आज आलेच की, कोणतीही संस्कृती, सभ्यता स्वतःविषयी गर्व करीत नाही. आपण समाजामधल्या ज्येष्ठांविषयी बोललो, इतर सामाजिक घटकांविषयी बोललो. मात्र या समाजातल्या अगदी शेवटच्या स्तरापर्यंत, शेवटच्या घटकाचा विचार केला गेला नाही तर  संस्कृती योग्य ठरणार नाही.

कार्यक्रमाच्या या भागामध्ये आम्ही अशा वर्गाविषयी बोलणार आहोत की, आपल्याला हा वर्ग माहीत असतो, तरीही आपले कधी फारसे लक्ष त्या वर्गाकडे जात नाही. खूप मोठमोठ्या योजनांच्या गोंधळामध्ये ज्यांच्या हिताकडे कुणाचेही फारसे लक्ष जात नाही. जणू त्यांचे हित हरवून जाते. ज्याप्रमाणे ढोलाच्या गगनभेदी आवाजापुढे बाँसुरीचा स्वर कुणाच्याही कानावर पडत नाही. तसे या घटकाचे होते. चला आपण काही प्रतिमा पाहू या.

मोदीजी, आपण लालकिल्ल्यावरून प्रथमच शौचालयाचा मुद्दा मांडला. कोणत्याही पंतप्रधानाने अशा प्रकारे पहिल्यांदाच सर्वांना खूप छोटा वाटणारा परंतु प्रत्यक्षात अतिशय महत्वाचा असलेला मुद्दा बोलून दाखवला, त्याला प्राधान्य दिले, हे आम्ही पाहिले आहे. आता मुद्यांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. अशाप्रकारे  कोणत्या मुद्याला प्राथमिकता दिली पाहिजे, याचा निर्णय आपण घेता का? आणि हा निर्णय कशाप्रकारे घेतला जातो, आणि हे मुद्दे प्राधान्यक्रमामध्ये कसे काय वर आले?

पंतप्रधान - असं आहे की, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे कोणत्याच सरकारने या विषयांकडे लक्ष दिले नाही, असं तर मी म्हणणार नाही. असं म्हणणं म्हणजे त्या सरकारांवर अन्याय केल्यासारखे होईल. म्हणून मी अशाप्रकारे कोणतीही गोष्ट बोलत नाही. आणि मी तर लालकिल्ल्यावरून असंही म्हणालो होतो की, आज हिंदुस्तान ज्या स्थानी आहे, तिथंपर्यंत येण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत आलेल्या सर्व सरकारांचे, सर्व पंतप्रधानांचे, सर्व राज्य सरकारांचे, सर्व मुख्यमंत्र्यांचे, सर्व लोकप्रतिनिधींचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये योगदान आहे. हे मी लालकिल्ल्यावरून बोललो होतो आणि मला तसंच वाटतं. परंतु इतक्या योजना बनवण्यात आल्या, इतक्या प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होत होता, तरीही जनसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये परिवर्तन का आले नाही, येत नव्हते?त्याच्या मागच्या कारणांचाही विचार केला पाहिजे ना?

महात्मा गांधी यांनी आपल्या लोकांना एक सिद्धांत दिला होता आणि मी वाटतं की, कोणत्याही विकसित देशाच्या दृष्टीने त्याच्या इतका उत्तम सिद्धांत असू शकत नाही. महात्मा गांधी यांनी म्हणाले होते, कोणतीही नीती, योजना तयार करा, तिला एकदा तराजूमध्ये तोला आणि त्या योजनेचा समाजातल्या सर्वात अखेरच्या घटकाला नेमका किती उपयोग होणार आहे, समाजाच्या तळागळामध्ये  असलेल्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडवून येण्यासाठी ती योजना प्रभावी ठरणार आहे की नाही, याचा विचार केला गेला पाहिजे. महात्मा गांधी यांची ही गोष्ट मला अगदी मनापासून पटते. आम्ही कितीही चांगली, मोठी योजना बनवली, खूप दीर्घकाळ चर्चा -विनिमय करीत राहिलो, परंतु ज्या समाजासाठी हे सगळं केलं जात आहे, त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत, अखेरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहोत की नाहीत, आम्ही नेमके कुठं जात आहोत?

मी अतिशय कठिण काम स्वीकारलं आहे, हे मी चांगलंच जाणतो. कदाचित कुणाला तरी माझ्या कामातील काही नकारात्मक मुद्दे दिसत असण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी काय काम करणंच सोडून द्यायचे काय? गरीब लोकांना आहे तसेच, त्यांना सोसू देत हाल असं म्हणून, सोडून द्यायचे का? एखाद्या लहानग्या बालिकेवर अत्याचार केला जातो. ही किती भयानक, त्रासदायक घटना आहे, अशा घटनांमुळे किती क्लेश होतात, याची आपण कल्पना करू शकतो. अशा वेळी तुमच्या सरकारच्या काळामध्ये इतके अत्याचार होत होते, माझ्या सरकारमध्ये इतके होतात, असं आपण म्हणत बसणार आहोत का? मला वाटतं की, याच्यापेक्षा चुकीचा रस्ता दुसरा कोणताच असू शकणार नाही. अत्याचार हा अत्याचारच असतो. एका कन्येवर झालेला अत्याचार कसा काय सहन केला जावू शकतो? आणि म्हणूनच मी लालकिल्ल्यावरून हाच विषय जरा वेगळ्या, नव्या पद्धतीने मांडला होता. मी म्हणालो होतो, जर संध्याकाळच्या वेळेस घरातली मुलगी थोडी उशीरा घरी आली तर प्रत्येक आई-वडील लगेच विचारतात, कुठं गेली होतीस? कशासाठी गेली होतीस? कोणाला भेटलीस? फोनवर जर मुलगी बोलताना दिसली तर मुलगी बोलताना दिसली तर आई लगेच म्हणते, आता पुरे झालं बोलणं, कोणाशी बोलत होतीस?काय काम होतं?

अरे, सगळेजण मुलींना तर विचारतातच, कधी आपल्या मुलांनाही विचारा की, बाबा रे, कुठं गेला होतास? ही गोष्ट मी लालकिल्ल्यावरून बोललो होतो. आणि मला असं वाटतं की, ही एकप्रकारची समाजातली वाईट गोष्ट आहे. व्यक्तीमधली वाईट गोष्टच नाही तर ती एक विकृती आहे. सगळं काही असतानाही देशाच्या दृष्टीने हा एक चिंतेचा विषय बनला आहे. आणि असे पाप करणारा कोणाचा तरी मुलगा आहे. त्याच्या घरामध्येही माता आहे.

आपण कल्पना करू शकता की, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनीही भारतामध्ये शौचालय असण्याचे प्रमाण 35-40 टक्क्यांच्या जवळपास होते. आजही आमच्या माता-भगिनींना या समस्येशी सामना करावा लागत आहे. या सगळ्या प्रकारामागे आणखी कारणेही आहेत. मला कोणतेही पुस्तक वाचून गरीबी म्हणजे काय असते, हे जाणून, शिकून घ्यावं लागलं नाही. मला काही टी.व्ही.च्या पडद्यावरून गरीबी काय असते, हे कोणी समजून सांगण्याची गरज पडली नाही. मी ते आयुष्य वास्तवामध्ये जगलो आहे. गरीबी कशी असते, मागासलेपण काय असते, गरीबाला जगण्यासाठी जीवनात कशाप्रकारे जिद्दीनं काळाशी सामना करावा लागतो, हे मी स्वतः अनुभवलं आहे. जगण्यासाठीची रोजची लढाई मी पाहून, करून इथंवर आलो आहे. 

आणि म्हणूनच मी असं अगदी ठामपणे वाटतं की, राजकारण आपल्या एका जागी आहे. माझी आहे ती समाजनीती असं म्हणता येईल, किंवा माझी राष्ट्रनीती असं म्हणता येईल, त्या दृष्टीने या सगळ्यांच्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असं मला  वाटतं. मी हा बदल घडवून आणेन, असं वाटलं. आणि म्हणूनच मी लालकिल्ल्यावरून सांगितलं की, आम्ही ज्या 18 हजार गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही, याचा अर्थ बाकी गावांमध्ये वीज पोहोचली आहे. ज्या कोणी ही वीज पोहोचवली, त्या लोकांना शत-शत नमस्कार! मात्र स्वातंत्र्याला  70 वर्षे झाल्यानंतरही जर 18 हजार गावे अंधारामध्ये राहतात, त्यांनी वीज मिळत नाही, याचीही जबाबदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे.

आणि मी सरकारी कार्यालयांना विचारले, आता तुम्हीच सांगा हे काम किती कालावधीमध्ये करणार? कोणी उत्तर दिले, सात वर्ष लागतील. मी म्हणालो, सात वर्षे मी वाट पाहू शकत नाही. आणि मी लालकिल्ल्यावरून घोषणा केली की, आम्ही 1000दिवसांमध्ये हे काम पूर्ण करू इच्छितो. काम अवघड होते. अतिशय दुर्गम भागांमध्ये वीज पोहोचवायची होती. काही भागात दहशतवादी, माओवादी लोकांचा प्रभाव होता. तरीही जवळपास 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे काम आम्ही केले. आता कदाचित दीडशे, पावणे दोनशे गावांचे विद्युतीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे. काम थांबलेले नाही, सुरूच आहे.

आपण कल्पना करू शकता, की गरीब माता शौचालयाला जाण्यासाठी सूर्योदयाच्या पूर्वी जंगलामध्ये जाते. आणि दिवसभरामध्ये जर कधी जाण्याची वेळ आलीच तर शारीरिक पीडा सहन करीत संध्याकाळ होण्याची वाट पाहत बसते. अशावेळी शौचालयाला जाता येत नाही, याचा किती त्रास त्या माता-भगिनीला होत असेल? किती यातना होत असेल? तिच्या शरीरावर हा एकप्रकारे अत्याचारच होत असणार की नाही? तिच्यासाठी आपण एक शौचालय नाही बनवू शकत? हा प्रश्नामुळे मला झोप लागत नव्हती. आणि त्याचवेळी माझ्या मनाने उचल खाल्ली की, आता कुणाची काहीही भीडभाड ठेवायची नाही, आणि थेट लालकिल्ल्यावरूनच हा शौचालयाचा, स्वच्छतेचा विषय मांडायचा. ही फार मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु माझ्या लक्षात आले की, संपूर्ण देशभरातून या मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आता माझ्या देशातील जवळपास तीन लाख गावांमध्ये उघड्यावर शौच करण्याची पद्धत बंद झाली आहे. आणि हे शौचालये बनवण्याचे काम आता वेगाने होत आहे. कोणत्याही योजनेचा समाजातल्या शेवटच्या घटकाला लाभ मिळाला पाहिजे, ही लोकशाहीमध्ये सरकारची सर्वात प्राथमिक जबाबदारी आहे.

अशाच प्रकारे आता आम्ही संकल्प केला होता की, प्रत्येक गावामध्ये वीज पोहोचवायची. आता आम्ही निर्धार केला आहे की, देशातल्या प्रत्येक घरामध्ये वीज असली पाहिजे. घराघरांत वीज पोहोचवायची आहे. चार कोटी कुटुंब आजही अंधारामध्ये राहतात. भारतामध्ये एकून 25 कोटी परिवार आहेत. देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आहे, परंतु जवळपास 25 कोटी परिवार आहेत. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरी चार  कोटी परिवार आजही 18व्या शतकात असल्यासारखे आयुष्य जगत आहेत. या कुटुंबामध्ये आजही दिव्याचाच प्रकाश आहे.

सौभाग्य योजनेमधून या चार कोटी कुटुंबांना आम्ही मोफत वीज जोडणी देण्याचा संकल्प केला आहे. आमच्या या संकल्पामुळे अंधारामध्ये जगणारे हे लोक संपूर्ण दुनियेशी जोडले जाणार आहेत. त्यांची मुले शिकू शकणार आहेत, त्यांच्या घरामध्येही संगणक येईल, मोबाईल चार्ज होईल आणि ते दुनियेशी जोडले जातील. टी.व्ही. घेण्याचा खर्च मिळाला तर ते टी.व्ही. पाहू शकतील. या अंधारात राहणा-या लोकांना दुनियेशी जोडण्यासाठी अधीरता, उत्सुकता मला निर्माण करायची आहे. त्यांच्यामध्ये अशी अधीरता निर्माण झाली तर ही मंडळी काहीही करण्यासाठी तयार होतील. माझ्याशी ते जोडले जाणे हेच तर सक्षमीकरण आहे. मी गरीबांना सक्षम करून गरीबीच्या विरोधात लढण्यासाठी माझ्या सहकारी वर्गाची जणू एक फौज तयार करू इच्छितो. ही फौज गरीब लोकांमधूनच तयार होईल आणि गरीबीच्या विरोधात लढेल. असे केले तरच गरीबी संपणार आहे. ‘गरीबी हटाओ’ अशा घोषणा देवून कधी गरीबी संपुष्टात येत नाही.

प्रसून जी - मोदीजी, आपण तर खूप परिश्रम करता, खूप काम करता,  हे तर सगळेच जाणून आहेत. परंतु आपण  एकटेच देशाला बदलू शकणार आहात का?

पंतप्रधान - असं आहे की, मी परिश्रम करतो, खूप काम करतो, ही गोष्ट आपण आत्ता बोललात. आणि मला वाटतं की, याविषयी देशामध्ये कोणताही विवाद नाही. मी परिश्रम करतो, खूप काम करतो, हा मुद्दाच नाही. जर मी काम करत नसतो तर मात्र मुद्दा झाला असता. माझ्याकडे प्रामाणिकपणाची एक पूंजीच आहे. माझ्याकडे सव्वाशे कोटी देशवासियांचे प्रेम आहे, हीसुद्धा एक पूंजी आहे. आणि  म्हणूनच मला जास्तीत जास्त परिश्रम केले पाहिजेत. आणि मी देशवासियांला  सांगू इच्छितो की, मी सुद्धा अगदी आपल्याप्रमाणेच एक सामान्य नागरिक आहे. ज्या एखाद्या सामान्य व्यक्तीमध्ये, माणसामध्ये  असतात, तशाच, तितक्याच कमतरता माझ्यामध्येही आहेत. 

कोणीही मला वेगळे समजण्याची गरज नाही. आपण सर्वांनी मी आपल्यासारखाच एक आहे, असे समजा आणि तीच वस्तूस्थिती आहे. मी आज एका विशिष्ट स्थानावर बसलो आहे, तो एका व्यवस्थेचा भाग आहे. परंतु मी आपल्यापैकीच एक आहे. आपल्यापेक्षा वेगळा अजिबात नाही. माझ्या मनामध्ये एक विद्यार्थी आहे. आणि मी माझ्या शिक्षकांचा खूप आभारी आहे. लहानपणी त्यांनीच मला मार्ग दाखवला. आणि त्यांनी शिकवलं त्यामुळे आपल्या आतमधला विद्यार्थी कधीच मरू दिला नाही. त्यामुळे मी सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. नवीन काही समजून घेण्याचा प्रयत्न माझा सातत्याने सुरू असतो. मी ज्यावेळी निवडणूक लढवत होतो, त्यावेळी मी देशवासियांना सांगितलं होतं की, माझ्याकडे देश चालवण्याचा अनुभव नाही. माझ्याकडून चूक होवू शकते. परंतु मी देशवासियांना असाही विश्वास दिला होता की, मी चुका करू शकतो. परंतु मनामध्ये वाईट हेतू ठेवून मी चुकीचं काम कधीच करणार नाही.

गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ कार्य करण्याची संधी मला मिळाली. पंतप्रधान म्हणून आता चार वर्षे होत आली आहेत. देशाचा प्रधानसेवक म्हणून मी काम केले आहे. परंतु कोणताही चुकीचा हेतू बाळगून मी काम करणार नाही, असा वचन मी देशाला दिले आहे.

आता प्रश्न उपस्थित झाला आहे तो, मी देश बदलू शकणार आहे का? देशाला बदलण्याचा मी कधी विचारच केला नाही. परंतु माझ्या मनात अगदी ठाम विश्वास आहे की, माझ्या देशामध्ये जर लाखों समस्या आहेत, तर त्या समस्यांवर सव्वाशे कोटी उत्तरं आहेत. जर लक्षावधी समस्या आहेत तर अब्जावधी उत्तरंही आहेत. शे सव्वाशे कोटी देशवासियांच्या शक्तीवर, क्षमतेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आणि मी या विश्वासाचा  चांगला अनुभवही घेतला आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही असे अनुभव नोटबंदीच्या काळात आले आहेत.

अर्जेन्टीनाचे  राष्ट्रपती मला भेटले होते, ते माझे चांगले स्नेही आहेत. ते मला म्हणाले, ‘‘ मी आणि माझी पत्नी बोलत होतो की, माझा दोस्त तर आता गेला.’’ मी म्हणालो, अरेच्या असं काय होईल? तर म्हणाले, ‘‘तू ही नोटबंदी आणली, आता तुला त्याची किंमत मोजावी लागणार, जावं लागणार. वेनेजुएलामध्ये असेच प्रकरण सुरू होतं, तिथे सत्तापालट झाला. आमच्या शेजारी असल्यामुळे ते सगळं माहिती होतं. त्यामुळं आम्हाला वाटलं की, आपल्या दोस्तालाही आता जावं लागणार, अशी चर्चा मी आणि माझी पत्नी करत होतो.’’

विचार करा, देशामधले 86 टक्के चलन व्यवहारातून बाहेर काढल्यानंतर किती गोंधळ निर्माण झाला होता. टी.व्ही.च्या सगळ्या वाहिन्यांवर तर सातत्याने सरकारच्या विरोधात जोरदार आक्रमण होत होतं. परंतु सामान्य देशवासियांवर माझा विश्वास होता. कारण मला माहीत आहे, माझा देश प्रामाणिकपणासाठी संघर्ष करतोय. माझ्या देशाचा सामान्य नागरिक प्रामाणिकपणासाठी कष्ट झेलण्यासाठी सिद्ध आहे. ही जर माझ्या देशाची ताकद- शक्ती आहे, तर मला त्या शक्ती अनुसार आपला कार्य करता आले पाहिजे. आणि त्याचेच परिणाम आता दिसून येत आहेत. आज जे काही चांगले परिणाम दिसताहेत त्याल फक्त निमित्तमात्र मोदी कारणीभूत आहेत. वास्तविक मोदीची खरी गरज इथेच आहे. कोणाला जर दगड उचलून मारायचा असेल तर कोणाला मारणार? कुणाच्या अंगावर कचरा टाकायचा असेल तर कुणावर फेकणार? कुणाला अपशब्द बोलायचे असतील तर कुणाला बोलणार?

माझ्या सव्वाशे कोटी देशवासियांवर दगडफेक होत नाही, कोणी चिखलफेक करीत नाही, कोणी अपशब्द उच्चारत नाही, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. जे काही होत आहे, झाले आहे, ते मी एकट्यानेच सोसले, सहन केले, झेलत राहिलो आहे. आणि मी तर आपल्याप्रमाणे काही कवी नाही. परंतु प्रत्येक युगामध्ये काही ना काही तरी लिहितच असतात. आपल्यापैकी सगळ्यांनी लिहिले असेल. परंतु आपण सगळेच काही कवी बनू शकत नाही. कवी तर प्रसून बनू शकतात. परंतु मी सुद्धा थोडं फार लिहिले आहे.

प्रसून जी - जी.

पंतप्रधान - ज्याप्रकारचे मी आयुष्य जगलो आहे, त्या काळामध्ये अशा गोष्टी झेलणे खूप स्वाभाविक होते. ठेचकाळत, ठेचकाळत मी इथंपर्यंत आलो आहे. अनेक समस्यांचा सामना आत्तापर्यंत करावा लागला आहे. मी लिहिलं होतं. आज मला माझीच पूर्ण कविता स्मरणामध्ये नाही. परंतु जर कोणाला इच्छा आणि आवड असेल तर माझं एक पुस्तक आहे, त्यामध्ये मी काय लिहिले आहे, हे वाचता येईल. मी त्यामध्ये लिहिले होते -

‘‘ जे लोक माझ्यावर दगड फेकतात, त्याच दगडांना मी माझ्या पायातळाचा दगड बनवतोय आणि त्याच दगडांच्या पाय-यांवरून चालत मी आज पुढे जात आहे.

आणि म्हणूनच माझी संकल्पना आहे की ‘टीम इंडिया’ म्हणजे काही फक्त सरकारमध्ये बसलेले लोक नाहीत. नोकरशाह आहेत, राज्य सरकारे आहेत, संघराज्य संरचनेसाठी माझ्या दृष्टीने खूप महत्व आणि प्राधान्य आहे. सहकारी महासंघांचा कारभार मी स्पर्धात्मक सहकारी महासंघाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे.

अलिकडेच मी देशातल्या इतर जिल्हयांच्या तुलनेमध्ये मागास राहिलेल्या विकासोन्मुख 115 जिल्हांची निवड केली आहे. त्यांच्या जिल्हयांमध्ये विकास घडवून यावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. मी तुमच्याबरोबर आहे, असा विश्वास त्यांना दिला आहे. आता त्यांचा उत्साह वाढतोय. आणि ते लोक कामही चांगले करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे या गावांमध्ये शौचालयाचे लक्ष्य पूर्ण होत आहे. 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचली आहे. कोणी मोदी विद्युत खांब उभारण्यासाठी गेला होता का? विजेचे खांब उभारण्यासाठी तर माझे देशवासियच गेले होते. रात्री अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावी वीज पोहोचवण्याचे काम माझ्या देशवासियांनी केले आहे. आणि म्हणूनच महात्मा गांधी यांची एक गोष्ट मी एका मंत्राप्रमाणे स्वीकारली आहे. स्वातंत्र्यासाठी वेडे झालेले अनेकजण होते, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणारेही अनेक लोक होते, आणि त्यांच्या त्यागाची, त्यांच्या तपस्येचे मूल्य कधीच कमी होणार नाही. त्यांच्या अमूल्य  हौतात्म्याची कधीच भरपाई करता येणार नाही. परंतु गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. मी विकासाला जनआंदोलन बनवत आहे.

मोदी एकटेच काही करणार नाहीत. आणि मोदींनी काही केलेही नाही पाहिजे.

परंतु देशाने सगळं काही करावं, असं म्हटलं जातं.  मोदीही कधी काळी असंच म्हणत होते. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळी म्हणायचो, आपला देश असा आहे, सरकारने कोणत्याही अडथळे आणणे बंद केले तर देश खूप वेगाने पुढे जावू शकणार आहे. हाच मूलभूत विचार आजही माझा कायम आहे. आणि त्यानुसार चालणारा मी माणूस आहे.

प्रसून जी - कवितेविषयी आपण आत्ता बोललात त्यामुळे मी आपल्यासमोर एक कविता ऐकवतो. ही जी कविता आहे, ती मला वाटते की, भारतावरच आहे, भारताला तंतोतंत लागू पडते. आपल्यालाही लागू पडते. आपण मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे.

कि सर्प क्‍यों इतने चकित हो? सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभ्‍यस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभ्‍यस्‍त हूं? पी रहा हूं विष युगों से, सत्‍य हूं, आश्‍वस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभ्‍यस्‍त हूं, पी रहा हूं विष युगों से, सत्‍य हूंए आश्‍वस्‍त हूं।

ये मेरी माटी लिए है गंध मेरे रक्‍त की, जो कह रही है मौन कीए अभिव्‍यक्‍त की।

मैं अभय लेकर चलूंगा, मैं विचलित न त्रस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभयस्‍त हूं।

है मेरा उद्गम कहां पर और कहां गंतव्‍य है?

दिख रहा है सत्‍य मुझको, रूप जिसका भव्‍य है।

मैं स्‍वयं की खोज में कितने युगों से व्‍यस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभयस्‍त हूं।

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में,

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में।

 

एक लघु सी बूंद हूं मैं, एक लघु सी बूंद हूं मैं, एक शाश्‍वत वृष्टि मैं।

है नहीं सागर को पानाए मैं नदी सन्‍यस्‍त हूं।

सर्प क्‍यों इतने चकित हो? दंश का अभयस्‍त हूं।

पंतप्रधान - प्रसून जी आम्ही सगळे आणि मी आपल्या भावनांचा आदर करतो. परंतु आमच्या नसांमध्ये असेच भाव राहिले आहेत. - अमृतस्य पुत्रा वयं.

असाच भाव उराशी बाळगत आम्ही मोठे झालो, वाढलो आहोत. आणि म्हणूनच माझ्या देशातल्या प्रत्येकाने दंश सहन केले आहेत. विषही प्याले आहे. त्रास सहन केला आहे, अपमान सहन केला आहे. परंतु आपल्या स्वप्नांना कधीच मृतप्राय होवू दिलं नाही.

आणि हाच उत्साह, हीच भावना देशाला नवीन, विक्रमी उंचीवर नेण्याची ताकद देत असतो, असा अनुभव मी नेहमीच घेतो.

प्रसून जी - आपण इथं काही प्रश्न घेणार आहोत. श्री.सॅमुअल डाउजर्ट यांचा एक प्रश्न आहे. ते आपल्याला विचारू इच्छितात. जी आपल्याबरोबर जर कोणी असेल तर आपण आपला प्रश्न त्याला लिहून द्यावा. ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. फक्त आपण जरा प्रश्न लिहून द्यावा. आपण दिल्यानंतर मी तो प्रश्न विचारतो. मी आपले नाव जाहीर करतो.

सॅमुअल डाउजर्ट - Good Evening Mr. Prime Minister. What is your opinion about Modicare? Everyone is talking about it.Thank You

प्रसून जी - मला वाटतं की मोदी केअर, अशाच प्रकारे ओबामा केअर, मोदी केअरच्या मध्ये एक समांतर काही करण्यात आलं आहे. याचा अर्थ आरोग्य क्षेत्राविषयी आपण कदाचित चर्चा करू इच्छित आहात.

पंतप्रधान - असं आहे की, तीन गोष्टींचा मी आग्रह धरतो. असा माझा अनुभव आहे. यामध्ये काही खूप मोठ मोठ्या गोष्टी आहेत असं अजिबात नाही. मी ज्या पाश्र्वभूमीतून आलो आहे, त्याचा विचार करता, हे योग्य आहे, असे मला वाटते. माझे भाऊ मेघनाथभाई इथं बसले आहेत. इतर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्याची माझी परंपरा नाही. परंतु तीन गोष्टींचा माझा आग्रह कायम असतो. एक म्हणजे, मुलांचे शिक्षण, युवावर्गाला कमाईचे साधन आणि वयोवृद्धांना औषधे. स्वस्थ समाजासाठी या तीन गोष्टींची आपल्याला चिंता करण्याची अतिशय आवश्यकता आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, कितीही चांगले कुटूंब असले तरी, कोणतेही व्यसन नसले तरी, किंवा कोणत्याही वाईट गोष्टी नसल्या तरी, काही, काही वाईट नाही, सगळे काही खूप चांगल्याप्रकारे चालत असेल आणि ते कुटूंब आनंदात, समाधानात असेल, कोणतीही वाईट गोष्ट घडली नाही तरी, जर त्या परिवारामध्ये जर कोणाला आजारपण आले. कल्पना करा, घरातली कन्या मोठी होतेय. आता तिच्या विवाहाचे पहायचे आहे. आणि घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, तर संपूर्ण नियोजनच ढासळून जाते. त्या विवाहयोग्य मुलीचा विवाह करायचा राहून जातो. घरामध्ये एका सदस्याला आलेले आजारपण संपूर्ण परिवाराची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा धुळीला मिळवून टाकते.

एक गरीब माणूस, ऑटो रिक्षा चालवून घरासाठी कमाई करणारा जर आजारी पडला तर काय होतं. तो एकटाच आजारी पडत नाही, तर संपूर्ण घर आजारी होवून जाते. घराची सगळी व्यवस्था आजारी होते. आणि या गोष्टीचा आम्ही विचार करून आरोग्य क्षेत्रामध्ये एक खूप मोठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून योजना तयार केली. काही लोक याला मोदी केअरच्या रूपाने आज प्रचलित करीत आहेत. मुळात ही योजना आहे, ‘आयुष्मान भारत‘. आणि यामध्ये आम्ही संरक्षणात्मक आरोग्य सुविधा पुरवणार आहे. परवडणा-या दरामध्ये औषधोपचार देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एक शाश्वत साखळी तयार करण्यात येणार आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार त्यामध्ये करून पुढे जात आहोत.

या योजनेचे दोन घटक आहेत. एक म्हणजे, आम्ही देशामध्ये जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त वेलनेस सेंटर तयार करणार आहोत. या केंद्रांमध्ये आजूबाजूच्या 12-15 गावांतल्या लोकांसाठी सर्व प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे मोठ्या रूग्णालयांशी संपर्क साधून आलेल्या रूग्णावर उपचारासाठी तातडीने मार्गदर्शन करता घेता येणार आहे. तसेच आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करता येणार आहे.

दुसरा भाग आहे तो म्हणजे संरक्षणात्मक आरोग्य सुविधेचा. यालाही आम्ही प्राधान्य देणार आहे. यामध्ये मग योग, जीवनशैली यांचाही विचार संरक्षणात्मक आरोग्य सेवेमध्ये केला जाणार आहे. यामध्ये पौष्टिक आहार मार्गदर्शनचा समावेश आहे. आम्ही एक पोषण मोहीम सुरू केली आहे. महिला आणि बालकांसाठी आरोग्य सेवा आहे, त्याव्दारे ही मोहीम चालवली जाते.

जगभरातल्या समृद्ध देशांमध्येही आजही मातृत्व रजेविषयी फारशी उदारता दाखवली जात नाही. मात्र आमच्या सरकारने तशी उदारता दाखवली आहे.गर्भवती, नवमाता आणि नवजात बालके यांच्या आरोग्याचा विचार करून, त्यांच्या आरोग्याची चिंता लक्षात घेवून, आमच्या सरकारने आता मातृत्वाची रजा 26 आठवडे केली आहे. मला माहीत आहे की, ही माहिती मिळाल्यानंतर यू.के.मधले लोक नक्कीच आनंदी होतील.

