उपराष्ट्रपती कार्यालय
पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास यांची सांगड आवश्यक – उपराष्ट्रपती वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षणाला जन चळवळीचे स्वरुप हवे
Posted On:
25 APR 2018 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018
पर्यावरण रक्षण आणि आर्थिक विकास यांची सांगड आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज देहरादून इथे सांगितले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे सांगतानाच वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण यांना जनचळवळीचे स्वरुप यायला हवे असे उपराष्ट्रपती म्हणाले.
वनांचे जतन हा वन व्यवस्थापनाचा गाभा असायला हवा. पर्यावरण स्नेही दृष्टीकोन आपण अंगीकारला पाहिजे आणि आपल्या उज्वल भवितव्यासाठी आपण निसर्गासमवेत राहिले पाहिजे. वृक्षारोपण आणि झाडांचे रक्षण हे आपले कर्तव्य आहे, असे प्रत्येक नागरिकाने मानले पाहिजे. वनांचे जतन करण्यासंर्भात आदिवासी आणि स्थानिक जमातींना मार्गदर्शन आणि माहिती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1530235)
अभ्यागत कक्ष : 134