अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशात आणि मुंबईत आयकर विभागाची शोधमोहीम

Posted On: 10 AUG 2022 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

 

आयकर विभागाने 14.07.2022 रोजी खाणकाम, साखर उत्पादन आणि मद्य व्यवसायात गुंतलेल्या एका समूहाविरूद्ध शोध मोहीम राबवली. या समूहातील प्रमुख व्यक्ती राजकीय पदावर आहे. मध्य प्रदेश आणि मुंबईतील अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबविण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान  मोठ्या प्रमाणात गुन्हा सिद्ध करणारी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले आहेत.  ही कागदपत्रे आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

वाळू उत्खनन व्यवसायाच्या जप्त केलेल्या पुराव्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की हा गट नियमित हिशेब वहीत विक्रीची नोंद न करून करचुकवेगिरी करत आहे. वास्तविक विक्रीची तुलना समकालीन महिन्यांच्या लेखा विक्रीशी केल्यानंतर 70 कोटी रुपयां पेक्षा जास्त विक्रीच्या हिशोबात मोठ्या प्रमाणावर नियमितपणे गैरव्यवहार केल्याचे डिजिटल पुराव्यांनुसार स्पष्ट होते. अशा बेहिशोबी विक्रीवर रॉयल्टी न भरल्याचे पुरावेही सापडले आहेत. 10 कोटींहून अधिक रक्कम या समूहाने नियमित खात्याच्या बाहेर जात इतर व्यावसायिक सहयोगींना रोख स्वरूपात अदा केल्याचे आढळून आले आहे.

साखर उत्पादन व्यवसायाच्या बाबतीत, साठवणुकीतील तफावतीशी संबंधित समस्या देखील आढळून आल्या आहेत.

गोळा केलेल्या पुराव्यांवरून असेही दिसून आले आहे की वाळू उत्खनन व्यवसाय करणाऱ्या फर्ममध्ये काही बेनाम भागीदार बनवले गेले आहेत. हे भागीदार त्यांच्या आयकर विवरणपत्रात  नफा घोषित करत असल्याचेही आढळून आले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकडून समूहाच्या मालकाला पैसे दिले जात होते.

आपण केवळ पगारदार कर्मचारी असून या व्यवसायाची आपल्याला कोणतीही माहिती नाही किंवा अशा व्यवसायातून कोणताही नफा मिळाला नाही, असे एकाने झडतीदरम्यानच्या निवेदनात म्हटले आहे.

आतापर्यंत शोध मोहिमेत 9 कोटी रुपयांहून अधिक अघोषित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

S.Kulkarni/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850687) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu