Posted On:
12 APR 2018 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2018
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या मागच्या बाजूला, चाईल्डलाईन (1098) मुलांसाठी 24X7 काम करणारी संस्था आणि पॉक्सो-ई-बॉक्स संदर्भातली माहिती प्रकाशित केली आहे. सुरक्षा/तक्रारीच्या संभावित प्रकारांसंदर्भात मुलांना माहिती मिळावी यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटीला या सूचना प्रकाशित करण्याची विनंती केली होती.
या पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून 15 लाख शाळेतल्या अंदाजे 26 कोटी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल अशी आशा आहे. सामाजक विज्ञानाच्या पुस्तकात देखील यासंदर्भातल्या धड्याचा समावेश होऊ शकतो, अशी सूचना एनसीईआरटीला देण्यात आली आहे. इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती दिली जाऊ शकते, ज्याचा तरुण मुलांच्या बुद्धीवर सकारात्मक परिणाम होईल.
या पुस्तकांच्या रुपात ही माहिती एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या माध्यमातून 10 लाख शिक्षकांसह, कुटुंबातील सदस्य आणि मुलांची देखरेख करणाऱ्या सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचेल.
NS/SM/PK