शिक्षण मंत्रालय

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या “स्टडी इन इंडिया” या उपक्रमाचा आणि पोर्टलचा सुषमा स्वराज आणि डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते प्रारंभ

Posted On: 18 APR 2018 12:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2018

 

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्टडी इन इंडिया पोर्टलसह (www.studyinindia.gov.in)    स्टडी इन इंडिया या उपक्रमाचा आज नवी दिल्ली येथे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

ज्ञानतृष्णा ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे, असे स्वराज यांनी यावेळी सांगितले. वसुधैव कुटुंबकम् आणि सर्वधर्म समभाव या आपल्या प्राचीन संकल्पना चिरंतन आहेत, असे त्या म्हणाल्या.

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला. स्टडी इन इंडिया उपक्रमामुळे परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय शैक्षणिक संस्थांची कवाडे खुली होणार आहे. सुरुवातीला आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतल्या 30 देशांमधल्या विद्यार्थ्यांवर लक्ष्य केंद्रीत केले जाणार असून एक दिवस अमेरिकेतली कुटुंबही त्यांच्या मुलांना पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी पाठवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

N.S/S.K/P.M

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1529585) Visitor Counter : 138
Read this release in: English