माहिती आणि प्रसारण मंत्रालय
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
आसामी चित्रपट व्हिलेज रॉकस्टार्स सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार बाहुबली-द कनक्लुजन
हिंदी चित्रपट ‘मॉम’साठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
नगरकिर्तन चित्रपटासाठी रिद्धी सेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
पांपली दिग्दर्शित जसारी भाषेतील चित्रपट ‘सिंजर’ला सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार
मल्यालम चित्रपट भयानकमसाठी दिग्दर्शक जयराजला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
Posted On:
13 APR 2018 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2018
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नवी दिल्ली येथे करण्यात आली. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व्हिलेज रॉकस्टार्स या आसामी चित्रपटाला मिळाला आहे. तर बाहुबली-द कनक्लुजन हा सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. पदार्पण चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा इंदिरा गांधी पुरस्कार पांपली दिग्दर्शित ‘सिंजर’ या जसारी भाषेतील चित्रपटाला मिळाला आहे.
राष्ट्रीय एकता या विषयावरील मराठी चित्रपट ‘धप्पा’ ला नर्गिस दत्त पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘भयानकम’ या चित्रपटासाठी जयराज यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नागराज मंजुळे यांना नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नगरकिर्तन या चित्रपटासाठी अभिनेत्री रिद्धी सेन हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे तर ‘मॉम’ या चित्रपटासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे.
व्ही.सी.अभिलाषा दिग्दर्शित ‘आलोरुक्कम’ या मल्याळम चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार म्होरक्या या मराठी चित्रपटाला मिळाला आहे.
3 मे 2018 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
NS/SM/PK
(Release ID: 1529051)
Visitor Counter : 194