पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या सीपीएसई परिषदेला करणार संबोधित

प्रविष्टि तिथि: 08 APR 2018 8:56PM by PIB Mumbai

 

 नवी दिल्ली, 8 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 9 एप्रिलला नवी दिल्लीत विज्ञान भवनात सीपीएसई परिषदेला संबोधित करणार आहेत.

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि विविध मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सीपीएसई मधल्या उत्तम प्रथा यावेळी मांडल्या जातील.

कॉर्पोरेट प्रशासन, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, नव कल्पकता या संकल्पनावर आधारित सादरीकरण  यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला संबोधित करतील.

 

NS/NC/PK


(रिलीज़ आईडी: 1528313) आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English