अर्थ मंत्रालय
आधीच्या मालकाकडून मिळालेले निवृत्ती वेतन कर वजावटीस पात्र असल्याविषयीचे स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
05 APR 2018 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2018
कर्मचाऱ्याला त्याच्या आधीच्या मालकाकडून मिळालेले निवृत्तीवेतन ‘वेतन’ या मुद्यानुसार करपात्र आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिले आहे. 2018 च्या वित्तीय कायद्यानुसार 1961 च्या प्राप्तीकर कायद्यातील कलम 16 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीनुसार कर्मचाऱ्याच्या करपात्र उत्पन्नाच्या प्रमाणानुसार 40 हजार रुपये अथवा वेतनातील रक्कम यापैकी जी कमी रक्कम असेल ती कर स्वरुपात भरावी लागेल. याच नियमानुसार आधीच्या मालकाकडून मिळणारे निवृत्तीवेतनही करपात्र ठरेल. मात्र, निवृत्तीवेतनधारक या कराचा परतावा मागण्यास पात्र असून तो 40 हजार किंवा वेतनातील काही रक्कम यापैकी जी कमी असेल ती प्रमाणित करवजावट परत मागण्याचा दावा करू शकेल.
यासंदर्भात स्पष्टीकरण मागणारी निवेदने मंडळाकडे आली होती, त्यानुसार हे स्पष्टीकरण दिले आहे.
NS/RA/PK
(रिलीज़ आईडी: 1527905)
आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English