उपराष्ट्रपती कार्यालय

प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तीचे पालन केले पाहिजे आणि देशाच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे- उपराष्ट्रपती

कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या 31 व्या दीक्षांत सोहळ्याला केले संबोधित

Posted On: 19 APR 2018 5:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 एप्रिल 2018

 

प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्तीचे पालन केले पाहिजे आणि देशाच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. हरियाणाचे राज्यपाल प्रा. कप्तान सिंह सोळंकी आणि शिक्षण मंत्री रामविलास शर्मा यावेळी उपस्थित होते.

शिक्षण आणि रोजगाराचा थेट संबंध आहे. नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी कौशल्‍य आणि ज्ञान प्राप्त करा, असे मार्गदर्शन उपराष्ट्रपतींनी केले. देशासाठी योगदान देण्याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सुचवले. शिक्षण केवळ रोजगारासाठी नसून ज्ञान आणि प्रबोधनाच्या वाढीसाठीही आहे, असे ते म्हणाले.

हरियाणा सरकार खेळांना प्राधान्य देत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी कौतुक केले आणि राष्ट्रकुल स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.

समस्यांवर अर्थपूर्ण परिसंवाद लोकशाहीत घडतो. केवळ रचनात्मक परिसंवादातूनच उत्तरे मिळू शकतात, असे उपराष्ट्रपती म्हणाले. विरोध शांततामय मार्गाने झाला पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा हक्क कोणालाच नाही. हिंसा हे कुठल्याही प्रश्नावरचे उत्तर नाही, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

 

 

N.S/S.K/P.M

 

 

 



(Release ID: 1529666) Visitor Counter : 73


Read this release in: English