आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

कोल इंडिया लिमिटेड आणि या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांना मंजूर करण्यात आलेल्या कोळसा खाण पट्टयातून कोल बेड मिथेनचा शोध आणि तो काढून घेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 11 APR 2018 5:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने,तेल क्षेत्र,( नियमन आणि विकास) कायदा 1948, (ओआरडी कायदा,1948) च्या कलम 12 अंतर्गत,

3(xiii) मध्ये दुरुस्ती करणाऱ्या 3.11.2015 च्या अधिसूचनेत सुधारणा करणारी अधिसूचना काढण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे.

या सुधारणेमुळे,कोल इंडिया लिमिटेड आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांना,त्यांना मंजूर करण्यात आलेल्या खाण पट्टा क्षेत्रातून कोल बेड मिथेन काढण्यासाठी पीएनजी कायदा,1959 अंतर्गत परवाना घेण्यासाठी अर्ज करण्यातून सूट मिळणार आहे.

परिणाम

व्यापार करण्यासाठी सुलभ आणि पोषक वातावरण निर्माण करण्याच्‍या सरकारच्या धोरणाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे कोल बेड मिथेनचा शोध घेऊन तो काढण्यासाठी वेग मिळणार आहे,नैसर्गिक वायूची उपलब्धता यामुळे वाढणार असून मागणी आणि पुरवठा यातली तफावत भरून काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.यामुळे मिथेन साठ्याचा शोध आणि तो  काढण्याच्या क्रियेला गती मिळणार असून त्यामुळे आर्थिक घडामोडीना आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

पूर्वपीठिका

कोल इंडिया लिमिटेड आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांना बहाल करण्यात आलेल्या खाणपट्ट्यात

कोल बेड मिथेनचा शोध घेऊन तो काढण्यासाठी अधिकार देणारी अधिसूचना, सरकारने,3.11.2015 ला काढली होती.खाण पट्टे भाडे तत्वावर मंजूर करण्यासाठी,पी  एन जी नियमावली 1959 अंतर्गत,केंद्रीय खाण नियोजन आणि आरेखन संस्थेच्या तपशीलवार शिफारशीं बरोबरच,संबंधितांनी अर्ज करावा अशी तरतूद या अधिसूचनेच्या कलम 3(vi)  मध्ये होती.

 

NS/NC/PK(Release ID: 1528677) Visitor Counter : 142


Read this release in: English