आणखी एक  बाजू आरोग्याविषयी आम्ही केली आहे. भारतामध्ये जवळपास दहा कोटी परिवार म्हणजे 50 कोटी जनता, याचाच अर्थ जवळपास निम्म्या लोकसंख्येला लाभ मिळू शकेल, अशी आरोग्य विमा योजना आम्ही तयार केली आहे. यामध्ये वर्षभरामध्ये पाच लाख रूपयांपर्यंत आजारपणाचा खर्च सरकार करणार आहे. एका वर्षभरात कुटुंबामधल्या कोणालाही, कितीही व्यक्तींना आजारपण आले, तर त्या कुटुंबाचा पाच लाखापर्यंतचा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. या कारणामुळे आता गरीब व्यक्तीला आजारपणात औषधोपचार मिळू शकणार आहेत. आजारी पडलो तर काय करायचे, या भयापासून गरीबाची आम्ही मुक्तता केली आहे.

हे कार्य भगीरथाचे आहे, हे मला माहीत आहे. परंतु कोणी तरी ते करायलाच पाहिजे होते.

दुसरे म्हणजे जी खाजगी रूग्णालये येण्याची शक्यता आहे, त्यांचे देशातल्या दोन क्रमांकाच्या, तीन क्रमांकाच्या,  शहरांमध्ये चांगल्या रूग्णालयांची एक साखळी तयार होवू शकणार आहे. कारण त्यांना माहीत आहे की, आता रूग्ण येणार आहेत. आता रूग्णांचे पैसे कोणीतरी देणारा आहे, त्यामुळे खाजगी रूग्णालयांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.

एखाद्याला साधे आजारपण आले तर तो विचार करतो की, अरे, कशाला रूग्णालयामध्ये जायचे, असेच दोन दिवसांत आपण बरे होवू. असे म्हणून गरीब माणूस आजारपण अंगावर काढतो. परंतु आता गरीबाला तसे करण्याची अजिबात गरज नाही. रूग्णाला आणि रूग्णालयालाही माहीत आहे, की आपल्या औषधोपचाराचा खर्च मिळणार आहे. आणि त्यामुळेच रूग्णालयांची साखळी बनणार आहे.

आणि मला असं वाटतं की, आगामी काळामध्ये आपल्यापैकी ज्यांना कुणाला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांना एक हजारांपेक्षा जास्त चांगली रूग्णालये निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आणि ही संधी कायम अशीच असणार आहे.

अगदी याचप्रमाणे औषधांचे आहे. औषधांचे पॅकिंग चांगले असते. औषधे लिहून देत असल्याबद्दलही काही मिळत असते. आपल्याला माहीत असेलच की, डॉक्टरांची परिषद कधी सिंगापूरला होते, कधी दुबईला होते. तिथं काही आजार पसरला आहे, म्हणून ही मंडळी जात नाहीत. तर औषध निर्माण करत असलेल्या कंपन्यांना त्यांना घेवून जाणे महत्वाचे वाटते.

यावर तोडगा म्हणून आम्ही काय केले ते सांगतो. जेनेरिक औषध विक्री सुरू केली. ही औषधे तितक्याच उत्तम दर्जाची असतात. जे औषध 100 रूपयांना बाहेर असते, तेच औषध जेनेरिक औषधांच्या दुकानामध्ये 15 रूपयांना मिळते. आम्ही देशभरामध्ये जवळपास 3 हजार जन-औषधालये सुरू केली आहेत. आणि आता ही संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळू शकेल. या जन-औषधालयांचा प्रचारही आम्ही करीत आहोत. परंतु देशाने सगळं काही करावं, असं म्हटलं जातं.  मोदीही कधी काळी असंच म्हणत होते. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळी म्हणायचो, आपला देश असा आहे, सरकारने कोणतेही  अडथळे आणणे बंद केले तर देश खूप वेगाने पुढे जावू शकणार आहे. हाच मूलभूत विचार आजही माझा कायम आहे. आणि त्यानुसार चालणारा मी माणूस आहे.

प्रसून जी - कवितेविषयी आपण आत्ता बोललात त्यामुळे मी आपल्यासमोर एक कविता ऐकवतो. ही जी कविता आहे, ती मला वाटते की, भारतावरच आहे, भारताला तंतोतंत लागू पडते. आपल्यालाही लागू पडते. आपण मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे.

कि सर्प क्यों इतने चकित हो? सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभ्यस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभ्यस्त हूं? पी रहा हूं विष युगों से, सत्य हूं, आश्वस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभ्यस्त हूं, पी रहा हूं विष युगों से, सत्य हूंए आश्वस्त हूं।

ये मेरी माटी लिए है गंध मेरे रक्त की, जो कह रही है मौन कीए अभिव्यक्त की।

मैं अभय लेकर चलूंगा, मैं विचलित न त्रस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभयस्त हूं।

है मेरा उद्गम कहां पर और कहां गंतव्य है?

दिख रहा है सत्य मुझको, रूप जिसका भव्य है।

मैं स्वयं की खोज में कितने युगों से व्यस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभयस्त हूं।

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में,

है मुझे संज्ञान इसका बुलबुला हूं सृष्टि में।

 

एक लघु सी बूंद हूं मैं, एक लघु सी बूंद हूं मैं, एक शाश्वत वृष्टि मैं।

है नहीं सागर को पानाए मैं नदी सन्यस्त हूं।

सर्प क्यों इतने चकित हो? दंश का अभयस्त हूं।

पंतप्रधान - प्रसून जी आम्ही सगळे आणि मी आपल्या भावनांचा आदर करतो. परंतु आमच्या नसांमध्ये असेच भाव राहिले आहेत. - अमृतस्य पुत्रा वयं.

असाच भाव उराशी बाळगत आम्ही मोठे झालो, वाढलो आहोत. आणि म्हणूनच माझ्या देशातल्या प्रत्येकाने दंश सहन केले आहेत. विषही प्याले आहे. त्रास सहन केला आहे, अपमान सहन केला आहे. परंतु आपल्या स्वप्नांना कधीच मृतप्राय होवू दिलं नाही.

आणि हाच उत्साह, हीच भावना देशाला नवीन, विक्रमी उंचीवर नेण्याची ताकद देत असते, असा अनुभव मी नेहमीच घेतो.

प्रसून जी - आपण इथं काही प्रश्न घेणार आहोत. श्री.सॅमुअल डाउजर्ट यांचा एक प्रश्न आहे. ते आपल्याला विचारू इच्छितात. जी आपल्याबरोबर जर कोणी असेल तर आपण आपला प्रश्न त्याला लिहून द्यावा. ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. फक्त आपण जरा प्रश्न लिहून द्यावा. आपण दिल्यानंतर मी तो प्रश्न विचारतो. मी आपले नाव जाहीर करतो.

सॅमुअल डाउजर्ट - Good Evening Mr. Prime Minister. What is your opinion about Modi care? Everyone is talking about it. Thank You

प्रसून जी - मला वाटतं की मोदी केअर, अशाच प्रकारे ओबामा केअर, मोदी केअरच्या मध्ये एक समांतर काही करण्यात आलं आहे. याचा अर्थ आरोग्य क्षेत्राविषयी आपण कदाचित चर्चा करू इच्छित आहात.

पंतप्रधान - असं आहे की, तीन गोष्टींचा मी आग्रह धरतो. असा माझा अनुभव आहे. यामध्ये काही खूप मोठ मोठ्या गोष्टी आहेत असं अजिबात नाही. मी ज्या पार्श्वभूमी मधून आलो आहे, त्याचा विचार करता, हे योग्य आहे, असे मला वाटते. माझे भाऊ मेघनाथ भाई इथं बसले आहेत. इतर कोणत्याही प्रकारे चर्चा करण्याची माझी परंपरा नाही. परंतु तीन गोष्टींचा माझा आग्रह कायम असतो. एक म्हणजे, मुलांचे शिक्षण, युवावर्गाला कमाईचे साधन आणि वयोवृद्धांना औषधे. स्वस्थ समाजासाठी या तीन गोष्टींची आपल्याला चिंता करण्याची अतिशय आवश्यकता आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो, कितीही चांगले कुटूंब असले तरी, कोणतेही व्यसन नसले तरी, किंवा कोणत्याही वाईट गोष्टी नसल्या तरी, काही, काही वाईट नाही, सगळे काही खूप चांगल्याप्रकारे चालत असेल आणि ते कुटूंब आनंदात, समाधानात असेल, कोणतीही वाईट गोष्ट घडली नाही तरी, जर त्या परिवारामध्ये जर कोणाला आजारपण आले. कल्पना करा, घरातली कन्या मोठी होतेय. आता तिच्या विवाहाचे पहायचे आहे. आणि घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली, तर संपूर्ण नियोजनच ढासळून जाते. त्या विवाहयोग्य मुलीचा विवाह करायचा राहून जातो. घरामध्ये एका सदस्याला आलेले आजारपण संपूर्ण परिवाराची स्वप्ने, इच्छा, आकांक्षा धुळीला मिळवून टाकते.

एक गरीब माणूस, ऑटो रिक्षा चालवून घरासाठी कमाई करणारा जर आजारी पडला तर काय होतं. तो एकटाच आजारी पडत नाही, तर संपूर्ण घर आजारी होवून जाते. घराची सगळी व्यवस्था आजारी होते. आणि या गोष्टीचा आम्ही विचार करून आरोग्य क्षेत्रामध्ये एक खूप मोठी सर्वसमावेशक दृष्टिकोनातून योजना तयार केली. काही लोक याला मोदी केअरच्या रूपाने आज प्रचलित करीत आहेत. मुळात ही योजना आहे, ‘आयुष्मान भारत‘. आणि यामध्ये आम्ही संरक्षणात्मक आरोग्य सुविधा पुरवणार आहे. परवडणा-या दरामध्ये औषधोपचार देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एक शाश्वत साखळी तयार करण्यात येणार आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार त्यामध्ये करून पुढे जात आहोत.

या योजनेचे दोन घटक आहेत. एक म्हणजे, आम्ही देशामध्ये जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त वेलनेस सेंटर तयार करणार आहोत. या केंद्रांमध्ये आजूबाजूच्या 12-15 गावांतल्या लोकांसाठी सर्व प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे मोठ्या रूग्णालयांशी संपर्क साधून आलेल्या रूग्णावर उपचारासाठी तातडीने मार्गदर्शन  घेता येणार आहे. तसेच आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करता येणार आहे.

दुसरा भाग आहे तो म्हणजे संरक्षणात्मक आरोग्य सुविधेचा. यालाही आम्ही प्राधान्य देणार आहे. यामध्ये मग योग, जीवनशैली यांचाही विचार संरक्षणात्मक आरोग्य सेवेमध्ये केला जाणार आहे. यामध्ये पौष्टिक आहार मार्गदर्शनचा समावेश आहे. आम्ही एक पोषण मोहीम सुरू केली आहे. महिला आणि बालकांसाठी आरोग्य सेवा आहे, त्याव्दारे ही मोहीम चालवली जाते.

जगभरातल्या समृद्ध देशांमध्येही आजही मातृत्व रजेविषयी फारशी उदारता दाखवली जात नाही. मात्र आमच्या सरकारने तशी उदारता दाखवली आहे. गर्भवती, नवमाता आणि नवजात बालके यांच्या आरोग्याचा विचार करून, त्यांच्या आरोग्याची चिंता लक्षात घेवून, आमच्या सरकारने आता मातृत्वाची रजा 26 आठवडे केली आहे. मला माहीत आहे की, ही माहिती मिळाल्यानंतर यू. के. मधले लोक नक्कीच आनंदी होतील.

आणखी एक  बाजू आरोग्याविषयी आम्ही केली आहे. भारतामध्ये जवळपास दहा कोटी परिवार म्हणजे 50 कोटी जनता, याचाच अर्थ जवळपास निम्म्या लोकसंख्येला लाभ मिळू शकेल, अशी आरोग्य विमा योजना आम्ही तयार केली आहे. यामध्ये वर्षभरामध्ये पाच लाख रूपयांपर्यंत आजारपणाचा खर्च सरकार करणार आहे. एका वर्षभरात कुटुंबामधल्या कोणालाही, कितीही व्यक्तींना आजारपण आले, तर त्या कुटुंबाचा पाच लाखापर्यंतचा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे. या कारणामुळे आता गरीब व्यक्तीला आजारपणात औषधोपचार मिळू शकणार आहेत. आजारी पडलो तर काय करायचे, या भयापासून गरीबाची आम्ही मुक्तता केली आहे.

हे कार्य भगीरथाचे आहे, हे मला माहीत आहे. परंतु कोणी तरी ते करायलाच पाहिजे होते.

दुसरे म्हणजे जी खाजगी रूग्णालये येण्याची शक्यता आहे, त्यांचे देशातल्या दोन क्रमांकाच्या, तीन क्रमांकाच्या,  शहरांमध्ये चांगल्या रूग्णालयांची एक साखळी तयार होवू शकणार आहे. कारण त्यांना माहीत आहे की, आता रूग्ण येणार आहेत. आता रूग्णांचे पैसे कोणीतरी देणारा आहे, त्यामुळे खाजगी रूग्णालयांची संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.

एखाद्याला साधे आजारपण आले तर तो विचार करतो की, अरे, कशाला रूग्णालयामध्ये जायचे, असेच दोन दिवसांत आपण बरे होवू. असे म्हणून गरीब माणूस आजारपण अंगावर काढतो. परंतु आता गरीबाला तसे करण्याची अजिबात गरज नाही. रूग्णाला आणि रूग्णालयालाही माहीत आहे, की आपल्या औषधोपचाराचा खर्च मिळणार आहे. आणि त्यामुळेच रूग्णालयांची साखळी बनणार आहे.

आणि मला असं वाटतं की, आगामी काळामध्ये आपल्यापैकी ज्यांना कुणाला आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांना एक हजारांपेक्षा जास्त चांगली रूग्णालये निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आणि ही संधी कायम अशीच असणार आहे.

अगदी याचप्रमाणे औषधांचे आहे. औषधांचे पॅकिंग चांगले असते. औषधे लिहून देत असल्याबद्दलही काही मिळत असते. आपल्याला माहीत असेलच की, डाक्टरांची परिषद कधी सिंगापूरला होते, कधी दुबईला होते. तिथं काही आजार पसरला आहे, म्हणून ही मंडळी जात नाहीत. तर औषध निर्माण करत असलेल्या कंपन्यांना त्यांना घेवून जाणे महत्वाचे वाटते.

यावर तोडगा म्हणून आम्ही काय केले ते सांगतो. जेनेरिक औषध विक्री सुरू केली. ही औषधे तितक्याच उत्तम दर्जाची असतात. जे औषध 100 रूपयांना बाहेर असते, तेच औषध जेनेरिक औषधांच्या दुकानामध्ये 15 रूपयांना मिळते. आम्ही देशभरामध्ये जवळपास 3 हजार जन-औषधालये सुरू केली आहेत. आणि आता ही संख्या वाढवण्यात येणार आहे. यामुळे सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळू शकेल. या जन-औषधालयांचा प्रचारही आम्ही करीत आहोत.

अगदी याचप्रमाणे जर डॉक्टरांनी सांगितलं की, बाबा रे, तुला हृदयविकार आहे. आता आपल्याला तर समजतही नाही की आतमध्ये काय झालं आहे. अशावेळी मग भीती वाटते. हृदयाला काही होणार तर नाही ना?

