संरक्षण मंत्रालय
चीनमधल्या 15 व्या शांघाय सहकार्य संघटना संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी केले संबोधित
Posted On:
24 APR 2018 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2018
शांघाय सहकार्य संघटना संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारत प्रथमच सहभागी झाला असून, शांघाय सहकार्य संघटनेच्या भागीदारांसमवेत असलेले प्राचीन संबंध अधिक दृढ करण्यावर भारत भर देणार असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी या बैठकीत बोलतांना सांगितले.
आर्थिक, व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी संवाद आणि ठोस उपाययोजना यावर आधारित भागीदारीसाठी भारत उत्सुक असल्याचे त्या म्हणाल्या. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांनी या प्रदेशातल्या तसेच व्यापक आंतरराष्ट्रीय मुद्यासंदर्भात संवाद वृद्धींगत करावा असे आवाहन त्यांनी सदस्य राष्ट्रांना केले.
हवामान बदल, सायबर सुरक्षा, याचबरोबर अंमली पदार्थांची तस्करी सारख्या आंतर राष्ट्रीय गुन्ह्यांसंदर्भात सर्व संबंधित देशांचा सहभाग आणि सहकार्यात्मक चौकटीवर आधारित तोडग्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा समाजाला असलेला सर्वात मोठा धोका असून, दहशतवादामुळे विकासाला खीळ बसण्याची भती आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांनी दहशतवाद कदापी खपवून घेतला जाणार नाही, असे धोरण अंगीकारावे असे आवाहन त्यांनी केले.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1530059)
अभ्यागत कक्ष : 183