संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ आर्मी एअर डिफेन्सने आपला 30 वा स्थापना दिवस केला साजरा
Posted On:
10 JAN 2023 8:15PM by PIB Mumbai
पुणे, 10 जानेवारी 2023
भारतीय लष्कराच्या , कोअर ऑफ एअर डिफेन्स दलाने आज आपला 30 वा स्थापना दिवस साजरा केला. या दलाचे घोषवाक्य,'आकाशे शत्रुं जाही' म्हणजे ‘शत्रूचा हवेतच नाश’ या प्रेरणेवर आधारित आहे. शानदार भूतकाळ आणि अधिक उज्ज्वल भवितव्याचा निश्चय करत, हा दिवस साजरा केला गेला.
भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण दलाच्या स्थापनेचा इतिहास 1939 सालचा, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळातला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान, जपानी वायू सेनेचा सामना करण्यासाठी भारतात, लष्कराच्या लढावू विमाने प्रतिबंधक तुकड्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, 15 सप्टेंबर 1940 रोजी, लष्कराच्या लढावू विमान रोधी पहिल्या केंद्राची सुरुवात, मुंबईत कुलाबा इथे झाली, त्यादिवशी औपचारिकरित्या, ह्या दलाची सुरुवात झाली. आणि जानेवारी 1941ला कराची इथे त्याला पूर्णत्व मिळाले. स्वातंत्र्यानंतर, ही तुकडी लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटचा भाग म्हणून कायम राहिली मात्र, 10 जानेवारी 1994 रोजी, तिला स्वतंत्र शाखा म्हणून अस्तित्वात आणले गेले. यामुळे, भारतीय लष्करातील महत्वाच्या कारवाया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त लढाऊ पाठबळ देणारे दल म्हणून या विभागाला वेगळे अस्तित्व आणि व्याप्ती मिळाली.
लष्करी हवाई सुरक्षा दलाचे परिवर्तन, आधुनिकीकरण आणि अद्यायवतीकरण अशा दुहेरी मार्गावर चालू आहे. यामध्ये नवीन अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणालींचा समावेश तसेच विद्यमान प्रणालींमध्ये गुणात्मक सुधारणा याचा समावेश आहे.
आज, हे दल, आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. यावेळी बोलताना, दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए के सिंह, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, यांनी हवाई संरक्षण योद्धांची त्यांच्या अतुलनीय कटीबद्धतेबद्दल आणि समर्पणाबद्दल प्रशंसा केली. त्यांना सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी आणखी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या दलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम योग्य मार्गाने सुरू असून भारतीय सैन्याच्या एकूण क्षमता वाढविण्यासाठी हे दल एक महत्त्वपूर्ण सक्षम लढाऊ दल म्हणून सिद्ध होणार आहे, असेही ए. के. सिंह म्हणाले.
या दलाचा गौरवास्पद इतिहास असंख्य सन्मान आणि पुरस्कारांनी सुशोभित आहे . यात चार बॅटल ऑनर, चार मिलिटरी क्रॉस, ब्रिटिश साम्राज्याचे च्या दोन ऑर्डर, ब्रिटिश साम्राज्यकाळात मिळालेले एक पदक, सात भारतीय विशिष्ट सेवा पदके आणि दोन अशोक चक्रे यांचा विशेषत्वाने उल्लेख करायला हवा.
* * *
PIB Pune | M.Iyengar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890117)
Visitor Counter : 183