गृह मंत्रालय

उद्याच्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्याचे गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश

प्रविष्टि तिथि: 09 APR 2018 4:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2018

 

काही समुहांनी उद्या दि. 10 एप्रिल 2018 रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. या ‘बंद’च्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. राज्यांनी संवेदनक्षम क्षेत्रांमध्ये जास्त गस्त ठेवावी, तसेच जीवित आणि मालमत्तेची हानी होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी अशी सूचना गृहमंत्रालयाने केली आहे.

 

NC/SB/PK


(रिलीज़ आईडी: 1528356) आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English