पंतप्रधान कार्यालय

आंबेडकर जयंतीला पंतप्रधानांचा छत्तीसगड दौरा, आयुषमान भारत योजनेच्या शुभारंभप्रसंगी आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 13 APR 2018 7:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2018

 

आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या छत्तीसगडमधील बिजापूरच्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्याला भेट देणार आहेत.

‘आयुषमान भारत’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्‌घाटन करणार आहेत.

पंतप्रधान, बिजापूर जिल्ह्यातील जांगला विकास हबला भेट देणार आहेत. या एका तासाच्या भेटीत ते अनेक लोकांशी संवाद साधतील आणि अनेक विकास उपक्रमांची थोडक्यात माहिती देतील.

आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते ‘आशा’ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ते पोषण अभियानाच्या मॉडेल अंगणवाडी केंद्राला भेट देतील आणि तिथे अंगणवाडी कार्यकर्त्यांशी आणि या अंगणवाडीचा लाभ घेणाऱ्‍या मुलांशी गप्पा मारतील. मुद्रा योजेनेअंतर्गत, लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जांगला येथे बँकेच्या शाखेचे उद्‌घाटन करणार आहेत आणि मुद्रा योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्राचे वाटप करणार आहेत. ते ग्रामीण बीपीओ कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. यानंतर ते जनसभेच्या ठिकाणी पोहोचतील.

आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणाच्या उद्‌शाने तयार केलेल्या जन धन योजनेचे उद्‌घाटन करणार आहेत. या योजनेअंतर्गत, किमान आधारभूत मूल्याच्या सहाय्याने छोट्या वन उत्पादनांच्या विपणनासाठी एक यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भानू प्रताप शूर-गुदूम रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील. ते बिजापूर रुग्णालयात डायलिसिस केंद्राचे उद्‌घाटन देखील करणार आहेत.

नक्षलग्रस्त भागात पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या 1988 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे, इतर रस्ते जोड प्रकल्प, पाणी पुरवठा योजना तसेच दोन पुलांचे उद्‌घाटन करणार आहेत. मोदी उद्या जनसमुदायाला संबोधित देखील करणार आहेत.

 

BG/SM/PK


(रिलीज़ आईडी: 1529052) आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English