उपराष्ट्रपती कार्यालय

ऑनलाईन वाद निवारण यंत्रणा हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल-उपराष्ट्रपती

Posted On: 21 APR 2018 5:18PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2018

 

ऑनलाईन वाद निवारण यंत्रणा हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे भारताची गुंतवणूकदार स्नेही देश म्हणून प्रतिभा निर्माण करून अधिकाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत होईल असे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सीआयएसीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन वाद निवारण यंत्रणे’वरील राष्ट्रीय परिषदेला ते संबोधित करत होते.

विधी आणि न्याय मंत्रालयाने याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी अभिनंदन केले. या उपक्रमामुळे न्यायालयांना जनतेला न्याय मिळवून देण्यावर लक्ष केंद्रीत करता येईल असे ते म्हणाले.

सध्याचे युग हे इंटरनेट आणि ई-व्यापाराचे युग आहे. ऑनलाईन वाद निवारण यंत्रणेमुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल असे ते म्हणाले.

 

B.G./S.K./P.K.

 


(Release ID: 1529836) अभ्यागत कक्ष : 134
Read this releasein: English