मंत्रिमंडळ

रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याविषयावरील भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 APR 2018 9:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे क्षेत्रात संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक प्राधिकरण- भूमी आणि सागरी सोबत झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली. 10 फेब्रुवारी 2018 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे खालील क्षेत्रात तांत्रिक सहकार्य शक्य होईल:-

•          नियमन, सुरक्षा आणि अपघातांची तांत्रिक चौकशी

•          स्टेशन पुनर्विकास

•          लोकोमोटिव्ह, कोचेस आणि वॅगन, आणि

•          भागीदारांनी संयुक्तपणे ओळखलेले इतर कोणतेही क्षेत्र.

फायदे:

हा सामंजस्य करार भारतीय रेल्वेला, रेल्वे क्षेत्रातील ताज्या घडामोडी व ज्ञान सामायिक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या सामंजस्य करारान्वये माहितीचे आदान-प्रदान, तज्ज्ञ सभा,परिसंवाद,तांत्रिक भेटी आणि संयुक्त सहमती सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणी करणे सुलभ होईल.

पार्श्वभूमी:

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी विविध परदेशी सरकार आणि राष्ट्रीय रेल्वे क्षेत्रा सोबत सामंजस्य करार केले आहेत. रेल्वे तंत्रज्ञान आणि सहकार्य क्षेत्रातील विकासाच्या माहितीचे आदानप्रदान , ज्ञानाची देवाणघेवाण, तांत्रिक भेटी आणि परिसंवाद आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमधील कार्यशाळा या सर्व बाबींमुळे सहकार्य साध्य होते.

 

NS/SM/PK

 



(Release ID: 1527816) Visitor Counter : 68


Read this release in: English