अशा वेळी डॉक्टर सांगतात, तुम्हाला स्टेंट घालावा लागेल. रूग्ण बरं म्हणतो. मग ते सांगतात, असं आहे की, हे दोन प्रकारचे स्टेंट आहेत. हा आहे दोन लाखाचा आणि हा दुसरा आहे एक लाखाचा. मग रूग्ण विचारामध्ये पडतो. दोन लाखाचा आणि एक लाखाचा असे फरक का आहेत? मग त्याला सांगितलं जातं, दोन लाखवाला अगदी आयुष्यभर चालेल. आणि एक लाखाचा घेतला तर 4-6 वर्ष चालेल. नंतर पुन्हा नवा घालावा लागेल. अशा प्रसंगी रूग्ण सांगतो, हरकत नाही, पुन्हा काही वर्षांनी लावण्यापेक्षा दोन लाखांचा आत्ताच लावलेला बरा. तो बिचारा रूग्ण कर्जाऊ पैसे काढून स्टेंट लावून घेतो.

हे सगळं जाणून घेतल्यानंतर मी विचारलं, ही स्टेंट गोष्ट आहे तरी काय? मग मी वाटाघाटी सुरू केल्या. आणि आपल्याला नवल वाटेल की, जवळ जवळ 60 ते 80 टक्के किंमती स्टेंटच्या कमी झाल्या. जो स्टेंट दीड लाख, दोन लाखाला मिळत होता, तो आज 20 हजार, 25 हजाराला मिळतोय.

अगदी याचप्रमाणे गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेचे आहे. आता लोकांना योग, आसने करण्याची सवयच जवळपास राहिली नाही. अरे बाबांनो, योग करा, योग करा, असं लोकांना  सांगून सांगून मी थकलो. आता या लोकांना चालता येत नाही. म्हणून मग म्हणतात की, चला स्क्रू फिट करून घेवू या. आणि यासाठी खूप पैसे घेतले जातात. मी त्यांना बोलावलं. सगळा खर्चाचा तपशील घेतला... तर अशा अनेक गोष्टी आमच्या लक्षात आल्या की त्यामुळे गुडघे प्रत्यारोपणाचा खर्च कमी करता येवू शकतो. अशा पद्धतीने संपूर्ण आरोग्य क्षेत्रामध्ये समग्र विचार करून आम्ही काम करीत आहोत. त्याच्याबरोबर स्वच्छताही जोडण्यात आली आहे.

जागतिक बँकेचा अहवाल आहे की, जर स्वच्छतेकडे लक्ष दिले तर एका कुटुंबाचा आजारपणावर खर्च होणारा सरासरी 7 ते 12 हजारांचा खर्च वाचवता येवू शकतो. तर अशा अनेक गोष्टींचा विचार करून आम्ही योजना बनवल्या आहेत. आता लोक यालाच मोदी केअर असं म्हणताहेत. ही प्रत्येकाची मर्जी आहे. परंतु मुळामध्ये  माझी इच्छा अशी आहे की, माझ्या देशवासियांची मला काळजी घेतली पाहिजे.

प्रसून जोशी - खूप खूप धन्यवाद. मोदीजी आपण आरोग्य क्षेत्रामध्ये इतके मोठे, महत्वाचे काम सुरू केले आहे.  या क्षेत्रात एकूणच जो गोंधळ माजत होता, त्यामध्ये कदाचित अनेक गोष्टींचा विचार करण्याचे राहून गेले असते. आणि सर्वांच्या दृष्टीने आपण आत्ता जे काही सांगितले ती नवीनच माहिती होती.  आणि आरोग्य क्षेत्राविषयी प्रश्न विचारल्याबद्दल सॅमुअलजी यांना खूप खूप धन्यवाद.

आपल्याला या कार्यक्रमानंतरही आणखी काही समारंभांना उपस्थित रहायचे आहे, हे मला माहीत आहे. रात्रीही अजून बरेच कार्यक्रम आहेत. तरी एक प्रश्न आत्ता आपण घेवूया. हे संतोष पाटील जी यांचे नाव माझ्याकडे आले आहे. संतोष पाटील जी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितात.

संतोष पाटील - पंतप्रधान जी नमस्कार. मी संतोष पाटील, कर्नाटकमधला आहे. कर्नाटकातल्या लोकांसाठी आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आपल्याला माहीतच असेल की, आज जगतगुरू बसवेश्वर यांची जयंती आहे. मागच्यावेळी आपण लंडनला आले होते त्यावेळी आपण जगतगुरू बसवेश्वरजी यांच्या प्रतिमेचे अनावरण केले होते.

तर माझा आपल्याला  असा प्रश्न आहे की, आपण त्यांचे जीवन आणि त्यांचे विचार, याकडे काय म्हणून पाहता? आणि आपण त्यांचे विचार असेच पुढे न्यावेत याविषयी कधी विचार केला आहे का? थ्यँक्यू, धन्यवाद.

मोदीजी - आपल्या देशाचे एक दुर्भाग्य आहे की, स्वातंत्र्यानंतर भारताची महान परंपरा, संस्कृती, इतिहास या सगळ्याचे विस्मरण व्हावे, यासाठी खूप प्रयत्न केले गेले. आपल्याला एका परिवाराच्या बाहेर काही आहे, याची माहितीच दिली गेली नाही. अनेक लोकांनी कदाचित बसवेश्वरजी यांचे नावच पहिल्यांदा ऐकले असेल. 12 व्या शतकामधला कर्नाटकातला हा एक महापुरूष होता. आणि आपल्यापैकी कोणाला आवड असेल तर भगवान बसवेश्वर यांची वचने जरूर वाचण्यासारखी आहेत. विशेष म्हणजे आज सर्व भाषांमध्ये ती उपलब्धही आहेत. अगदी सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. आज त्यांची जयंती आहे. म्हणून मी आजच्या या खूप कार्यक्रमांच्या वेळापत्रकातूनही थोडासा वेळ काढलाच. आणि गेल्यावेळेस आलो होतो, त्यावेळी मला ज्या  पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली होती, त्या स्थानी मी आज वंदन करण्यासाठी गेलो होतो.

एक लक्षात घ्या आपल्याला आपलेच महापुरूष माहीत नाहीत, हे आमचे दुर्भाग्य आहे. आपण आपल्या महान लोकांविषयी कधी जाणूनच घेत नाही, त्यामुळे त्यांचे कार्य माहिती नाही. आपण मेगना कार्टराविषयी जाणून घेतो, वाचत असतो. आपण लोकशाही मूल्यांची चर्चा करताना विश्वभरातील सगळ्या गोष्टी सांगतो. परंतु मेगनाकार्टराच्याही आधी 12 व्या शतकामध्ये भगवान बसवेश्वरांनी लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, ही माहिती मिळाल्यावर आपल्याला नक्कीच आनंद, नवलही वाटेल. त्यांनी एक अनुभवमंडपमनावाची व्यवस्था सुरू केली होती. समाजातल्या सर्व वर्गातले लोक तिथं बसत होते आणि सामाजिक समस्यांवर चिंतन करत असत त्या काळामध्येही  महिला प्रतिनिधी अशा चिंतन बैठकीमध्ये  आवर्जुन सहभागी होत होत्या. 12 व्या शतकामध्ये समाजापुढील समस्यांवर उपाय योजना अशा प्रकारे करून त्याव्दारे समाज प्रबोधनाचे कार्य बसवेश्वर करीत होते.

आमचा देश जातीवाद, उच्च-नीचतेच्या कल्पना, स्पृश्य-अस्पृश्यता, अशा गोष्टींमध्ये अडकून पडला होता, विखुरला गेला होता. भगवान बसवेश्वर यांनी सर्वांना एका छत्रछायेखाली आणून  उच्च-नीचता, जातीवाद संपुष्टात आणून सगळ्यांना जोडण्याचे खूप मोठे आणि महान कार्य केले होते. आज काहीवेळापूर्वीच आपण जी अधीरतेविषयी चर्चा केली ना, त्यावरून मला आत्ता भगवान बसवेश्वर जी यांची एक गोष्ट आठवतेय. त्यांचे एक वचन आहे, या वचनाचा भावार्थ माझ्या पक्का ध्यानात आहे, तोच मी आता तुम्हाला सांगतो.  त्या वचनामध्ये त्यांनी जे म्हटले आहे, त्याचा भावार्थ असा की, ‘‘ जिथे थांबणे आहे, तिथं जीवनाची समाप्ती आहे. आणि जिथे गती आहे, तिथं जीवनामध्ये नित्यनवीन संधी मिळण्याच्या शक्यता जास्त असतात.‘‘

अशाप्रकारचे भाव भगवान बसवेश्वर यांच्या वचनामध्ये आहेत. थांबला तो संपला, त्या काळातही थांबण्याला त्यांनी मृत्यू मानला आहे. आणि म्हणूनच मी समजतो की, लोकशाहीमध्ये महिला सशक्तीकरणासाठी सामाजिक जाणीवा निर्माण करण्यासाठी भगवान बसवेश्वर यांनी जे काही काम केले आहे, ते आजही आमच्या देशाला आणि संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक आहे. आपण तर स्वतःच कर्नाटकातले आहात.

आज बसवेश्वरांच्या जयंती दिनी मला तिथं जाण्याच,प्रतिमेला वंदन करण्याचे भाग्य लाभले. मला तर असं वाटतं की, आपल्या शालेय वर्गातल्या मुलांनाही बसवेश्वरांच्या कार्याची माहिती झाली पाहिजे. त्यांच्या अनुभवमंडपम या संकल्पनेची माहिती झाली पाहिजे. या माध्यमातून लोकशाहीवादी संस्था त्याकाळातही कशा पद्धतीने विकसित केली होती. यामागे त्या महापुरूषाकडे दूरदृष्टी कशी होती याची माहिती आजच्या मुलांना झाली पाहिजे.

प्रसून जोशी - आपण ही सगळी माहिती दिल्याबद्दल खूप- खूप धन्यवाद.

पंतप्रधान मोदीजी, आपल्या देशामध्ये साहस आणि संकल्प यांची कमतरता नाही. संघर्ष करण्याची सवय तर आपल्या देशाला आहेच. परंतु हीच शक्ती अशीच दुसरीकडे, कुठेतरी वापरली जाते. जर कोणी त्याला दिशा दाखवली, चांगला मार्ग दाखवला, तर किती बरे होईल. आता आपण याविषयावर बोलणार आहोत. चला तर मग आपण याविषयी आलेल्या अनेक प्रश्नांकडे वळूया. विशेष करून भारताला बस फक्त कोणी तरी एखादा छोटासा इशारा करण्याची गरज असते, कोणीतरी प्रारंभी हात पकडण्याची, साथ देण्याची गरज असते. मग नंतर मात्र भारताची गाडी खूप वेगाने पुढे जाते. आणि मग त्याचा अनेकांना लाभ होतो.

असेच कोणीतरी विचारले आहे की, योजना तर प्रत्येक सरकार बनवते. परंतु आपल्या सरकारने बनवलेल्या योजना कशा वेगळ्या आहेत? ज्याविषयी आम्ही बरेचवेळा ऐकले आहे, ते प्रशासनाचे मोदी मॉडेल नेमके कसे आहे?

पंतप्रधान मोदीजी - एक लक्षात घ्या. कोणतेही सरकार सत्तेवर आल्यानंतर काही ते अयशस्वी व्हावे, म्हणून सत्तेवर येत नसते. प्रत्येकजण काही ना काही करण्यासाठीच येत असतो. आधीही सरकारे आली, ते काही ना काही करण्याच्या उद्देशानेच आली. परंतु आपण सगळ्यांची कामे पाहिली, त्यांचे विश्लेषण केले तर असे लक्षात येईल की, आमच्या देशात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या सरकारांनी    लोक सरकारवर अवलंबूनच राहतील, सरकारचे आश्रित बनतील, परावलंबी कसे राहतील, याचाच विचार करून सरकारी धोरण निश्चित केले, योजना बनवल्या. त्यामुळे जनतेला सरकारशिवाय जगणंच शक्य होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली गेली.

माझ्या मते ही संकल्पना समाजाला पंगुत्व आणणारी आहे. अशामुळे समाज दुर्बल बनतो. जर गरीबी हटवायची आहे तर आम्ही गरीबाला शक्तीशाली बनवून गरीबी हटवू शकतो. गरीबांना आयते सगळे पुरवून पुरवून हे काम होवू शकत नाही. आणि त्यांना शक्ती देण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता आहे, ते केले पाहिजे.

यासाठी आत्ता 100 रूपयांऐवजी 200 रूपये खर्च होतील. परंतु त्याचा विनियोग होवू शकणार आहे. आणि म्हणूनच माझा मूळ सिद्धांत आहे तो म्हणजेसमाजामध्ये जी काही शक्ती आहे, तिला आणखी संधी कशा मिळतील, याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. गरीबाची काही साहस करण्याची मनानेच तयारी झाली पाहिजे. आणि असे धाडस करताना काही समस्या निर्माण झाली तर त्याचा हात पकडण्यासाठी आणि त्या संकटातून बाहेर काढण्यासाठीही कोणी तरी भेटेल.   आपल्याला एक अशी इको-सिस्टिम तयार करण्याची गरज आहे. माझा अनुभव असा आहे की -

आता आम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजना तयार केली आहे. आपण ऐकले असेलच काही वर्षांपूर्वी आमच्या देशामध्ये कर्ज मेळावे होत होते. आणि या कर्ज मेळाव्यांमध्ये राजकीय नेतेमंडळी आपल्या चेले-चपेट्यांना त्या कर्ज मेळाव्यामध्ये रांगेमध्ये उभे करीत होते. आपली राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी हा उद्योग असे. आता अशा प्रकारे कर्ज तर मिळत असे आणि नंतर कोणी ते फेडण्यासाठी काही विचारतही नसे. गेले ते गेले. पैसे बँकेचे होते, देशाचे होते, जनतेचे होते, कर्ज मेळावा गरीबांसाठी आयोजित केला होता. हे सगळे दृश्य पाहिल्यानंतर प्रारंभी तर छानच वाटत होतं. परंतु अशा प्रकारच्या कर्ज मेळाव्यांनी गरीबांचे जीवन बदलले का? काहीही बदल झाला नाही.

आता आम्ही एक प्रधानमंत्री मुद्रा योजना आणली आहे. त्या योजनेतून कोणत्याही तारणाविना बँकेकडून कर्ज दिले जाते. मात्र हे कर्ज आधीच्या कर्ज मेळाव्यात दिले जात होते, त्यापेक्षा वेगळे आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत. ज्याला जितके पाहिजे, तितकेच त्याला कर्ज दिले जाते. कामाप्रमाणे, गरजेप्रमाणे कर्ज दिले जाते. आपल्याला जाणून आनंद वाटेल, आत्तापर्यंत मुद्रा योजनेचा लाभ 11 कोटी लोकांनी घेतला आहे. या योजनेतून 5लाख कोटी रूपयांचा निधी कर्ज म्हणून वाटण्यात आला आहे.

आणखी एक विशेष म्हणजे? आत्तापर्यंत मुद्रा योजनेतून कर्जावू देण्यात आलेल्या 11 कोटी लोकांकडून कोणतेही तारण घेण्यात आलेले नाही. हे कर्ज विनातारण दिले आहे. कर्जाच्या बदल्यामध्ये जमीन किंवा इतर मालमत्ता तारण म्हणून घेण्यात आलेले नाही. मुद्रा योजनेतून कर्ज घेणाऱ्यांमध्ये 70टक्के महिला आहेत, हीसुद्धा एक आनंद देणारी गोष्ट आहे.

