मंत्रिमंडळ
भारत आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यांच्यात मुख्यालय (यजमान देश) कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
11 APR 2018 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018
भारत आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यांच्यात मुख्यालय (यजमान देश) करार करण्यासाठी आणि या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला अधिकार देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे.26 मार्च 2018 ला या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या करारामुळे भारत आणि आंतर राष्ट्रीय सौर आघाडी यांच्यातल्या कार्यात्मक व्यवस्थेला संस्थात्मक स्वरूप मिळणार आहे. यामुळे आंतर राष्ट्रीय सौर आघाडीला आंतर राष्ट्रीय आंतर सरकारी संघटना म्हणून ओळख प्राप्त होण्यासाठी सुलभता येणार आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी निर्मितीमुळे, सौर तंत्र ज्ञान विकास आणि भारतासह या आघाडीच्या सदस्य राष्ट्रात या तंत्रज्ञान नियुक्तीला गती मिळणार आहे.
NS/NC/PK
(रिलीज़ आईडी: 1528665)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English