नौवहन मंत्रालय
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) पुढच्या महिन्यापासून थेट वाहतूक सेवा सुरू करणार
नवीन कार्यप्रणालीचा 1600 आयातकांना लाभ होणार
Posted On:
09 APR 2018 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2018
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अतिशय वेगाने आणि विना अडथळा मालाची वाहतूक करण्यासाठी पुढच्या महिन्यापासून नवीन कार्यप्रणाली लागू करणार आहे. या नवीन व्यवस्थेनुसार बंदरामध्ये येणाऱ्या मालाच्या कार्गोची वाहतूक थेट त्यांच्या ग्राहकांपर्यंत होऊ शकणार आहे. त्याचा लाभ बाहेर माल आयात करणाऱ्या 1600 व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना होणार आहे.
जेएनपीटीने यासाठी वाहतूक मार्गाचे लिलाव केले आहे. त्यामध्ये कंपन्यांची बोली मंजूर करण्यात आली. त्यानुसार आता बंदरातून माल थेट आयातकांच्या दारात पोहोचवण्यात येणार आहे. प्रारंभी या मार्गांवर जेएनपीटी माल पोहोचवणार आहे. त्यामध्ये जेएनपीटी ते गुजरात, गोवा आणि बंगळुरू तसेच नाशिक, नागपूर, औरंगाबाद, इंदूर आणि हैदराबाद, अहमदनगर आणि स्थानिक परिसर तसेच मुंबईतही हा माल आयातकांना मिळू शकणार आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे मे 2018 पासून जेएनपीटी ही नवीन वाहतूक व्यवस्था सुरू करणार आहे.
डायरेक्ट पोर्ट डिलेव्हरी (डीपीडी) या कार्यप्रणालीला आयातकाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकूण कार्गो वाहतुकीपैकी 39 टक्के आयातकांना ‘डीपीडी’ हा पर्याय निवडला आहे. या नवीन कार्यप्रणालीनुसार आयातक किंवा निर्णातक आपल्या कार्यालयामध्ये बसून कार्गोचे आरक्षण करू शकणार आहे आणि आपला माल पाठवू शकणार आहे तसेच बाहेरून मागवूही शकणार आहे.
या कार्यप्रणालीचे फायदे
- पोर्ट व्यवस्थापन आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वय राहणे सोयीचे
- ग्राहकाला दारात माल उपलब्ध होणार
- बंदर क्षेत्रातून कंटेनरची गर्दी कमी होण्यास मदत, बंदर क्षेत्र लवकर कोंडीतून मुक्त होऊ शकणार
- 24X7 वाहतुकीवर लक्ष ठेवणे शक्य
- मोबाईलच्या माध्यमातून कंटेनरचा मार्गवेध घेता येणार
- 24X7 ग्राहकांना सेवा उपलब्ध असणार
NC/SB/PK
(Release ID: 1528380)
Visitor Counter : 99