पर्यटन मंत्रालय
भारत पर्यटनतर्फे गोवा मधल्या अगुआडा कारागृह संग्रहालय इथं ‘हेरिटेज वॉक’ आणि स्वच्छता अभियानाचं आयोजन
Posted On:
09 MAR 2023 6:00PM by PIB Mumbai
गोवा, 9 मार्च 2023
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत पर्यटनने आज- 9 मार्च 2023 रोजी गोवा मधल्या कँडोलिम इथल्या अगुआडा कारागृह संग्राहालयात हेरिटेज वॉक आणि स्वच्छता अभियानाचं यशस्वी आयोजन केलं. वारसा संवर्धनाच्या महत्त्वाविषयी आणि स्वच्छतेविषयी युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या अभियानात पोर्वोरिम येथील प्रमुख हॉटेल व्यवस्थापन संस्था, गोवा गृहविज्ञान महाविद्यालय आणि ज्ञानप्रसारक विद्यालय या तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांमधल्या युवा पर्यटन क्लबच्या सुमारे ४५ सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला. गोवा सरकारचे मान्यताप्राप्त पर्यटक मार्गदर्शक, अनिल जोगळेकर यांनी अगुआडा कारागृहाचा इतिहास आणि गोवा मुक्ती चळवळीविषयी महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वच्छता कार्यक्रमात विद्यांर्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या विद्यर्थ्यांनी अगुआडा कारागृह संग्राहालयाचा परिसर पूर्ण स्वच्छ केला. समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करून आणि शाश्वत पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देत देशातल्या पर्यटनाला चालना देण्याचं भारतीय पर्यटन मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.
तरुणांमध्ये वारसा संवर्धन आणि स्वच्छतेबद्दल जबाबदारी आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्यात आयोजकांना यश आलं. हा कार्यक्रम राज्यातील शाश्वत पर्यटन पद्धतींना चालना देण्यासाठी सरकारच्या वचन बद्धतेवर मोहोर उमटवणारा ठरला.
* * *
PIB Panaji | S.Bedekar/S.Mohite/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905393)
Visitor Counter : 121