शिक्षण मंत्रालय
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे उच्चस्तरीय समितीची स्थापना
Posted On:
04 APR 2018 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2018
सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पेपर फुटीच्या घटना होऊ नये यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परीक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे माजी सचिव विनय ओबेराय यांच्या अध्यक्षतेखाली ही सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती परीक्षा यंत्रणेतील सर्व टप्प्यांचा बारकाईने अभ्यास करून प्रश्नपत्रिका बाहेर जाणार नाही किंवा त्यांच्यासोबत छेडछाड होणार नाही याची काळजी घेईल. तसेच प्रश्नपत्रिकांची वाहतूक, मुद्रण अशा कोणत्याही ठिकाणांहून पेपर फुटण्याचे प्रकार होणार नाहीत याची व्यवस्था करेल. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत परीक्षा व्यवस्था अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठीच्या उपाययोजना ही समिती सुचवेल.
उच्चस्तरीय समिती आपला अहवाल 31 मे पर्यंत सादर करेल.
NS/RA/PK
(Release ID: 1527637)