अर्थ मंत्रालय
2017-18 या वित्तीय वर्षात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन
ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या काळात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत, 7.19 लाख कोटी रुपयांचा एकूण महसूल जमा
Posted On:
27 APR 2018 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2018
2017-18 या आर्थिक वर्षात ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या काळात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत 7.19 लाख कोटी रुपयांचे महसूल संकलन झाले आहे. यामध्ये सीजीएसटी 1.19 लाख कोटी, एसजीएसटी 1.72 लाख कोटी तर एकात्मिक वस्तू व सेवा कर 3.66 लाख कोटी (आयातीवरच्या 1.73 लाख कोटी रुपयांचा समावेश) आणि 62,021 कोटी रुपयांच्या उपकराचा (आयातीवरच्या 5202 कोटी रुपयांसह) समावेश आहे. या आठ महिन्याच्या कालावधीत मासिक सरासरी महसूल संकलन 89,885 कोटी रुपये राहिले.
देशांतर्गत केल्या जाणाऱ्या चालू महिन्यातल्या पुरवठ्यावरचा कर, विवरण पत्राद्वारे भरला जातो. त्यामुळे तो पुढच्या महिन्यात जमा होतो. आयजीएसटी आणि आयातीवरचा उपकर मात्र त्याच महिन्यात जमा होतो. त्यामुळे या वर्षात देशांतर्गत पुरवठ्यावरचा वस्तू आणि सेवा कर ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या आठ महिन्यासाठी तर आयजीएसटी आणि आयातीवरचा उपकर जुलै 2017 ते मार्च 2018 या नऊ महिन्यांसाठी संकुलित झाला आहे.
जुलै 2017 चे संकलन लक्षात घेता 2017-18 या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा कराचे एकूण ढोबळ संकलन 7.41 लाख कोटी झाले आहे.
वर्षभरात एसजीएसटीचे महसूल संकलन 2.91 लाख कोटी झाले तर गेल्या वित्तीय वर्षाच्या आठ महिन्यात राज्यांना भरपाई म्हणून 41.147 कोटी रुपये जारी करण्यात आले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1530550)
Visitor Counter : 238