आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
झाशी- माणिकपूर आणि भीमसेन-खैरार मार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरण
Posted On:
20 FEB 2018 12:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 20 फेब्रुवारी 2018
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने,425 किलोमीटर लांबीच्या झाशी- माणिकपूर आणि भीमसेन-खैरार मार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरण करायला मान्यता दिली आहे. 2022-23 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यासाठी 4955.72 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश मधले झाशी,महोबा,बांदा,चित्रकुट धाम हे तर मध्य प्रदेशमधल्या छ्त्तरपूर जिल्ह्यात याची व्याप्ती आहे.
दुपदरीकरणामुळे झाशी/कानपूरहून अलाहाबाद कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या क्रॉसिंगसाठी न ताटकळता प्रवास करू शकणार आहेत.यामुळे प्रवासी गाड्यांचा वक्तशीरपणा वाढणार आहे. देखभालीसाठी जास्त वेळ देता येणार असल्याने सुरक्षीतता वाढणार आहे. याशिवाय बुंदेलखंडाच्या सर्वागीण विकासासाठी चालना मिळणार आहे.
आंतर राष्ट्रीय पर्यटन स्थान असणाऱ्या खजुराहोशी दळण वळण वाढणार आहे या पर्यटनामुळे आर्थिक भरभराटीला चलना मिळण्याबरोबरच रोजगार संधी वाढणार आहेत.
विद्युतीकरणामुळे रेल्वेचा वेग वाढणार असून कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला मदत होणार आहे. इंधन आयातीवरचे अवलंबित्व कमी होऊन रेल्वेसाठी उर्जा दरात बचत आणि देशासाठी परकीय चलनात बचत साध्य होणार आहे.
याशिवाय हा प्रकल्प, निर्मिती दरम्यान 102 लाख कार्य दिवसांचा थेट रोजगार निर्माण करणार आहे.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1521234)
अभ्यागत कक्ष : 26