संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘सदर्न स्टार आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशन’ च्या देणगी केंद्राचे - ‘अक्षयपात्र’चे पुणे येथे उद्‌घाटन

Posted On: 01 MAR 2023 7:33PM by PIB Mumbai

पुणे, 1 मार्च 2023

सदर्न स्टार  आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशन  (AWWA) देणगी  केंद्र, ‘अक्षयपात्र’ चे   27 फेब्रुवारी 2023 रोजी मैत्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कॅम्प, पुणे येथे उद्‌घाटन करण्यात आले. दक्षिण विभाग  लष्कर कमांडर, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम, सदर्न स्टार आर्मी वाइव्ह्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने राबवण्यात आला आहे.

स्वयंसेवक आता कपडे आणि घरगुती वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंतच्या वस्तू अक्षयपात्र येथे  दान करू शकतात.

दान केलेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करण्यासाठी, सदर्न स्टार एडब्‍ल्‍यूडब्ल्यूएने गुडविल इंडिया, या  पुण्यातील नावाजलेल्या  स्वयंसेवी संस्थेबरोबर भागीदारी केली आहे. कालिदास हरिभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखालील ही स्वयंसेवी संस्था आणि त्यांचा चमू दान केलेल्या वस्तूंचे गरजूंना वाटप करतील. पुणे इथल्या गुडविल इंडिया या संस्थेकडे पुण्यातील  वंचित आणि विशेषतः  दिव्यांग  व्यक्तींना अन्न, कपडे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा 10 वर्षांचा अनुभव आहे.

सदर्न स्टार AWWA च्या पदाधिकारी, प्रादेशिक अध्यक्ष सुबीना अरोरा आणि त्यांच्या चमूच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प विक्रमी वेळेत कार्यान्वित झाला आहे. जास्तीतजास्त गरजू व्यक्तींना सहाय्य करण्यामध्ये अक्षयपात्रचे योगदान राहावे, यासाठी सदर्न स्टार AWWA कटिबद्ध आहे.

 

 

 

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1903464) Visitor Counter : 179


Read this release in: English