वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

निर्यात सुलभीकरणासाठीच्या डिजिटल साधनांचे सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 03 APR 2018 6:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2018

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज नवी दिल्लीत निर्यात तपासणी समितीने  तयार केलेल्या डिजिटल उपक्रमाचे उद्‌घाटन केले. निर्यात सुलभीकरणासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत. देशाच्या कृषी आणि अन्नधान्य निर्यातीला बळ देण्यासाठी हे डिजिटल उपक्रम उपयुक्त ठरतील, असे सुरेश प्रभू यावेळी म्हणाले.

जागतिक निर्यातबाजाराच्या गतीशी मेळ साधण्याच्या दृष्टीने निर्यात तपासणी समितीने  हा डिजिटल उपक्रम सुरु केला आहे.

मालाची तपासणी आणि प्रमाणन करणे, तसेच जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांवरचा विश्वास बळकट करणे, ह्या हेतूने ही तीन पोर्टल्स बनवण्यात आली असून यामुळे व्यवहाराचा वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. यामुळे निर्यात सुलभ होणार असून कागदाचा वापर कमी होणार असल्याने हा उपक्रम पर्यावरणपूरक देखील ठरला आहे.

सर्व क्षेत्रात उद्योग सुलभता आणण्याच्या उद्देशाने अन्नधान्य निर्यात साखळीतील सर्व घटक या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडण्यात आले आहेत.  कृषी उत्पादन, अन्न प्रक्रिया केंद्र, तपासणी प्रयोगशाळा आणि निर्यात याच्याशी संबंधित सर्व व्यवहार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तपासता येतील.  ‘एक प्रयोगशाळा एक मूल्यांकन’ या पोर्टलमुळे उत्पादन, प्रक्रिया, नियमन आणि तपासणी अशा सर्व हितसंबंधी गटांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे. निर्यातीची गती, गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे डिजिटल प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरतील.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1527582) आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English