परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
जी-20 परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थी झाले सदस्य देशांचे प्रतिनिधी
पुण्यामध्ये शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रतिरूप जी-20 सदस्य देशांची परिषद
विद्यार्थ्यांमध्ये जी-20 जागृतीसाठी संवाद सत्र आणि जागतिक विषय अभ्यासकांनी केले मार्गदर्शन
Posted On:
10 JAN 2023 4:26PM by PIB Mumbai
पुणे, 10 जानेवारी 2023
यंदा भारताला जी-20 परिषदेचे अध्यक्षपद प्राप्त झाले आहे. याचा एक भाग म्हणून पुण्यामध्ये देखील जी-20 सदस्य देशांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. जी-20 परिषद कार्यपध्दती, उदिदष्टे व रचना इ. बाबी विदयार्थ्यांना अवगत व्हाव्यात, हा या कार्यक्रमामागील हेतू होता.
आज पुण्यातील तीन शाळा आणि तीन महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेचे राजीव गांधी ई-लर्निंग स्कुल, सहकारनगर; शामराव कलमाडी स्कुल, एंरंडवणे; व्हीआयआयटी स्कुल, कोंढवा बु,; एमआयटी कॉलेज, कोथरुड; मॉडर्न महाविदयालय, गणेशखिंड; सिम्बायोसिस विदयापीठ, किवळे या शाळा व महाविदयालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थी जी-20 सदस्य देशांचे प्रतिनिधी म्हणून प्रतिरूप परिषदेमध्ये सहभागी झाले.
न्याय आणि शाश्वत विकास, पर्यावरण पुरक जीवनशैली, महिला सक्षमीकरण, डिजीटल विश्व, सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सक्षम विकास, जागतिक अन्न आणि उर्जासुरक्षा, हवामानातील बदल, हरित हायड्रोजन, विकासात्मक सहकार्य या विषयांवर सवांद सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी चर्चा केली, तसेच जागतिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांन मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रास पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग व पोलीस विभागातील अधिकारी यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
* * *
PIB Pune | S.Nilkanth/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890026)
Visitor Counter : 290