मंत्रिमंडळ

भारत, ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्यातल्या अवैध प्रवासी माघारी पाठवण्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 11 APR 2018 5:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018

 

भारत, ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड यांच्यातल्या अवैध प्रवासी माघारी पाठवण्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

फायदे

यामुळे,राजनैतिक पारपत्र धारकांसाठी व्हिझा मुक्त करार त्याचबरोबर ब्रिटनमध्ये वैध प्रवास करणाऱ्यांसाठी ब्रिटन व्हिझा धोरण उदार होण्यासाठी सुलभता येणार आहे.

राष्ट्रीयत्वाची पडताळणी झाल्यानंतर, दुसऱ्या मुलखात कायदेशीर आधाराशिवाय राहणाऱ्या व्यक्तींची माघारी येण्याची खातरजमा होणार आहे.

विशिष्ट कालावधीत, दुसऱ्याच्या मुलुखात बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांना, त्यांच्या मुलुखात पाठवण्याची प्रक्रिया यामुळे सुलभ होणार आहे.

 

NS/NC/PK


(Release ID: 1528666)
Read this release in: English