राष्ट्रपती कार्यालय

सर्वसमावेषक विकास हेच ध्येय आधुनिक भारतात लिंग भेदभावाला स्थान नाही – राष्ट्रपती

Posted On: 08 MAR 2017 3:20PM by PIB Mumbai

 

 

सर्वसमावेषक विकास हेच आपले ध्येय असून आधुनिक भारतात लिंग भेदभावाला स्थान नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज राष्ट्रपती भवनात वर्ष 2016 साठीचे नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.
महिलांविरुद्धच्या वाढत्या हिंसाचाराबद्दल सरकारलाही तितकीच काळजी वाटते असे सांगून भारतातील महिलांना पुरेसे सुरक्षित वाटत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
मुलांमध्ये स्त्रियांविषयी आदरभावना असावी, यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
देशातल्या प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला चांगले वातावरण आणि समान संधी पुरवण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात दिली.
 
N.Sapre/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

(Release ID: 1483854) अभ्यागत कक्ष : 20