गृह मंत्रालय
14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश
प्रविष्टि तिथि:
12 APR 2018 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2018
आगामी 14 एप्रिलला आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.
कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात गस्त घातली जावी तसेच जिथे आवश्यकता आहे तिथे प्रतिबंधक आदेश जारी करावेत असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या विभागात कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात यावर भर देण्यात आला आहे.
2 आणि 10 एप्रिलला भारत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचार आणि देशातील काही भागात पुतळ्यांच्या विटंबनांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.
NS/SM/PK
(रिलीज़ आईडी: 1528839)
आगंतुक पटल : 106
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English