रेल्वे मंत्रालय
रेल्वे स्थानकांवर सौर पॅनेल
प्रविष्टि तिथि:
10 APR 2018 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2018
देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर सौर पॅनेल बसवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतीय रेल्वे, रेल्वे स्थानके आणि रेल्वे अखत्यारितील इमारतींवर 500 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसवत आहे. महाराष्ट्रातील खालील रेल्वे स्थानके आणि इमारतींवर सौर पॅनेल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पश्चिम रेल्वे अंतर्गत मुंबईतील माटुंगा रोड स्थानक, जगजीवनराम हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, ग्रांट रोड, चर्चगेट स्थानक यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे अंतर्गत कामन, नेरळ, टिकेकरवाडी, सांगोला, दौंड, खंडाळा, उंबेरमाळी, थानसेट, माथेरान, आसनगाव, पेण, भुसावळ, पुणे, राहुरी, पुणतांबा, अहमदनगर स्थानक, केईएम स्थानक, जुनारदेव स्थानक, पांढुरणा स्थानक, सीएसएमटी ॲनेक्स इमारत, सीएसटीएम पार्सल इमारत, माटुंगा स्थानक (मध्य/पश्चिम), खोपोली या स्थानकांचा समावेश आहे.
NS/SM/PK
(रिलीज़ आईडी: 1528510)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English