शिक्षण मंत्रालय

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उच्च शिक्षण संस्थांच्या क्रमवारीची यादी जाहीर

उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीने एनआयआरएफ क्रमवारीतील निकष उपयुक्त ठरणार - जावडेकर

Posted On: 03 APR 2018 6:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2018

 

मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत एनआयआरएफ भारत क्रमवारी 2018 जाहीर केली. या क्रमवारीनुसार 9 गटातल्या 69 सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांचा जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

देशातील उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवणे तसेच देशात सकारात्मक स्पर्धेचे वातावरण निर्माण करणे या दृष्टीने ही क्रमवारी उपयुक्त ठरेल, असे जावडेकर यावेळी म्हणाले. राष्ट्रीय क्रमवारी आराखडा संस्था, एनआयआरएफ दरवर्षी सर्व उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करून त्यानुसार ही क्रमवारी निश्चित करते. या प्रयत्नांबद्दल तसेच क्रमवारी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या शिक्षण संस्थांचे जावडेकर यांनी अभिनंदन केले.

देशात शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 10 सरकारी आणि 10 खासगी शिक्षण संस्थांना देशातल्या सर्वोत्कृष्ट संस्थांचा दर्जा देणार असून या 20 संस्था जागतिक संस्थांच्या क्रमवारीत स्थान निर्माण करत असतील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यावेळी उपस्थित होते.

यंदाच्या क्रमवारीत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था देशात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात आयआयटी चेन्नई तर व्यवस्थापन संस्था आयआयएम अहमदाबादने क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

आयआयटी मुंबईने सर्वसाधारण यादीत तिसरे स्थान तर अभियांत्रिकी क्षेत्रातल्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. व्यवस्थापन विभागात मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नववं स्थान मिळालं आहे. औषध निर्माण महाविद्यालयांच्या यादीत मुंबईची भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था चौथ्या स्थानावर आहे. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी आठव्या आणि नरसी मोन्जी व्यवस्थापन शिक्षण संस्था नवव्या स्थानावर आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1527590) Visitor Counter : 164


Read this release in: English