मुद्रा योजनेतून कर्ज घेवून स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या काही लोकांशी संवाद साधण्याची संधी अलिकडेच मला मिळाली. आणि मला त्यांच्याशी बोलताना, खूप अनोखा अनुभव आला. मी तर अगदी चकीत झालो. हे कर्ज घेवून त्यांनी कितीतरी लहान-लहान व्यवसाय सुरू केले आहेत. आता हळू हळू या उद्योजकांपैकी कोणी पाचजणांना , कोणी तीनजणांना रोजगाराची संधी देत आहेत. आपल्या कामाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी आता नवनवीन पद्धती, मार्ग शोधत आहेत. मला वाटतं की, हेच खरे सशक्तीकरण आहे.

याआधी काय होतं, अरे तू चिंता करू नकोस, सरकारी कामात तुला सहभागी करून घेतो. यामध्ये काही दिवस काम मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. त्या व्यक्तीला वाटायचं, आपलं नशीबच असं आहे, असंच जाणार आपलं आयुष्य. त्याच्यापुढं जाण्याचा तो विचारच करायचा नाही. आम्ही त्याला सक्षम करण्याच्या दिशेने जात आहोत.

आता कृषी क्षेत्राचा विचार करू. भारताला स्वातंत्र्य मिळून 2022 मध्ये 75 वर्षे होणार आहे. तोपर्यंत देशातल्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याची आमची इच्छा आहे. आता यासाठी शेतीसाठी केला जाणारा खर्च, वापरले जाणारे भांडवल कमी केले पाहिजे. म्हणजे कृषी उत्पन्न मिळवण्यासाठी केला जाणारा खर्च कमी झाला पाहिजे.

आता सगळेजण सारखे विचारतात ना, की हे मोदी प्रशासन नेमके काय आहे? त्याबद्दल सांगतो. मी ज्यावेळी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी मी पंतप्रधानांना सर्वाधिक पत्रे पाठवणारा मुख्यमंत्री होतो. विशेष म्हणजे, एकाच विषयावर तर वर्षातून तीन-चार वेळा पत्रं पाठवले आहे. आमच्या राज्यामध्ये शेतकरी वर्गाला यूरियाची अतिशय गरज आहे. तरी आमच्या राज्याचा यूरियाचा कोटा वाढवून द्यावा, यूरिया द्या, अशी मागणी त्या पत्रातून केलेली असे. आणि केंद्र सरकार म्हणायचे, यूरियाचा यापेक्षा जास्त कोटा मिळू शकणार नाही. यूरियासाठी शेतकरी बंधू दोन -दोन दिवस रांगेमध्ये उभे रहात होते. काही राज्यांमध्ये तर यूरिया मिळवण्यासाठी लाठीजार्च करण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. हे सगळं असं का होत होतं?

आता मी आपल्याला सत्यस्थिती सांगतो. आपल्याला माहीत असेलच की, यूरियाचा कारखाना उभा करण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागतात. मी आल्यापासून तर यूरियाच्या एकाही कारखान्याची उभारणी केलेली नाही. सध्या यूरियाचा कारखाना सुरू करण्यासंबंधी प्रक्रियेला प्रारंभ केला आहे, काही दिवसात तो सुरू होईल. जे कारखाने बंद पडले आहेत, तेही सुरू करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. परंतु मी फक्त अतिशय परिणामकारी परिवर्तन केले. जी काही अयोग्य, चुकीची कामे होत होती, ती मी रोखली. प्रामाणिकपणावर जोर दिला. यूरियाचा एकही नवा कारखाना सुरू केलेला नसतानाही 20 लाख टन यूरियाचे उत्पादन वाढले. 

दुसरी गोष्ट म्हणजे अनुदानाची. यूरियासाठी 80-90 हजार कोटी रूपयांचे अनुदान दिले जात होते. अनुदानाच्या नावावर यूरिया काढण्यात येत होता. शेतकरी वर्गाच्या नावावर यूरिया काढण्यात येत होता. परंतु तो सगळा यूरिया चोरून रासायनिक कारखान्यांमध्ये पोहोचवला जात होता. रासायनिक कारखानेवाले त्या यूरियाचा वापर कच्चा माल म्हणून करीत होते. त्यातून अनेक नवीन उत्पादने तयार करून संपूर्ण दुनियेला विकत होते. या रासायनिक कारखान्यांना अतिशय स्वस्तामध्ये यूरिया मिळत होता.

आम्ही यूरियाला नीमकोटिंग केले. आपल्याकडे जे कडुनिंबाची झाडे आहेत ना, त्याची फळे, म्हणजे निंबोण्याचे तेल काढून ते यूरियामध्ये मिसळले. याचा परिणाम काय झाला?

एक- कडुनिंबाची फळे-निंबोण्या वाया जात होत्या, त्या गोळा करण्यासाठी लोकांना रोजगार मिळायला लागला. त्या निंबोणींचे तेल काढण्याचे काम सुरू झाले. आता नीम मिसळलेला यूरिया फक्त आणि फक्त शेतकरी वर्गालाच उपयोगी येतो. दुसरे- रासायनिक कारखान्यांना या यूरियाचा काडीमात्र उपयोग नाही. त्यामुळे यूरियाची चोरी आपोआपच बंद झाली. तिसरी गोष्ट म्हणजे, नीमकोटेड यूरियामुळे ते अधिक शक्तीशाली बनले. जमिनीतील मातीचा दर्जा सुधारला. त्यामुळे उत्पादनामध्ये 5 ते 15 टक्के वाढ झाली. आता मला सांगा किती फायदे झाले आहेत. आता हे परिवर्तन आहे की नाही?

कौशल्य विकासाचाही आम्ही असाच विचार केला. गुजरातमध्ये रासयन कारखाना आहे. आणि रसायन विषयक कौशल्य विकासाचे कार्य पश्चिम बंगालमध्ये मी केले. तर त्याला रोजगार कुठून मिळणार? ज्या ठिकाणी ज्याचे कारखाने आहेत, त्याचा विचार करून जर आवश्यतेनुसार आपण कौशल्स विकास केला तर त्याला ताबडतोब रोजगार मिळणार आहे. आणि त्यामध्ये एक प्रकारची स्थिरता येणार आहे. आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण देशभरामध्ये कोणते उद्योग कोठे चालतात, त्याला कुठे जास्त मागणी आहे. याचा विचार करून कौशल्य विकसनाचे एक तंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे हे कार्य आम्ही लोकांच्या सहभागातून केले आहे. 

एखाद्या क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल व्यवसायासाठी काम करत असलेले दहा कारखाने आहेत. त्यांना आम्ही सांगितले की, आपण दहाजण मिळून एक संस्था निर्माण करा. ऑटोमोबाईलसाठी जे काही मनुष्यबळ लागणार आहे, त्यांना प्रशिक्षण तिथं द्या. आपल्याकडे काम करत असलेल्या अभियंत्यांनीच नवयुवकांना  प्रशिक्षण द्यावे. म्हणजे उद्योगासाठी नेमके कोणते कौशल्य विकसित करण्याची गरज आहे, त्याप्रमाणे प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रत्यक्ष काम करत असलेल्या लोकांनी दिले तर ऑटोमोबाई उद्योगामध्ये नोकरी लगेच मिळून युवकांना प्रशिक्षणाचा लाभ मिळू शकेल. अशा प्रकारच्या योजना आम्ही तयार केल्या आहेत. अर्थात आता हे सगळं कार्य पूर्ण झालं आहे, असं नाही.

आम्ही एक योग्य मार्ग पकडला आहे, त्यावरून प्रवास सुरू केला आहे. आणि म्हणून जे कोणी साहस करते, त्याला सहकार्य, प्रोत्साहन दिले पाहिजे. धाडसाने पुढे जात असलेल्यांना निराश करू नये. ज्याठिकाणी पुढे जाण्यासाठी बोट पकडण्याची, हात पकडण्याची, इतकंच नाही तर अगदी जरूरी पडली तर धक्का देण्याची गरज असेल ते ते सरकारने करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, आणि असा प्रयत्न सरकार निरंतर करीत आहे.

प्रसून जोशी - मोदीजी आपण ज्यावेळी सगळं इतकं विस्तारानं सांगता, संपूर्ण योजनेची माहिती देता, लोकांपर्यंत ती पोहोचण्यासाठी काय आवश्यक आहे, हेही विशद करता, त्यावेळी लक्षात येतं की, आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती गुंतले आहेत. आणि या एकूणच व्यसस्थेचा धागा न् धागा आपल्याशी कसा जोडला गेला आहे हेही समजते. यावरून लोकांनाही जाणवतं की किती कामे होत आहेत आणि एकूणच किती परिवर्तन घडून येत आहे. लोकांना या प्रचंड कामांची संपूर्ण जाणीव झाली आहे, असं आपल्याला वाटतं का?

पंतप्रधान - असं आहे पहा, आपल्याला आठवत असेल तर, देशाची स्थिती आधी काय होती, आणि आता कशी आहे, हा फरक नक्कीच जाणवेल. मी 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचा मुख्यमंत्री बनलो. मी तर कधी पोलिस स्थानकातही गेलो नाही. की कधी सरकारी कार्यालयात गेलो. मी आधी कधी विधिमंडळ पाहिले नव्हते. माझ्यासाठी हे सगळं नवीन जग होतं. मला सगळं काही शिकून, समजून घ्यायचं होतं.  माझा शपथविधीही अद्याप व्हायचा होता. तरीही लोकांना माहीत झाल्यानंतर ते भेटायला यायला लागले. पुष्पहार वगैरे घेवून येते होते. ही तर दुनियेची पद्धतच आहे. अगदी एका रात्रीमध्ये माझ्या दृष्टीने झालेला हा बदल होता. याविषयी मी खूप विचार करत होतो.

मला भेटायला आलेले लोक म्हणायचे, मोदीजी काही करा अथवा न करा, परंतु कमीत कमी संध्याकाळी, रात्री भोजनाच्या वेळी घरामध्ये वीज असली पाहिजे, ती यावी, किमान यासाठी तरी काहीतरी करा.

हे ऐकल्यानंतर मी एक मोहीम हाती घेतली. त्यावर दोन -तीन वर्षे काम केले. आणि विद्युत पुरवठ्याची स्थिती इतकी सुधारली की, 24 बाय 7 अशी अखंड वीज पुरवठा करणारे गुजरात हे देशातले पहिले राज्य बनले.

त्यामुळे गुजरातमध्ये  आज  जी मुले 18-20 वर्षे वयाची आहेत, त्यांना जर विचारलं की, अंधार कसा असतो, तर त्यांना तो माहीतच नाही. पूर्वी गुजरातमध्ये घरोघरी रात्रीचं भोजनही रोज अंधारात होत असे. आमचं सरकार आल्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आहे. आमचं हे सरकार काम चांगलं करतेय, वाईट करतेय, याची चर्चा ज्यावेळी केली जाते, मला वाटतं. आधीच्या सरकारच्या तुलनेमध्ये जर आम्ही केलेल्या कामांचा विचार केला तर तुम्ही कोणतेही मापदंड लावून पहा. देशासाठी जे काही चांगले आहे, ते करतांना आम्ही कसल्याही प्रकारे त्रुटी ठेवली नाही.

2014 च्या आधी वर्तमानपत्रांमध्ये आज भारताचे इतके नुकसान झाले, इतके काही गेला, अशा आशयांच्या शीर्षके आणि त्यांच्या रकाने भरभरून बातम्या असायच्या. आता मात्र बातमी असते, मोदीजी सांगा आज किती आले? अशा बातम्या असतात. देशामध्ये हे विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे, असे मला वाटते. हेच माझे चांगले भाग्य असल्याचे मी मानतो.

याआधीच्या काळात काय वाटत होते? चला, जावू द्या हो, काहीही बदल होणार नाही, असे लोकांना वाटत होते. आजची स्थिती काय आहे? अरे, हे असं का नाही होणार? मोदीजी, तुम्ही आहात म्हटल्यानंतर का नाही होणार? माझ्या टीका केली जाते. काही हरकत नाही. मी टीकेला चांगली गोष्ट मानतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी काम करत नाहीत, अशी टीका होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. तर अरे, मोदी, तुम्ही तर हे करू शकताच, मग का नाही करीत? असे लोक बोलतात. मी या टीकेला खूप चांगला, फायद्याचं मानतो.

फार काय, अगदी प्रसार माध्यमातूनही माझ्यावर टीका केली जाते. प्रसार माध्यमातून होणारी प्रचंड टीकाही मी अजिबात चुकीची वाटत नाही. मोदीजी आपल्याला सत्तास्थानी बसवले आहे तर मग आता तुम्ही करूनच दाखवा, अशा प्रकारची ही टीका असते. देशाच्या प्रगतीसाठी अशी टीका स्वीकारणं, आणि त्या अनुषंगाने कार्य करणं, हा आपल्यामध्ये सहजभाव असणं गरजेचं आहे, असं मी मानतो.

यापूर्वी अमूक तमूक क्षेत्रामध्ये काही काम झाले नाही, ही आधीची गोष्ट आपण सोडून देवू. आता तुम्ही नक्कीच करू शकता. असं ज्यावेळी लोक बोलतात, त्या मी एक मोठे यश मानतो. जे काम झालं नाही, ते मी करू शकतो, हा विश्वास लोकांना आहे, हे चांगलेच आहे, असं मी मानतो.

प्रसून जोशी - आपल्याकडून संपूर्ण देशाला नेहमीच खूप अपेक्षा आहेत, याबद्दल शंकाच नाही. परंतु मला यामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसली ती म्हणजे, तुम्हाला स्वतःसाठी काहीच नको आहे. आपला स्वभाव अगदी फकीरासारखा आहे. हा स्वभाव नेमका कुठून आला ? की आपण अगदी पहिल्यापासूनच, नेहमीच असे आहात? की आपल्या मनामध्ये हळू हळू  फकीरीभाव निर्माण झाले?

पंतप्रधान - हा प्रश्न तर खूपच वैयक्तिक स्वरूपाचा आहे.

प्रसून जोशी - नाही मोदीजी, हा एक आवश्यक प्रश्न आहे.

पंतप्रधान - असं आहे की, मला माझ्याच कवितेचे शब्द लक्षात राहत नाहीत.

प्रसून जोशी- नाही, कवितेमध्ये कुठे फकीरीची कारणे सांगितलीही आहेत.

मोदीजी - माझी ती खूप जुनी कविता...

प्रसून जोशी-  त्या कवितेच्या दोन ओळी आपण ऐकवा, अशी विनंती करू शकतो....

पंतप्रधान - खरंतर मला कविता अजिबात लक्षात राहत नाही, म्हणून ओळी म्हणू शकत नाही. मात्र ती कविता मी समाज माध्यमांमार्फत नक्की शेअरकरेन. मला आठवत असती तर म्हणालोही असतो. आणि ती कविता आहे गुजरातीमध्ये.रमता राम अकेला....असं म्हणत मी माझ्या भावनांना शब्दांमधून व्यक्त केले आहे.

असं आहे की, ही फकीरी वगैरे असते ना , तो एक मनाच्या अवस्थेशी जोडला गेलेला विषय आहे. आणि असा विषय काही वरून वेगळा, इंजेक्टकरता येत नाही. कोणतीही परिस्थिती त्याला निर्माण करता येत नाही. तर ती आतूनच भावना तयार झालेली असते. या भावनेमुळे सर्व काही घडत असते. आणि मला काही स्वतःचे कौतुक करायचे नाही. माफ करा, परंतु प्रसूनजींनी प्रश्नच उपस्थित केल्यानंतर, मी त्याला उत्तर दिलं नाही तर, ते योग्य ठरणार नाही. म्हणून हे मी बोलतोय.

ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी राज्याचा प्रमुख म्हणून सार्वजनिक समारंभामध्ये गेल्यानंतर अनेक लोक भेटवस्तू देत असत. कोणी खूप चांगली शाल देत, कधी कोणी चांदीची तलवार भेट देत, कोणी  अतिशय सुंदर ताजमहलची प्रतिकृती भेट देत होते. असं काही ना काही देतच असायचे. एकापेक्षा एक अतिशय सुंदर चित्रकृतीही भेट देत होते. आता मी पण माणूसच आहे. माझ्या मनातही विचार येत असे, अरे, हे तर खूप सुंदर चित्र आहे. ही चित्रकृती आपल्या घरामधल्या भिंतीवर लावेल तर किती छान दिसेल. घरामध्ये येत असलेल्या पाहुण्यांनाही छान वाटेल. ही इतकी सुंदर मूर्ती आहे. ही या इथं, अशी सजवून ठेवली तर किती छान वाटेल. असं तर माझ्या मनाला वाटेल, तुमच्याही मनालाही वाटेल. वाटेल की नाही वाटणार? मात्र माझ्या मनात असं कधी येत नव्हतं. आणि मी या गोष्टी सरकारच्या ट्रेझरीमध्ये जमा करण्यासाठी पाठवून देत होतो. मी म्हणायचो, मी कुठं ठेवणार या वस्तू? या वस्तू सांभाळण्यासाठी माझ्याकडे कोण आहे? या वस्तू सांभाळण्यासाठी मग मला कोणाला तरी ठेवावं लागेल. असा विचार करून मी त्या वस्तू सरकारच्या भांडारामध्ये जमा करून टाकत होतो.

मग एकदा त्याचे मी मूल्यांकन करून घ्यायला लागलो. त्यानंतर त्या वस्तूंचा लिलाव करायला प्रारंभ केला. हिंदुस्तानमध्ये राजकीय नेत्यांविषयी कशा पद्धतीने आणि कितीतरी उलट-सुलट गोष्टी बोलल्या जातात, हे आपल्याला माहीत आहेच. अमूक होता, त्यानं हे इतकं सारं नेलं. तमूक नेत्यानं इथल्या या गोष्टीसुद्धा नेल्या. अशी कितीतरी चर्चा सुरू असते. आता यामध्ये मला कुणाविषयी बोलायचं नाही. परंतु मी मात्र अगदी अभिमानाने, गर्वाने म्हणू शकतो की, ज्यावेळी मी गुजरात सोडले होते, त्यावेळी मी मला ज्या ज्या गोष्टी भेट म्हणून मिळाल्या त्या सर्वांचा वरचेवर लिलाव करीत राहिलो. आणि या लिलावातून जो काही पैसा आला तो सगळा निधी मी बालिकांच्या शिक्षणासाठी सरकारला दान करत राहिलो. सरकारच्या तिजोरीमध्ये भरत राहिलो. आणि अशा पद्धतीने जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त रूपये वस्तुंच्या लिलावातून मिळाले. आता लोक मला धनादेशही देवू लागले. कोणत्याही कार्यक्रमाला गेले की एखादी भेट वस्तू देण्यापेक्षा बालिका शिक्षणासाठी धनादेश द्यायला लागले. ही रक्कम जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त झाली, ती मी मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी दिली.

ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडून आता दिल्ली यायचे आहे, हे निश्चित झाले. आपण लोकांनी  मला धक्का दिलात त्यावेळी मी आमच्या एका अधिका-याला बोलावले आणि विचारले की, अरे भाई आमदार म्हणून मी जे कमावत होतो, आमदार म्हणून जे भत्ते, पैसे मिळत होते, त्या  इतक्या पैशाचे मी काय करणार? मी कुठं आणि कशाला बरोबर घेवू ते पैसे? माझ्या या प्रश्नावर अधिकारी वर्गाचे उत्तर ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाला. मला आता ती रक्कम नक्की किती होती हे आठवत नाही. कदाचित 5-6 लाख रूपये असावेत. मी म्हणालो, हे पैसे पुन्हा सरकारला द्यावेत, असं वाटतं. आणि अजून एक इच्छा व्यक्त केली की, गांधीनगर सचिवालयामध्ये जे गाडीचालक, शिपाई आहेत. त्यांच्यासाठी मी काही रक्कम ठेवून जातो. त्या रकमेची सगळी व्यवस्था तुम्ही करा, असं मी त्या अधिका-यांना सांगितलं. या रकमेच्या व्याजातून गाडीचालक आणि शिपाई यांच्या मुलांना काहीना काही मदत दिली जावी, त्यांचे शिक्षण चांगले व्हावे, अशी माझी इच्छा होती, म्हणून तशी व्यवस्था मी करायला सांगितली.

माझ्यासमोर उभे असलेले जे अधिकारी होते, ते काहीच बोलले नाही. अधिकारी चांगले कुशल होते. त्यांनी होकारार्थी मान हलवली. मलाही वाटलं की, त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आहे, आणि त्याप्रमाणे ते काम व्यवस्थित करतील. दोन दिवसांनी मला ते अधिकारी म्हणाले, साहेब जरा घरी येवून आपल्याला भेटायचं आहे, बोलायचं आहे. मी म्हणालो, या. त्यावेळी मी दिल्लीला जाण्याची तयारी करत होतो. अधिकारी घरी आले आणि म्हणाले, साहेब तुम्ही हे सगळे पैसे देवून टाकू नका. आपल्याला कधी, कशामुळे पैशांची गरज लागेल, हे काही सांगता येत नाही. आपण सगळे पैसे तर वाटून टाकले आहेत. मी सारखं म्हणत होतो, अरे बाबा, मला या पैशांचा काय उपयोग? मी कशासाठी नेवू बरोबर पैसे? परंतु माझं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. मी सगळे पैसे देवून टाकावेत, असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं.

शेवटी खूप समजावल्यानंतर त्यांनी माझा एक आग्रह मानला. त्या पैशातून एक प्रतिष्ठान निर्माण केले. मला आता नक्की रक्कम आठवत नाही. कदाचित 21 हजारांचा निधी माझ्या पैशातून प्रारंभी त्या प्रतिष्ठानमध्ये जमा केला. गरीब, गरजू लोकांना त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत दिली जावी, असं सांगून मी तिथून निघालो.

अभावकाय असतो, हे मी माझ्या आयुष्यात खूप पाहिले आहे, म्हणून कदाचित माझ्यावर कशाचाच प्रभावपडत नसावा. आणि हे फकीरी वगैरे तर मोठे शब्द आहेत, परंतु मी अवलिया आहे. मला कशाचंही काहीही देणं-घेणं नाही.

प्रसून जी - हे सगळं ऐकल्यावर एक लक्षात येतं सर, हीच तर फकीरी आहे. त्याच्याचबद्दल मी बोलत होतो.

आपण अनेक महान कार्ये केली आहेत, त्याकडे मी लक्ष वेधत होतो. प्रेक्षकांकडूनही आणखी काही प्रश्न आले आहेत. जी खूप आधीपासून, पहिल्यांदा विनंती आली आहे, त्यापैकी काही हे प्रश्न आहेत, ते मी विचारतो.

हा प्रश्न श्री. तरणप्रीत सिंह जी विचारू इच्छितात. श्री. तरणप्रीत सिंह जी, आपण कृपया प्रश्न विचारावा.

तरणप्रीत सिंह - सत् श्री अकाल.

पंतप्रधान - सत् श्री अकाल.

तरणप्रीत सिंह - आमचे श्रद्धेय युवा पंतप्रधानजी, आपण आम्ही सर्व भारतीय युवकांसाठी एक आदर्श व्यक्ती आहात. तुम्ही आमचेरोल मॉडेलबनले आहात. केवळ भारतीय युवकांसाठीच नाही तर वेगवेगळ्या देशातल्या युवकांचेही तुम्ही रोल मॉडेल आहात. दिवसभर 20 -20 तास काम करणे, ही काही सोपी आणि लहान गोष्ट नाही. आपल्याला थकवा आला आहे, असेही कधी जाणवत नाही. माझा आपल्याला प्रश्न आहे की, इतकी सारी ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? आपण योग करता, हे आम्हाला माहीत आहे. परंतु आपल्याकडे असलेल्या प्रचंड ऊर्जेचे गुपित आम्हाला सांगावे, म्हणजे आम्हीही आमच्या आयुष्यात त्याचा वापर करून देशाच्या हितासाठी पुढे जावून काही कार्य करू शकू.

पंतप्रधान - या प्रश्नाचे अनेक उत्तरं असू शकतात. अगदीच मजेत मजेत बोलायचं आणि आजच्या संध्येला थोडसं विनोदी रूप द्यायचं असेल तर माझं उत्तर आहे की, गेली दोन दशकांपासून, म्हणजे जवळपास 20 वर्षांपासून मी अगदी दररोज, न चुकता एक किलो, दोन किलो शिव्या खातोय.

आणि अगदी साधं, सरळ उत्तर देतो. कदाचित ही  जुनी गोष्ट आपणही ऐकली असेल. कुठलं तरी एक तीर्थस्थान होतं. उंच पर्वतरांगेमध्ये असलेल्या या तीर्थस्थानी कोणी एक संत-महात्मा बसले होते. आणि त्यांनी पाहिलं की, एक आठ वर्षांची छोटीसी मुलगी आपल्या तीन वर्षाच्या धाकट्या भावाला पाठीवर उचलून ती उंच डोंगर चढत होती. त्या संतांनी तिला विचारलं की, मुली, बेटा तू  थकली नाहीस ना?या प्रश्नावर ती मुलगी उत्तरली, हा तर माझा भाऊ आहे.संतांनी पुन्हा एकदा विचारलं,हा तुझा कोण लागतो, हे मी तुला विचारलंच नाही. तू दमलीस नाहीस का, याला पाठीवर घेवून ही चढण चढताना, तुला थकायला होत नाही का?असं मी विचारलं. या बोलण्यावरही त्या मुलीने पुन्हा एकदा तेच उत्तर दिलं. हा तर माझा धाकटा भाऊ आहे.

यावर परत एकदा तिसऱ्यांदा तिला विचारलं, अगं, मी तुला हा तुझा कोण लागतो, हे विचारत नाही. तू याला घेवून चढते आहेस, थकवा नाही का वाटत?यावर ती मुलगी म्हणाली, आजोबा, हा माझा भाऊ आहे, दुसरं कोणतंही ओझं नाही. भावाला नेताना कसली दमणूक?

माझ्यासाठी माझे सव्वाशे कोटी देशवासी, हाच माझा परिवार आहे. ज्याठिकाणी, ज्याक्षणी आपण आपलेपणा अनुभवतो, कितीही थकलेले असू दे. झोपण्याची वेळ, इच्छा होवू दे, शरीरही सहकार्य करीत नसले तरीसुद्धा आपल्याला जर फोन आला, आणि समजले की, पुतण्याची तब्येत बरी नाही. त्याला रूग्णालयात दाखल केलेय. अशावेळी सगळा थकवा बाजूला राहतो. आणि आपण स्कूटर काढून लगोलग धावत-पळत जाता. रात्रभर त्याची सेवा करता. हे सगळ का? कारण तो आपला पुतण्या आहे. आपण थकवा वाटत नाही. स्वतः कामाला लागतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या परिवारासाठी आहे. त्यामुळे मी या माझ्या कुटुंबासाठी कार्यरत असतो. कधी त्रिपुरातून काही बातमी येते, कधी केरळातून वेगळीच बातमी येते, कधी दिल्लीतून वृत्त येते, तर मनाला वाटतं, चला, उठा, कामाला लागा.

यामध्ये सर्वात मोठी गोष्ट कोणती आहे तर मनाची अवस्था. आज मी पंतप्रधान आहे, त्यामुळे आज माझ्यासाठी कोणी पाणी आणतं, तर कोणी चहाही अगदी हातामध्ये तयार दिला जातो. पण पंतप्रधान नसताना काय असेल? म्हणून मला वाटतं, मी कोणावरही कधीही ओझं बनून राहू नये. त्यामुळे दुसरी गोष्ट आहे, मी कधीच कोणावर ओझं बनू नये अशी माझी इच्छा आहे आणि त्याला परमात्माने मला सहाय करावे. एखाद्या दिवशी अशाच पद्धतीने हसत-खेळत गप्पा मारताना निघून जावं. आयुष्यात कोणावरही कधी ओझं बनून रहावं लागू नये, म्हणून शरीर जितके तंदुरूस्त, स्वस्थ, फिट ठेवणं शक्य आहे, तितकं ठेवतो. या शरीरानं जितकं काम करता येणं शक्य आहे, तितकं काम करतो. जितक्या नियमांचं पालन करता येईल, तितके करतो. जे काही शिकलं आहे, ते सर्व काही आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मी सर्व नवयुवकांना सांगू इच्छितो की, वारसा हक्कानं खूप काही मिळू शकते परंतु आपल्या स्वतःला तंदुरूस्त ठेवायचं असेल तर आपल्या माता-पित्यांच्या वारशावर अजिबात भरवसा आता ठेवू शकत नाही. जे काही करायचे आहे, ते तुम्हाला स्वतःलाच करायचे आहे.

माता पित्यांच्या जनुकांचा वारसा घेवून तुम्हाल चांगली उंची मिळू शकते, कातडीचा चांगला रंग मिळू शकतो. वारशाने सुंदर डोळे मिळू शकतात, नाकचेहरा सुंदर, रेखीव मिळू शकतात. परंतु या शरीराच्या आतले आरोग्य तुम्हालाच सांभाळावे लागणार आहे. आणि माझा अनुभव असं सांगतो की, डिटॅचमेंट म्हणजे अलिप्तपणा यामध्ये एक खूप मोठी ताकद आहे. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे अतिशय नियमित आयुष्य आपण जर जगलो तर आपण ज्या कामासाठी निघालो आहोत, ते काम करण्यासाठी स्वतःला योग्य बनवू शकता. आपण जिथं राहतो, तिथं आपण कुणावर ओझे बनले नाही पाहिजे. कधीच कुणावरही ओझे बनू नये.

प्रसून जोशी – फिटनेस काही वारशाने मिळत नाही, ा फिटनेसचा मंत्र तर तुम्ही आत्ता दिलाच आहे. जे काही करायचे आहे, ते आपल्यालाच करायचे आहे. मोदीजी अनेक प्रश्न आले आहेत. मी नावं वाचतो आणि त्यापैकी आपण किती प्रश्न घेवू शकतो, हे पाहूया. एक अमित दुबे जी आहेत, एक आशुतोष दीक्षित जी यांचा प्रश्न आहे. ही मंडळी आत्ता इथंच आहेत. सतीश जी आणि प्रेम सिंह जी यांचेही प्रश्न आहेत.

अमित दूबे जी आपला प्रश्न सर्वात आधी आहे. परंतु हे लिहिलेले मी व्यवस्थित पूर्ण वाचू शकत नाही. परंतु मला वाटतेय की हा प्रश्न डिजिटल भारताविषयी विचारलेला आहे.

