मंत्रिमंडळ

भारत आणि कॅनडा दरम्यानच्या सामंजस्य करारनुसार संशोधन उत्कृष्टता आणि औद्योगिक शिक्षण सहयोग केंद्रित सीमापार भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 04 APR 2018 9:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कॅनडा दरम्यान स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य कराराला आज मंजुरी दिली. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी नवी दिल्ली येथे या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

भारत आणि कॅनडा दरम्यान संशोधन उत्कृष्टता आणि औद्योगिक शिक्षण सहयोग केंद्रित सीमापार भागीदारीला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे, ज्यामुळे उभय देशांना नवोन्मेषाचा लाभ मिळेल.

गतिमान प्रत‍िभेसह आग्रही सहयोग हा या भागीदारीचा मुख्य गाभा आहे. या करारामुळे भारतीय आणि कॅनेडियन संशोधकांना पदवीधर पातळीवरील शैक्षणिक संशोधन गतिशीलता आणि सीमावर्ती उद्योग-शैक्षणिक सहकार्य करण्यास मदत मिळेल. पदवी स्तरावरील शैक्षणिक संशोधन गतिशीलता कार्यक्रमाअंतर्गत, तीन वर्षांमध्ये भारतीय विद्यापीठांमधील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातल्या 110 मास्टर आणि पीएचडी विद्यार्थी संशोधकांना 12 ते 24 आठवड्यांकरिता कॅनडियन विद्यापीठ संशोधन प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. कॅनडियन विद्यापीठातील देखील तितकेच विद्यार्थी 12 ते 24 आठवड्यांकरिता पात्र भारतीय विद्यापीठांच्या संशोधन प्रयोगशाळेत संशोधन करू शकतील. सीमावर्ती उद्योग-शैक्षणिक सहकार्याअंतर्गत तीन वर्षांमध्ये उभय देशांतील 40 मास्टर आणि पीएचडी विद्यार्थी उभय देशात स्थित भागीदारी उद्योगांमध्ये 16 ते 24 आठवड्यांपर्यंत संशोधन करू शकतील.

या सहयोगामुळे नवीन ज्ञान निर्मिती, संयुक्त वैज्ञानिक प्रकाशने, औद्योगिक प्रदर्शनासह, आयपी जनरेशन इत्यादी होणे अपेक्षित आहे. हा सामंजस्य करार कॅनडा सोबत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव सहकार्यामध्ये दीर्घकाळापर्यंतच्या संबंधांना आणखी मजबूत करेल.

 

NS/SM/PK



(Release ID: 1527815) Visitor Counter : 56


Read this release in: English