वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
देशातील 56 विमानतळं येत्या काही वर्षात कार्यरत होतील-जागतिक लॉजिस्टीक परिषदेत सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास
Posted On:
05 APR 2018 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2018
जागतिक तसेच देशांतर्गत अर्थव्यवस्थेशी त्वरित सांगड घालून व्यापार वाढवण्यासाठी भारतासारख्या देशात उत्तम सुविधा आणि कार्यप्रणाली निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. हे लक्षात घेऊनच देशातील 56 विमानतळे येत्या काही वर्षात कार्यरत करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित जागतिक लॉजिस्टीक परिषदेत ते आज बोलत होते.
या परिषदेमध्ये सुविधा आणि कार्यप्रणालीशी संबंधित सर्व घटक एकत्र आल्याने परस्पर चर्चेतून लॉजिस्टीक सुविधा आणि दळणवळणात सुधारणा करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
2019-20 पर्यंत भारतातील लॉजिस्टीक उद्योग 215 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत या उद्योगात दरवर्षी 10 टक्क्यांची वाढ होत आहे, असे प्रभू यांनी सांगितले. जागतिक बँकेने जारी केलेल्या लॉजिस्टीक कामगिरी निर्देशांकात भारत 2014 साली 54 व्या स्थानावर होता तो 2016 साली 35 व्या स्थानावर पोहोचला आहे.
NS/RA/PK
(Release ID: 1527907)