गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय परिषदेची उद्या गांधीनगर इथे बैठक
Posted On:
25 APR 2018 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018
गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि दमण-दीव, दादरा नगर हवेली, या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागीय परिषदेची 23 वी बैठक उद्या गुजरातमधल्या गांधीनगर इथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर बैठकीत सहभागी होणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री या परिषदेचे उपाध्यक्ष आणि यजमानही आहेत. इतर सदस्य राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, मुख्य सचिव आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्र सरकारमधले वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1530223)
Visitor Counter : 123