वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांसाठी डिजिटल मंचाचे सुरेश प्रभू यांच्याकडून अनावरण

प्रविष्टि तिथि: 17 APR 2018 4:10PM by PIB Mumbai
Press Release photo

FIEO GlobalLinker या डिजिटल मंचाचे अनावरण  करतांना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू 

 

नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018

 

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांना आपला व्यवसाय डिजिटाईज करता यावा आणि जागतिक समुदायाबरोबर ते जोडले जावेत यासाठीच्या FIEO GlobalLinker या डिजिटल मंचाचे अनावरण आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी दिल्ली येथे केले.

या संकल्पनेसाठी प्रभू यांनी भारतीय निर्यातदार संस्था महासंघाचे (FIEO) अभिनंदन केले. या उपक्रमामुळे निर्यातीला चालना मिळेल तसेच कला आणि कारागीर बाजाराशी जोडले जातील, असे प्रभू यांनी सांगितले.

लवकरच किमान 300 भौगोलिक संकेतांकांची नोंदणी केली जाणार असून यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असे प्रभू यांनी सांगितले.

 

N.S/S.K/P.M

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1529346) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English