निती आयोग

अटल न्यू इंडिया चॅलेंजसाठी नीती आयोग अर्ज मागवणार

Posted On: 25 APR 2018 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018

 

अटल नवकल्पना अभियानाअंतर्गत नीती आयोग, येत्या 26 तारखेला अटल न्यू इंडिया चॅलेंजचा प्रारंभ करणार आहे.

अटल न्यू इंडिया चॅलेंज, पाच मंत्रालयांच्या सहकार्याने राबविले जाणार आहे. हवामान बदलाशी सुसंगत शेती, कचरा व्यवस्थापन यासारख्या 17 क्षेत्रात, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत, विक्री योग्य उत्पादने तयार करण्यासाठी संभाव्य नवकल्पनाकार, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र, स्टार्ट अप्सकडून अटल नवकल्पना अभियानाअंतर्गत अर्ज मागवले जाणार आहेत.

निर्मिती, तंत्रज्ञान याबाबत क्षमता दर्शवणाऱ्या अर्जदाराला एक कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर केले जाईल. याशिवाय या अनुदानाला उत्पादनाच्या विविध टप्प्यावरही आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

26 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह, केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री एस.एस.अहलूवालिया, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, अटल नवकल्पना अभियानाचे संचालक रामनाथन रामानन्, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित राहणार आहेत.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1530220) Visitor Counter : 89


Read this release in: English