पंतप्रधान कार्यालय
हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
25 APR 2018 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाशन केले.
बहुगुणा हे लोकशाही मुल्यांना समर्पित व्यक्तीत्व होते. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, चंद्रशेखर आझाद यांच्यासह इतर नेते बहुगुणा यांचे प्रेरणास्थान होते, असे पंतप्रधान म्हणाले.
शिक्षण क्षेत्रातले आणि देशाच्या डोंगराळ भागाच्या विकासामधले बहुगुणा यांचे योगदान, पंतप्रधानांनी विषद केले.
केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यावेळी उपस्थित होते. विजय बहुगुणा, डॉ. रीटा बहुगुणा यांच्यासह बहुगुणा परिवाराचे इतर सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1530371)
Visitor Counter : 148