अर्थ मंत्रालय
देशातल्या चलनस्थितीचा सरकारने घेतला आढावा
देशात पुरेशा प्रमाणात चलनसाठा कार्यरत नसलेली एटीएम लवकरच सुरळीत करणार
प्रविष्टि तिथि:
17 APR 2018 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018
देशातल्या काही भागात चलनाचा तुटवडा भासल्याचे आणि काही एटीएममध्ये रोकड नसल्यामुळे ती बंद पडल्याचे वृत्त आहे.
देशात गेल्या तीन महिन्यात चलन मागणीमध्ये असामान्य वाढ झाली आहे. चालू महिन्यातल्या पहिल्या 13 दिवसातच चलन पुरवठा 45,000 कोटी रुपयांनी वाढला. चलनमागणीमध्ये ही असामान्य वाढ देशाच्या काही भागात जसे की आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये अधिक दिसून आली.
असामान्य मागणीवर पूर्तता करण्यासाठी भारत सरकार आणि रिझर्व बँकेने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. आपल्याकडे चलनी नोटांचा पुरेसा साठा असून आतापर्यंत मागणीनुसार चलन पुरवण्यातही आले आहे. मागणी कितीही असली तरी ती पुरवली जाईल एवढा 500, 200 आणि 100 यासह सर्व प्रकारच्या चलनी नोटांचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, अशी ग्वाही सरकारने सर्व नागरिकांना दिली आहे.
आगामी दिवसांमध्ये/महिन्यांमध्ये जास्त स्तरावरची मागणी पुढेही सुरु राहिली तरी पुरेसे चलन पुरवठ्यात राहील, अशी ग्वाहीही सरकारने दिली आहे.
एटीएममध्ये रोकड राहील आणि बंद एटीएम लवकरात लवकर सुरळीत होतील यासाठी सरकार सर्व पावले उचलत आहे.
N.S/S.K/P.M
(रिलीज़ आईडी: 1529340)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English