पंतप्रधान - संपूर्ण जग आता तंत्रज्ञानावर चालते, ही गोष्ट अगदी खरी आहे. आता आपण तंत्रज्ञानापासून दूर राहू शकत नाही. तंत्रज्ञानाशिवायही राहू शकत नाही. त्याचा जास्तीत जास्त वापर कसा केला जाईल याचा विचार आपण केला पाहिजे, असे मला वाटते. आणखी एक म्हणजे हे माहिती तंत्रज्ञानामधील क्रांती आहे. डिजिटल जगातली क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये आपण आता प्रवेश करतोय. या जगात जास्तीत जास्त पारदर्शक असण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणूनच  कार्यक्षमताही जास्त आहे. पारदर्शकतेबरोबरच सुलभ प्रशासन आहे. हे सगळे फायदे पाहिल्यानंतर, लक्षात आल्यानंतर आपण त्यावर भर देण्याची गरज आहे. असं मला वाटतं.

भारतामध्ये ऑप्टिकल  फायबरचे जाळे पसरविण्याचे खूप मोठे काम सध्या अतिशय वेगाने सुरू आहे. आपल्याला ही माहिती समजल्यावर मोठे नवल वाटेल. आधी तीन वर्षांमध्ये फक्त 59 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क सुरू करण्यात आले होते. अर्थात हे काम मी येण्याची आधी झालेले आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्क किती लाभदायक आहे, त्यामुळे ते कसे करायचे त्याचा मार्ग माहीत होता. ऑप्टिकल फायबर नेटवर्क असेल पाहिजे, हेही माहीत होते. निधी उपलब्ध होता. काम करणारी मंडळी होती. तरीही तीन वर्षामध्ये फक्त 59 गावांमध्ये हे काम होवू शकले. मी आल्यानंतर आहे तोच निधी, माणसे सगळं काही तेच वापरून तीन वर्षांच्याआत एक लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये  ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम पूर्ण करण्यात आले. काम करण्यामध्ये हा फरक आहे.

आता ज्याप्रमाणे आम्ही एक जीईएम-जेम योजना बनवली आहे. यामध्ये कोणीही व्यक्ती या डिजिटल साधनांमुळे त्यामध्ये आपली नाव नोंदणी करू शकते. ती व्यक्ती एकटीच आपल्या घरामध्ये छोट्या प्रमाणावर उत्पादन करत असेल , तर ती व्यक्ती भारत सरकारलाही आपले उत्पादन विकू शकते. यासाठी मधल्या दलालांची आवश्यकता नाही. तसेच मोठमोठ्या निविदा भरण्याचीही गरज नाही. मोठमोठ्या कंपन्यांची आवश्यकताही नाही.

तामिळनाडूच्या एका महिलेचे पत्र वाचून मला नवल वाटलं. मी अगदी नियमितपणे आलेल्या पत्रांपैकी अगदी हाताला येतील ती 10 -12 पत्रे वाचण्याचा रोज प्रयत्न करत असतो. पत्रे तर रोज हजारो येतात. सगळी तर वाचू शकत नाही. ते खात्याचे काम आहे. परंतु कोणतीही 10-12 पत्रे स्वतः वाचतो, त्यामुळे मला सामान्य माणसांच्या भावना नेमक्या काय आहेत, हे समजते.

एके दिवशी असेच माझ्या हाताला एक पत्र लागले. ते पत्र तामिळनाडूच्या महिलेने लिहिले होते. त्या भगिनीने लिहिले होते की, मला दोन मुली आहेत. त्यांचे विवाह करायचे आहेत. घरामध्ये पैशांची आवश्यकता होती. मी विचार केला की काही काम सुरू करावे. त्यावेळी माझ्या मुली म्हणाल्या, तू मुद्रा योजनेतून कर्ज घे. मी अर्ज केला. मुद्रा योजनेतून मला पैसे मिळाले. अगदी 15 दिवसामध्ये हे पैसे मिळाल्याचेही खूप आश्चर्य वाटले. मग मी बाजारातून सामान आणून त्यांची विक्री करायला प्रारंभ केला. अशाच वेळी माझ्या मुली म्हणाल्या, जीईएममध्ये तू नावनोंदणी करून ठेव. मी त्याप्रमाणे माझे नाव नोंदवले. आणि जेमच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाला चहाचे दोन थर्मासची आवश्यकता आहे हे मला समजले. मी बाजारात चैाकशी करून जसे थर्मास हवे होते, तसे मिळवले आणि मी पंतप्रधान कार्यालयाची थर्मासची मागणी पूर्ण करू शकते, हे कळवले. जेमच्या माध्यमातूनच मला ती ऑर्डर मिळाली. आणि मी, माझे दोन थर्मास देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये पोहोचवले. या थर्मासचे माझे पैसेही लगेच मिळाले. त्या भगिनीने लिहिले होते की, माझ्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. लक्षात घ्या, ही डिजिटल क्रांती आहे. आणि त्यामुळेच हे सगळे शक्य झाले आहे. नाहीतर तामिळनाडूतल्या एका गावातल्या एका महिलेने व्यापार सुरू केल्यानंतर तिची वस्तू पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत कशी काय पोहोचली असती का? परंतु हे काम आता झाले आहे.

आपल्याला डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्येही क्रांती घडवून आणायची आहे. सेवा करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. आता त्याच दिशेने भारत प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मला वाटतं की माहिती तंत्रज्ञान क्रांतीमध्ये भारताचे खूप मोठे योगदान आहे. त्याचा लाभ भारतामधल्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे. आणि आम्ही त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. 

प्रसून जोशी- दुबे जी आपले  या उत्तरामुळे समाधान झालं असेल, अशी आशा करतो. आता आपण पुढे जावू या.

मोदीजी, भारताचे साहस आणि संकल्प यांच्यानंतर आता आपण चर्चा करूया आगामी काळाविषयी. भविष्याविषयी, आणि भारताचे लक्ष्य यांच्याविषयी. आत संपूर्ण विश्व भारताकडे मोठ्या आशेने, अपेक्षेने पाहत आहे. आणि भारताला स्वतःला आतून हे माहीत आहे की, त्याला आणखी खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. या नवीन जागतिक समिकरणामध्ये भारताची नेमकी भूमिका काय असणार आहे?

पंतप्रधान - आपल्या पासपोर्टची म्हणजेच पारपत्राची ताकद वाढली आहे, असा अनुभव आपण सगळेच जण घेत असणार आहे. वाढली आहे की नाही? आपण परदेशामध्ये वास्तव्य करता, आता नव्याने कोणाही व्यक्तीला ज्यावेळी तुम्ही भारतीय आहात, हे समजते, त्यावेळी तो ज्या नजरेने पाहतो, त्यावेळी लक्षात येत असेल की, आपला मान पहिल्यापेक्षा वाढला आहे. समोरच्या व्यक्तीची ही नजर बदलली आहे की नाही? अगदी खरं सांगा. असेच मला खुश करण्यासाठी सांगू नका. खरंच बदल झाला आहे ना? आपल्याबद्दल लोकांना आता गर्व वाटतोय ना?

हिंदुस्तान तर आहे तोच आहे. आधीही होता. आपणही होता. दुनियासुद्धा होती. मात्र आता खूप फरक जाणवतो की नाही?

हे हिंदुस्तानने करून दाखवलं आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. फक्त सव्वाशे कोटींचा हा देश आहे, आणि खूप मोठी बाजारपेठ आहे, असे म्हणून नाही. भारताने आपल्या धोरणांच्या माध्यमातून, संतुलित व्यवहारातून काही गोष्टी केल्या.  तणावपूर्ण विश्वामध्ये तुम्ही चांगले- आम्हीही चांगले, तुम्ही भले- आम्हीही भले, मग आता आपण एकत्र बसू, एक छायाचित्र काढू, अशा प्रकारची रणनीती आता भारताने सोडून दिली आहे. जे काही खरे आहे, ते  अगदी उच्चरवाने सांगणे, जे सत्य आहे ते मोठ्या धाडसाने सांगून त्यालाच बरोबर घेवून पुढे जाण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानने दाखवले आहे.

आपण कल्पना करू शकता, स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपर्यंत हिंदुस्तानचे पंतप्रधान इजरायलला गेले नाहीत, यामागे कोणता दबाव होता? हिंदुस्तानमध्ये इतके धाडस, इतका दम पाहिजे की, हिंदुस्तानने अगदी उच्चरवामध्ये सांगितले पाहिजे की, मला जर इजरायलला जायचे असेल तर मी थेट इजरायलला जाणार. आणि ज्या दिवशी मला पॅलेस्टाईनला जायचे असेल त्या दिवशी तितक्याच धाडसाने मी पॅलेस्टाईनलाही जाणार. मी सौदी अरेबियालाही जाणार. तितक्याच प्रेमाने जाणार आणि सन्मानही मिळवणार. देशाला आवश्यक असलेल्या ऊर्जेच्या सुरक्षेसाठी आवश्यकता असेल तर मी इराणलाही जाणार.

आपण कल्पना करू शकता, यूएई- भारत फक्त एक -दीड तासाचं अंतर आहे. दोन तासामध्ये आपण पोहोचू शकतो. 23 वर्षे या देशाला कोणी भेट दिली नाही. मला आता मला सांगा, हिंदुस्तानविषयी त्यांना काही अपेक्षा असेल की नाही? मग आपल्या कोण रोखत होतं ? आज विश्वातल्या सगळ्या देशांशी आपण बरोबरीचे नाते तयार केले आहे. ज्यावेळी मी निवडणूक लढवत होतो, त्यावेळी माझ्यावर सर्वांनी खूप टीकेची अगदी झोड उठवली होती. लोक खूप टीका करत होते. ही टीका अशी होती की, हा चहा विकणारा मोदी, एका राज्याचा  मुख्यमंत्री, इतका मोठा देश, तो कसा चालवायचा हे त्याला काय समजणार? आणि  विदेश नीती तर याला काही समजणारच नाही.

अशी माझ्यावर खूप टीका होत होती. हा माणूस देशाचे नाचक्की करणार असंही लोक म्हणत होते. परंतु आज चार वर्षांनी आता कोणीही एकही प्रश्न उपस्थित करीत नाही, की टीकाही होत नाही. याला कारण काही मोदी नाही. मोदीला सव्वाशे कोटी देशवासियांच्या ताकदीवर विश्वास आहे. मोदीला हिंदुस्तानच्या महान परंपरांविषयी आस्था आहे.

मोदीला हिंदुस्तानचा इतिहास, हिंदुस्तानची संस्कृती, हिंदुस्तानची जीवन पद्धती यांच्याविषयी संपूर्ण श्रद्धा आहे आणि मला विश्वास आहे की, दुनियेला भारताचे सत्य काय आहे, भारताची ताकद काय आहे, हे मी चांगले समजावू शकतो. आज त्याचाच परिणाम दिसून येत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेले बदल दिसून येत आहे. माझ्या वेळापत्रकाप्रमाणे यू.के. मध्ये राष्ट्रकूल देशांमध्ये कार्यक्रम करण्यासाठी जायचे होते. भारतासाठी गर्व, अभिमान करण्याची गोष्ट म्हणजे, स्वतः प्रिंस चाल्र्स भारतामध्ये आले. त्यांनी इथं येण्याचे आमंत्रण दिले. मागच्या वेळेस माल्टा इथं झालेल्या परिषदेला मला उपस्थित राहता आलं नव्हतं. यावेळी स्वतः प्रिंन्स चाल्र्स आले होते. फक्त मला एकट्यालाच असं वैयक्तिक निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. यावेळी आपण जरूर या‘, असं त्यांनी सांगितलं होतं.

इतकंच नाही. इतकंच नाही. महाराणीने स्वतः मला वैयक्तिक पत्रही लिहिले होते. यावेळी आपल्याला यावं लागेलच, असं त्यांनी लिहिलं होतं. हा काही फक्त मोदीचा विषय नाही. हे भारताच्या प्रोफाईलमुळेच शक्य झाले आहे.

एक काळ असा होता की, मानवतेच्या मुद्यावर चर्चा केली जात होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पश्चिमेकडील देशांची चर्चा होत होती. भारताविषयी कोणीच बोलत नसायचे. परंतु ज्यावेळी यमनमध्ये 5 हजार, 6हजार लोक अडकले त्यावेळी त्यांची सुटका करण्यासाठी दुनियेतल्या अनेक देशांनी भारताला विनंती केली. आपण जर आपल्या देशाच्या लोकांची सुटका करीत आहात,तर त्यांच्याबरोबरच आमच्याही लोकांची सुटका करा. आणि जगभरातल्या 2000 नागरिकांना आम्ही यमनच्या बाहेर काढू त्यांच्या देशांना पोहोचवण्याचे काम केले होते.

म्यानम्यारमध्ये रोहिंग्यांची समस्या निर्माण झाली. संपूर्ण जगाने त्या प्रश्नाला मानवी हक्क, जिग्ना, आणि अशी अनेक कारणे सांगून आपले हात झटकले. आम्ही काही तिथंच थांबलो नाहीत. रोहिंग्या लोक जे बांगलादेशात परत गेले होते, आम्ही म्हणालो, बांगलादेश आमचा मित्र देश आहे. आम्ही स्टीमर भरून भात घेवून तिथं पोहोचलो. जे रोहिंग्या आले आहेत, त्यांनी उपाशी मरावं, असं आम्हाला वाटत नाही. मानवतेच्या कोणत्याही कामामध्ये भारत मागे राहणार नाही. म्यानम्यारमध्ये रखैन राज्य आहे. तिथल्या या लोकांना समस्येला सामोरं जावं लागत होतं. विकास झालेला नाही, भारताने म्यानम्यार सरकारबरोबर सामंजस्य करार केला आहे की, आम्ही रखैन प्रदेशाच्या विकासासाठी जी काही मदत लागेल, ती करण्यास तयार आहे. तसा करारही केला आहे.

नेपाळवर भूकंपाचे संकट आले. अशावेळी सर्वात प्रथम मदतीसाठी भारतच तिथे पोहोचला. नेपाळच्या सुख दुःखाची चिंता भारतानेच केली. भारताने आपल्या व्यवहारामध्ये कधीच, कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला नाही. दुनियेतल्या प्रत्येक घटकाशी भारताने बरोबरीचा व्यवहार केला. एकदा मला प्रसार माध्यमांनी विदेश नीतीबाबत प्रश्न विचारला होता. आणि मी उत्तर दिले होते की, माझी विदेश नीती कशी असेल, कशी नसेल, कोणता विचार केला जाईल, याविषयी मोठमोठ्या शब्दांची व्याख्या तर मला सांगता येणार नाही. परंतु मी इतकं तर नक्की सांगतो की, आम्ही कधीच कोणाशीही नजर झुकवून चर्चा करणार नाही. आणि तसंच नजर वर करूनही बोलणार नाही. तर आम्ही नजरेला नजर भिडवून चर्चा करणार आहे. आणि आज आपण माझ्या या म्हणण्याचा अर्थ लक्षात घेवू शकता. आमच्या या धोरणामुळेच आज विश्वभरामध्ये भारताने एक विशिष्ट स्थान कमावले आहे. ज्यावेळी भारताने वैश्विक तापमान वृद्धीची चर्चा केली आणि हवामान बदलाविषयी चिंता व्यक्त केली, त्याचवेळी भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पर्यायही सर्वांसमोर मांडला.

