आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग (एनएच) -2 च्या चिकारी-अलाहाबाद विभागातील सहा पदरी मार्गाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
Posted On:
28 JUN 2017 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग (एनएच) -2 च्या चिकारी-अलाहाबाद विभागातील सहा पदरी मार्गाच्या विकासाला मंजुरी दिली.
भूसंपादन, पुनर्वसन आणि इतर पूर्व-बांधकाम व्यवसायांच्या खर्चासह 3,691.09 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विकसित होणाऱ्या रस्त्याची एकूण लांबी साधारण 145 किमी आहे.
हे काम हायब्रीड अॅन्युइटी मोडवर राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाच्या अंतर्गत (एनएचडीपी) टप्पा ५ अंतर्गत केले जाईल.
हा प्रकल्प उत्तर प्रदेशमधील पायाभूत सुविधांच्या सुधारणांना मदत करेल तसेच या मार्गांमुळे चकेरी आणि अलाहाबाद दरम्यानच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या वेळत आणि खर्चात बचत होईल. विशेषत:. या विकासामुळे राज्यातील या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा व्हायला मदत होईल.
एनएच -2 वरील हा प्रकल्प दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील सुवर्ण मध्य आहे. प्रकल्प रस्ता उत्तरप्रदेशच्या दक्षिण-पश्चिम भागांवर थेट प्रभाव टाकेल. कानपूर हे उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध औद्योगिक शहरांपैकी एक आहे. अलाहाबाद एक प्रसिद्ध तीर्थस्थान केंद्र आहे, ज्यामध्ये प्राचीन ऐतिहासिक वास्तू व इमारती तसेच अनेक शैक्षणिक संस्था आहेत.
या प्रकल्पामध्ये, ट्रक प्रामुख्याने लोडिंग आणि अनलोडिंगसाठी जिथे थांबतात त्यासाठी 11 ट्रक ले-बायची तरतूद आहे जिथे 18 स्थानांवर बस-बाय विद्यमान आहे. 14 व्हेक्युलर अंडर पास आणि 25 पादचारी अंडरपास व्यतिरिक्त नऊ फ्लायओव्हर्सदेखील प्रस्तावित आहेत.
या प्रकल्पामुळे स्थानिक मजुरांसाठी रोजगाराची निर्मिती होईल . एक किलोमीटर महामार्गाच्या बांधणीसाठी 4,076 दिवस पूर्ण करणे अपेक्षित आहे असा अंदाज आहे. यामुळे, 5,91,000 (साधारण) दिवसांच्या रोजगाराच्या संधी बांधकाम काळात स्थानिक पातळीवर निर्माण होतील.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha
(Release ID: 1494059)
अभ्यागत कक्ष : 20