ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हॉलमार्क असलेलेच सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू घेण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
16 APR 2018 6:26PM by PIB Mumbai
मुंबई 16 एप्रिल 2018
आगामी अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू घेतांना परवानाधारक दुकानातून हॉलमार्क असलेले दागिने व वस्तू घ्याव्यात, असे आवाहन भारतीय मानके विभागाने केले आहे.
सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू यांच्या शुद्धतेच्या पारखणीसाठी भारतीय मानके विभाग हॉलमार्क पद्धत राबवते. हॉलमार्कचे चिन्ह ग्राहकांना दागिने-वस्तूंच्या खरेपणाबाबत हमी देते. शुद्धतेबाबत, खरेपणाबाबत नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित विक्रेत्याचा भारतीय मानके विभागाचा परवाना रद्द होऊ शकतो तसेच कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.
सोने हॉलमार्किंग संदर्भात भारतीय मानकांमध्ये भारतीय मानके विभागाने सुधारणा केली असून 1 जानेवारी 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. हॉलमार्क असलेले 14 कॅरट, 18 कॅरट आणि 22 कॅरटचे सोन्याचे दागिनेही कॅरटच्या नोंदीसह उपलब्ध असतील.
मुंबईत पत्रकार परिषदेत आज ही माहिती देण्यात आली.
N.S/S.K/P.M
(रिलीज़ आईडी: 1529254)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English