मंत्रिमंडळ

वनौषधी क्षेत्रातल्या भारत आणि साओ टोमे आणि प्रिन्सीप यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Posted On: 25 APR 2018 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2018

 

वनौषधी क्षेत्रात भारत आणि साओ टोमे यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळापने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे. 14 मार्च 2018 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

 

पूर्वपीठीका :

जैवविविधतेच्या संदर्भात, भारत हा जगातला एक समृद्ध देश आहे. 17000-18000 पुष्प वनस्पतींपैकी 7000 पेक्षा जास्त वनस्पतींचा आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमीओपॅथी सारख्या उपचार पद्धतीत उपयोग केला जातो. सुमारे 1178 वनौषधींचा व्यापार करण्यात येतो त्यापैकी 242 प्रजातीचा वार्षिक 100 मेट्रीक टनापेक्षा जास्त वापर केला जातो. वनौषधी या पारंपरिक औषध पद्धतीचा मोठा भाग आहेतच त्याचबरोबर या वनौषधी मोठ्या प्रमाणात लोकांना आरोग्य सुरक्षा आणि उपजीविकेचे साधनही पुरवितात.

पारंपरिक आणि पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करण्याकडे जागतिक कल वाढला असून, सध्या 120 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर असणारा जागतिक वनौषधी व्यापार, 2050 पर्यंत 7 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1530204) Visitor Counter : 92


Read this release in: English