शिक्षण मंत्रालय
24 बनावट विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जारी
Posted On:
25 APR 2018 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018
विद्यार्थी आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून, विद्यापीठ अनुदान आयोगाने 24 बनावट विद्यापीठांची यादी जारी केली आहे. या 24 स्वघोषित आणि बिगर मान्यता संस्था, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करत चालवल्या जात होत्या. त्यामुळे त्या बनावट असून, कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार या संस्थाना नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातल्या नागपूर इथल्या राजा अरबिक विद्यापीठाचा या यादीत समावेश आहे.
दिल्लीतल्या दर्यागंज कमर्शियल विद्यापीठ, युनायटेड नेशन्स विद्यापीठ, व्होकेशनल विद्यापीठ, एडीआर सेंट्रीक ज्युरीडीशयल विद्यापीठ, इंडियन ट्रन्स्टीट्युट ऑफ सायन्स अँड इंजिनियरिंग, स्वयं रोजगारासाठीचे विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ, आध्यात्मिक विश्व विद्यालय या विद्यापीठांचा बनावट विद्यापीठात समावेश आहे. बिहारमधले दरभंगा इथले मैथीली विद्यापीठ / विश्वविद्यालय, कर्नाटकमधले गोकाक इथले बदागनवी सरकार जागतिक मुक्त विद्यापीठ एज्युकेशन सोसायटी, केरळमधले किराअनंतम् इथले सेंट जॉन विद्यापीठ याचबरोबर ओदिशा आणि पश्चिम बंगालमधल्या दोन, उत्तर प्रदेशातल्या आठ तर पुद्दुचेरीमधल्या एका विद्यापीठाचा या यादीत समावेश आहे.
केंद्र, राज्य तसेच प्रांतीय कायद्याअंतर्गत स्थापन झालेले विद्यापीठ संस्था तसेच संसदेच्या कायद्याद्वारे अधिकार मिळालेल्या संस्था, कलम 3 अंतर्गत विद्यापीठ म्हणून मान्यता प्राप्त संस्थाच, कलम 22(3) अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग निर्देशित पदवी प्रदान करु शकतात.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1530372)