दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
येत्या 30 जून रोजी टपाल विभागाची पणजीत 62 वी डाक अदालत
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2025 12:05PM by PIB Mumbai
पणजी, गोवा – 9/06/2025
गोवा पोस्ट मास्टर जनरल यांच्या वतीने येत्या 30 जून रोजी सकाळी 11.00 वाजता टपाल विभागाची 62 वी प्रादेशिक स्तरीय डाक अदालत पणजीत आयोजित करण्यात आली आहे . यात ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येते. टपाल विभागाशी संबंधित ग्राहकांच्या विविध तक्रारी तसेच अडचणी ज्यांचे निवारण गेल्या 6 आठवड्यांच्या आत झाले नाही त्यांचा या डाक अदालत मध्ये विचार केला जातो . टपाल, स्पीड पोस्ट, काऊनटर सेवा, बचत बँक सेवा आणि मनिऑर्डर न भरण्याशी संबंधित तक्रारींचा विचार या डाक अदालत मध्ये केला जाईल.
या संबंधीच्या तक्रारी स्वीकारण्याची अंतिम तिथी 20 जून,2025 आहे. मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली त्यांच्या तारखा आणि नावे आणि पदनाम आदींचा तपशील अर्जात करावा असे आवाहन टपाल विभागाने केले आहे .
इच्छुक ग्राहक पोस्टल सेवांबद्दलची त्यांची तक्रार प्रत मध्ये सहाय्यक संचालक पोस्टल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय , पणजी - 403 001 गोवा प्रदेश यांना पाठवू शकतात.
टपाल सेवा देशाच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत, ज्या जवळजवळ प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित आहेत, टपाल विभाग आपल्या ग्राहकांच्या पूर्ण समाधानासाठी, सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असला तरी संवादातील तफावत आणि सेवांमध्ये त्रुटी अधूनमधून घडतात ज्यामुळे तक्रारी निर्माण होतात. अशा तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी विभाग वेळोवेळी डाक अदालत आयोजित करतो.

***
NM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2135063)
आगंतुक पटल : 10