कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात प्रतिभेची कमतरता नाही; किंबहुना जगभरात प्रतिभावंत आणि कुशल भारतीयांची मागणी वाढली आहे: कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, बिगडेटा आणि कोडींग यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये तरुण भारतीयांना सक्षम करण्यासाठी सॅमसंगसोबत भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषदेच्या भागीदारीद्वारे स्किल इंडियाचे लक्ष्य साधणार

Posted On: 22 SEP 2022 4:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022

केन्द्र सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमा अंतर्गत भारतीय इक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषदेने (ईएसएससीआय) आज सॅमसंग इंडियासोबत एका कौशल्य उपक्रमासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. तरुणांना उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योगाशी संबंधित कौशल्ये शिकवून त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. 

‘सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस’ या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 18 ते 25 वर्षे वयोगटातील 3,000 बेरोजगार तरुणांना कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, कोडिंग आणि प्रोग्रामिंग यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानामधील कौशल्यात अद्यायावत करणे आहे.

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यावेळी उपस्थित होते.  कौशल्ये केवळ तरुणांना रोजगारक्षम करणारी नसावीत तर ती त्यांना रोजगारक्षम बनवून रोजगाराचे प्रवेशद्वार उघडणारी आणि तरुणांच्या समृद्धीचे पारपत्र ठरणारी असली पाहिजेत.  रोजगाराभिमुख कौशल्य जितके अधिक तेवढा आकांक्षी भारतीय तरूणांसाठी त्याचा उपयोग अधिक असेल असे  चंद्रशेखर यावेळी म्हणाले. वाढत्या डिजिटल जगात संधींचा उपयोग करून आणि भारताला प्रतिभेचा सेतू बनवण्यासाठी सरकारचा कौशल्यावर भर आहे.  भारतात प्रतिभेची कमतरता नाही, उलट आज  जगभरात प्रतिभावान आणि कुशल भारतीयांची मागणी वाढली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि मंत्रालयाने शाश्वत उपायांसाठी उद्योग आणि कौशल्यविषयक व्यवस्था यांच्यात दृढ भागीदारी विकसित करण्यासाठी योजना तयार करावी, असे आवाहन त्यांनी केले. तरुण भारतीयांना कौशल्याने सक्षम करण्यासाठी ईएसएससीआय सोबत सॅमसंगने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत केले. सॅमसंग कंपनी भारत आणि भारतीयांचे खरे भागीदार असल्याचाच हा पुरावा आहे" असे चंद्रशेखर म्हणाले. या ठिकाणांहून लाखो विद्यार्थ्यांना कौशल्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आपले कार्यक्रम राबवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये मुख्यालय सुरु करावेत असे आवाहन त्यांनी केले.

सॅमसंग दक्षिण पश्चिम आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केन कांग आणि ईएसएससीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिलाषा गौर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

 

R.Aghor /V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1861510) Visitor Counter : 173