मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
सागर परिक्रमा कार्यक्रमाचा चौथा टप्पा कर्नाटकातील कारवार येथून सुरु, सागर परिक्रमेच्या चौथा टप्प्याला आजपासून सुरुवात
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी समस्या आणि आकांक्षांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करण्यासाठी विविध भागधारकांशी साधला संवाद; किनारी भागात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना इत्यादी योजनांच्या प्रगतीचा घेतला आढावा
Posted On:
18 MAR 2023 9:23PM by PIB Mumbai
सागर परिक्रमा कार्यक्रमाचा चौथा टप्पा आजपासून कर्नाटकातील कारवार येथून सुरु झाला.
मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता (देशांतर्गत आणि सागरी दोन्हीसाठी) आणि त्याच्याशी संबंधित उपक्रम, पायाभूत विकास, विपणन, निर्यात आणि संस्थात्मक व्यवस्था इ. वाढवण्यावर मुख्य भर देऊन, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) आणि नील क्रांतीच्या इतर बहुआयामी उपक्रम केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी यावेळी केलेल्या आपल्या भाषणात अधोरेखित केले.
मासेमारी विकासाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्नाटक राज्यातील माजली, बेलंबरा आणि इतर भागात मासेमारी बंदर , मासे उतरवण्यासाठी बर्फाची संयंत्रे, शीतगृहे इत्यादी विकसित केले जातील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी योजनांची जनजागृती करण्यासाठी मदत करण्याची विनंती त्यांनी स्वयंसेवकांना केली. मस्त्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्नाटक सरकारने 75 फिरते पशुवैद्यकीय कक्ष स्थापन केल्याबद्दल परशोत्तम रुपाला यांनी कौतुक केले.
1950 ते 2014 पर्यंत, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील गुंतवणूक सुमारे 3,681 कोटी रुपये होती. 2014 पासून सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या 20,500 कोटींच्या खर्चासह, सुमारे रु. 8,000 कोटींच्या मासेमारी आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी, 3000 कोटींच्या तरतुदीच्या नील क्रांतीसह प्रत्यक्ष वास्तव समजून घेऊन मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी एकूण एकूण अंदाजे रु. 32,000 कोटी गुंतवणूक केली आहे.
आज, जगातील सर्व देश उपाय शोधण्यासाठी भारताकडे पाहात आहेत आणि हे शक्य झाले आहे कारण आपल्या सरकारने लोकांच्या सामान्य ज्ञानावर विश्वास ठेवला आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासह देशाच्या प्रगतीमध्ये हुशारीने सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
भागधारकांच्या समस्या आणि आकांक्षांचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करण्यासाठी मंत्र्यांनी विविध भागधारकांशी संवाद साधला. किनारी भागात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना इत्यादी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. किसान क्रेडीट कार्डच्या प्रचारासाठी मत्स्य शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
***
G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908456)
Visitor Counter : 192