संपूर्ण जगापुढे दहशतवादाची समस्या गंभीर बनली आहे. जग अतिशय त्रासले आहे. अशावेळी भारताने मानवतावादी शक्तींना एक -एक करीत लोकशाहीवादी मूल्यांचे महत्व पटवून देण्याइतका विश्वास मिळवला आहे. या मूल्यांसाठी, आता सगळे लोक एकत्र येत आहेत. ही मानवतेच्या विरोधातली लढाई आहे. ही समस्या कोणत्याही एका देशाची, जाती, धर्म, संप्रदाय यांच्याशी जोडलेली नाही. हे मानवतेच्याविरोधातले युद्ध आहे. त्यामुळे सर्व मानवतावादी शक्तींना एकत्र आणण्यासाठी भारत नेतृत्व करीत आहे.

तिसऱ्या जगतामधील देशांना, त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. आज त्यांचा प्रवक्ता म्हणून भारत काम करत आहे. याचा अर्थ भारताने विदेश नीती करताना आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच आपल्या लक्षात येईल की, भारताचे आता एक वेेगळे स्थान निर्माण झाले आहे. प्रत्येक आंतराराष्ट्रीय परिषदेची कार्यक्रम पत्रिका काय असावी, कोणत्या गोष्टींना त्यामध्ये स्थान द्यावे, हे आता भारत निश्चित करीत आहे.

जी -20 शिखर परिषदेमध्ये काळ्या पैशाच्या विरूद्ध लढाई लढण्यासाठी भारताने पुढाकार घेतला. आज जी -20 समूह देशांकडून आपल्याला सर्व माहिती मिळण्यासाठी भारताशी सामंजस्य करार केले जात आहेत. जगभरातील इतर अनेक देशांबरोबरही सहकार्याचे करार केले जात आहेत.

एकूणच आज भारत दिशा निश्चित करणारा देशबनत आहे. एक कार्यक्रम निश्चित करणारा देश बनला आहे. भारताचे आपले एक महत्व आहे, भारत आपल्या प्रोफाइलमुळे संपूर्ण देशामध्ये नवीन विश्वास निर्माण करत आहे.

प्रसून जोशी- आत्ता आपण नजरेला नजर भिडवून बोलण्याविषयी चर्चा केली. आणि कार्यक्रम तयार करण्याचीही चर्चा केली.

think very clear it tells us where India is going towards, where we are marching towards

एक प्रश्न आहे, आता आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे आणि खूप प्रश्न विचारण्याची इच्छा आहे. खूप प्रश्न आलेही आहेत. परंतु एक प्रश्न बराच वेळ झाला विचारून, तो घेवू या. अनुश्री घिसाद जी, कृपया आपला प्रश्न विचारावा.

अनुश्री घिसाद - नमस्ते मोदीजी जी.

पंतप्रधान - नमस्ते.

अनुश्री घिसाद - मोदीजी आपण, भारताच्या हितासाठी अनेक नवीन गोष्टी केल्या. उपाय केले. आणि त्याचे परिणाम आम्ही फक्त देशातच नाही तर आंतराराष्ट्रीय स्तरावरही आम्हाला जाणवले. इतकं सगळं करूनही आज देशामध्ये अशा अनेक शक्ती आहेत की, कोणतीही किंमत मोजून सत्ता हस्तगत करण्यासाठी कार्यरत आहेत. अशा कारवाया सुरू असतानाही, आपण कधी डगमगत नाही का?

पंतप्रधान - मला वाटतं की हेच लोकशाहीचे खरे सौंदर्यआहे. लोकशाहीमध्ये जर विरोध नसेल, टीका नसेल तर मग ती कसली लोकशाही? आणि मला वाटतं की, म्हणजे हे माझ प्रामाणिक आणि ठाम मत आहे की, लोकशाहीची सर्वात उत्कृष्ट गोष्ट कोणती, खरे सौंदर्य कोणते तर ती आहे टीकाहोणे.

मोदी सरकारवर जास्तीत जास्त टीका झाली पाहिजे, असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वप्रकारे टीका झाली पाहिजे. लोकशाहीच्या दृष्टीने टीका म्हणजे एक प्रकारे तप, साधना आहे. भरपूर टीकेच्या तपाने, साधनेने तर लोकशाही अधिक मजबूत होणार आहे. वाढणार आहे. या टीकेमुळेच सरकारमध्ये असलेले, शासनकर्ते असलेले लोक सतर्क राहू शकणार आहेत. आणि म्हणूनच कोणी टीका करीत असेल तर, ते मी माझे भाग्य मानतो. मी टीकेला कधीच वाईट मानत नाही.

माझ्या चिंतेचा विषय काही होणारी टीका अजिबात नाही. टीका करण्यासाठी वास्तविक खूप संशोधन करावे लागते. खूप परिश्रम घ्यावे लागतात. ज्याविषयी टीका करायची आहे, त्या विषयाची अगदी बारकाईने माहिती घ्यावी लागते. वस्तुस्थिती आणि आकडेवारी जमा करावी लागते. संपूर्ण इतिहास काढून, जाणून घ्यावा लागतो. मात्र या गडबडीच्या, धावपळीच्या काळामध्ये कोणाकडे इतके सारे करण्यासाठी वेळ आहेच कुठे? कुणालाच वेळ नाही. अतिशय कमी लोक एखाद्या विषयाचा असा सखोल अभ्यास करतात. सगळेजण चोवीस तास, सात दिवस वेगातच असतात. आपल्यालाच पुढं जायचं आहे, ब्रेकिंग न्यूज मी देणार की तो देणार, या धावपळीच्या युगामध्ये टीका म्हणजे आरोप असे समिकरण होवून बसले आहे. टीकेचे रूप आता आरोपाने घेतले आहे आणि ही माझ्या मते दुर्भाग्याची गोष्ट आहे. टीका राहिली बाजूला आता आरोप करताना मर्यादांचे उल्लंघन होते, त्याची जाणीव कोणाला नसते, हे तर  जास्त दुर्दैवी आहे.

लोकशाहीची सर्वात मोठी ताकद जर कोणती असेल तर ती म्हणजे होणारी टीका. आणि लोकशाहीसाठी सर्वात मारक, विनाशक कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे केले जाणारे आरोप. आणि म्हणूनच एका लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी टीका सर्वात जास्त झाली पाहिजे आणि आरोप करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केले पाहिजेत. आरोप होणारच नाहीत असे प्रयत्न केले पाहिजेत.

या मूलभूत तत्वांची मला चांगली माहिती आहे आणि मी ही तत्वे उत्तम जाणतो. आणि म्हणूनच सरकारमध्ये मला जर कोणी चांगली बातमी दिली, सरकारने केलेल्या चांगल्या कामाची माहिती मला कोणी दिली तर मी म्हणतो, हं, ही गोष्ट ठीक आहे. मी नंतर त्याकडे पाहतो. परंतु आधी हे सांगा की, या गोष्टीमध्ये कोणती कमतरता होती, कशाचा अभाव होता, हे मला आधी सांगा, आधी दाखवा. एक लक्षात घ्या, कोणीही परिपूर्ण नाही. काही ना काही कमतरता प्रत्येकामध्ये असतेच. आपण सगळे माणूस आहोत. आपल्या प्रत्येकामध्ये काही कमी असणारच. आमच्याकडूनही काही चुका होवू शकतात.

आता जर कोणी या चुका दाखवून देत असेल आणि मी त्या ऐकूनच घेणे बंद केले तर मग माझ्या चुका कधीच सुधारल्या जाणार नाहीत. यामुळे देशाचे कधी भले होणार नाही. आणि म्हणूनच मी नेहमीच टीकेचे स्वागत करतो. परंतु माझ्यावर आरोप असा आहे की, मोदीजी इतकी टीका केली जाते, आपण काही बोलत कसे काय नाही? अरे बाबा, तुम्ही केलेल्या टीकेला मी इतकं महत्व देतो की, ते नेमकं काय घडलं आहे, हे जाणून घेण्याची प्रयत्न करीत राहतो. त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत राहतो. आपले तोंड बंद करण्याचे काम माझे नाही. हा मार्ग तर चुकीचा आहे. आपण आज जे काही बोलता आहात, ते माझ्यासाठी मूल्यवान आहे.

आपण माझ्यावर जी टीका करता, तो माझ्यासाठी एक मोठा खजिना आहे. तो माझ्यासाठी सोन्याची खाण आहे.

प्रसून जोशी - परंतु आपण कोणती टीका आपल्यासाठी महत्वाची आहे, कुणाच्या टीकेला महत्व द्यायचे, हे आपण कसे निश्चित करता?

पंतप्रधान - असं आहे की, अमूक हे काळं आणि तमूक ते पांढरं असं तर कधी होवू शकत नाही. या टीकेला चांगलं मानायचं, त्यानं केलेल्या टीकेकडे लक्ष द्यायचं नाही, हे काही ठरवून करता येत नाही. आता हा कार्यक्रम  मी करतोय, तर तुम्हाला आणि मला  वाटतंय की, काय छान सुरू आहे. परंतु कोणाला तरी वाटत असेल की, मोदींनी हा कार्यक्रम बंद केला तर चांगलं होईल. कोणी तर असंही म्हणत असतील, हे मोदीजी तर आज उत्तर देवू शकणार आहेत की नाही कोणास ठावूक. अनेकवेळा तर त्यांनी स्टेज मॅनेजड् शोकेले आहेत आणि आपलं काम करत आहेत.  त्यातूनही मी असा विचार करतो की, आज आपण जी काही उत्तरं दिली आहेत, त्यामध्ये काही विचार करण्यासारखी गोष्ट असेल, करण्यासारखी गोष्ट असेल तर ती करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. अरे, या स्थानी हा शब्द माझ्या तोंडून निघाला नसता, तर चांगलं होतं. मी विचार करेन. आणि आज मी ज्या स्थानी पोहोचलो आहे ना, साहेब मला अनेक लोकांनी बनवलं आहे. मोदीजी ही अमूक गोष्ट कराच, मात्र हे कधीच करू नका, असेही अनेक जणांनी अगदी पाठ थोपटून सांगितलं आहे. असं करत करत मी इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे हे सगळे परिश्रम मी वाया जावू देणार नाही.

प्रसून जोशी - बरोबर. मोदीजी आता आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्याकडे वळूया. आपण घड्याळाकडे पाहिले आहे, म्हणजे आता कार्यक्रम आटोपता घेतला पाहिजे.

तर मग एक अखेरचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की, इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून केली जावी, आपण स्मरण कसे केले जावे, अशी आपली इच्छा आहे?

पंतप्रधान - वेद कोणी लिहिले होते, याचे उत्तर आपल्यापैकी कोणी सांगू शकणार आहे? दुनियेतला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. पाच हजार, दहा हजार वर्षांनंतरही संपूर्ण विश्वाला आजही मार्ग दाखवण्याचे सामथ्र्य त्याच्यामध्ये आहे. आपल्यापैकी कोणाला माहीत आहे, वेद कोणी लिहिले? जर इतक्या महान रचनाकाराचे नाव जर आपल्याला माहीत नाही, इतिहासात त्याच्या नावाची नोंद नाही तर मोदी कोण आहे? एक लहान जीव आहे.

इतिहासामध्ये आपलं नाव नोंदले जावे, म्हणून मोदी जन्मला आलेला नाही. आणि तसा मोदीचा हेतूही अजिबात नाही. माझ्या सव्वाशे कोटी देशवासियांप्रमाणेच, त्यांच्यातलाच मी एक आहे. त्यांच्यापेक्षा मला कोणी वेगळे मानावे, असं अजिबात वाटत नाही. तशी आवश्यकताही नाही. आपल्याला शिक्षकाचे काम मिळाले असेल. आपल्याला गाडी चालकाचे काम मिळाले असेल, आपल्याला व्यापाराचे काम मिळाले असेल, आपल्याला शेती करण्याचे काम मिळाले असेल, मला हे काम मिळाले आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही. इतिहासामध्ये अमर होण्याची इच्छा मला नाही. त्यासाठी मी काम करत नाही.

माझे ध्येय आहे ते, माझा देश अजर- अमर बनवण्याचे. संपूर्ण विश्वामध्ये माझ्या देशाच्या नावाचा जयघोष झाला पाहिजे. माझ्या देशाचे भविष्य काय आहे, ते मी पाहतो. माझ्या देशाकडे पाहून  लोकांना अतिशय गर्व वाटला पाहिजे. आणि त्यांनी म्हटले पाहिजे की, हाच एक देश मानव कल्याणाचा मार्ग दाखवू शकतो. विश्वाला संकटातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य  याच देशाच्या भूमीमध्ये आहे. मोदी यांची छबी चमकवण्यात मला अजिबात रस नाही. तर हिंदुस्तानची छवी चमकवण्यासाठी माझे आयुष्य खपवण्यात मला रस आहे.

प्रसून जोशी - मोदीजी, आता अखेरीस, अखेरीस चार ओळी वाचणार आहे. ज्या गोष्टींपासून मी इथं आज प्रारंभ केला. त्यासंबंधी अगदी आजच मी या ओळी लिहिल्या आहेत. आणि त्या भारतासाठी आहेत---

एक आसमां कम पड़ता है।

एक आसमां कम पड़ता है, और आसमां मंगवा दो।

एक आसमां कम पड़ता है, और आसमां मंगवा दो।

हैं बेसब्र उड़ानें मेरी, पंख ये नीले रंगवा दो।

एक आसमां कम पड़ता है, और आसमां मंगवा दो।

हैं बेसब्र उड़ानें मेरी, पंख ये नीले रंगवा दो।

स्‍वप्‍न करोड़ों सत्‍य हो रहे, स्‍वप्‍न करोड़ों सत्‍य हो रहे,

अब उनका सत्‍कार करो, निकल पड़ा है भारत मेरा, अब तुम जय,जयकार करो।

 

पंतप्रधान - व्वा !! आमच्या इथे राजा रंतीदेव यांनी म्हटले आहे, आणि जे म्हटले आहे, ते खूपच चांगले आहे. राजा रंतीदेव आणि एका राजघराण्यातून निघालेली ही गोष्ट आहे. त्यांनी म्हटले आहे की--

न कामये राज्‍यम्, न स्‍वर्गम न पुर्भवम् ।

कामये दुरूखतप्रानाम् आर्त्‍ते नाशनम् ।।

याचा अर्थ असा आहे की, मला राज्याची कामना नाही, की मला मोक्षाची कामना नाही. मला पुनर्जन्मही नको आहे. माझ्या हृदयामध्ये जर कामना आहे तर ती फक्त मला त्या दुखी, दरिद्री लोकांची सेवा करायला मिळावी, इतकीच कामना आहे. तीच इच्छा, कामना मनाशी बाळगून मी वाटचाल करीत आहे.

मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे. प्रसून जी आपला खूप आभारी आहे. आपण वेळ काढला त्याबद्दल आभारी आहे. माझ्या ज्या काही चुका आहेत, त्या आपण सांगत रहा. विनासंकोच सांगत रहा. त्यांना मी आशीर्वाद मानतो. आणि त्या आशीर्वादांमुळे , आपल्या सल्ल्यांमुळे सव्वाशे कोटी देशवासियांचे कल्याण करण्यासाठी मी काही तरी योगदान देवू शकणार आहे. ज्या व्यवस्थेमध्ये मी कार्यरत आहे, त्या व्यवस्थेला काहीतरी देवू शकणार आहे. या एकाच इच्छेने आपण इतका वेळ दिला, आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. 

खूप खूप धन्यवाद!

 

B.Gokhale /S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1530556) Visitor Counter : 673


Read this release in: English