Posted On:
12 APR 2018 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2018
श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरुन आज इस्रोने आयआरएनएसएस-1आय या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी 425 किलो वजनाचा हा उपग्रह पीएसएलव्ही-सी4एल या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अंतराळात प्रक्षेपित केला.
आतापर्यंत पीएसएलव्हीने 52 भारतीय आणि 237 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
NS/SM/PK