महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला सक्षमीकरणासाठी ‘नारी’ पोर्टलचे मनेका संजय गांधी यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
02 JAN 2018 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 2 जानेवारी 2018
महिलांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित असणाऱ्या ‘नारी’ या पोर्टलचे उद्घाटन महिला आणि बाल विकास मंत्री मनेका संजय गांधी यांनी आज नवी दिल्लीत केले. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने विकसित केलेल्या या पोर्टलवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार राबवित असलेल्या विविध योजनांचे तपशील उपलब्ध आहेत. देशभरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील मंत्रालय आणि स्वयंसेवी संस्थांना परस्पर संवाद साधता यावा, यासाठी ई-संवाद हे पोर्टल विकसित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटनही आज करण्यात आले. महिलां आणि बाल विकास राज्यमंत्री डॉ.विरेंद्र कुमारही या समारंभाला उपस्थित होते.
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पहिल्यांदाच देशभरातील महिलांना सरकारतर्फे त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची आणि लाभांची माहिती या पोर्टलच्या माध्यमातून मिळेल, असे मनेका गांधी यांनी यावेळी सांगितले. या पोर्टलवर केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती असेल. तसेच संकटात सापडलेल्या महिलांसाठी या पोर्टलवर एक तात्काळ प्रतिसाद यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
B.Gokhale/M.Pange/D.Rane
(Release ID: 1515049)
अभ्यागत कक्ष : 146